आॅनलाईन महावितरण : सरासरी देयके, फॉल्टी मिटरच्या तक्रारींना आळायवतमाळ : ग्राहकांकडे असलेल्या वीज मिटरचे रिडींग प्रत्येक महिन्याला वीज कंपनीकडून कॅमेराद्वारा घेतले जाते. परंतु यामध्येही मोठ्या प्रमाणात तक्रारींचे प्रमाण पाहता आता मोबाईल अॅपद्वारा हे रिडिंग घेण्यात येत आहे. यातून रिडिंगमधील चूका टळून अधिक पारदर्शकता वाढेल. ग्राहकांकडील वीज रिडिंग अचूकपणे आणि नियमित घेता यावी, यासाठी कॅमेराचा उपयोग करण्यात येत होता. परंतु तरीसुद्धा अनेक तक्रारी ग्राहकांकडून करण्यात येत होत्या. या तक्रारींमध्ये सत्यताही आढळून आली. अनेक बिलांमध्ये तोच तो फोटो छापल्या जायचा, बहुतांश बिलातील फोटोमधील रिडिंग ओळखूच यायची नाही, रिडिंग घेणारे कर्मचारी प्रत्यक्ष घरोघरी न जाताच एकाच ठिकाणी बसून सरासरी रिडिंगचा फोटो टाकून मोकळे व्हायचे, याचा आर्थिक फटका ग्राहकांसोबतच महावितरणलाही बसायचा. या सर्व बाबींची गंभीर दखल घेत आता, मोबाईल अॅपद्वारा रिडिंग घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यामध्ये अक्षांश-रेखांश फंंक्शन असल्याने प्रत्यक्ष घरोघरी जाऊन रिडिंग घेणे आवश्यक आहे. त्याशिवाय अॅपमध्ये इनपूटच येत नाही. यामध्ये कोणताही निष्काळजीपणा सबंधित कर्मचाऱ्याला करता येणार नाही. मोबाईल अॅप रिडिंगमुळे सरासरी देयके, फॉल्टी मिटर असे प्रकार बिलावर दाखविण्याला तिलांजली मिळणार आहे. घराला जर लॉक असेल तर अशावेळी संबंधित वीज ग्राहक मोबाईल अॅपने महावितरणशी जुळलेला असेल तर त्याला मोबाईलवर तसा मॅसेज जाईल. त्यानंतर हा ग्राहक स्वत: आपल्या मोबाईलने मीटरचा फोटो घेऊन महावितरणच्या अॅपवर रिडिंग पाठवू शकतो. त्यामुळे घराला लॉक दाखवून चुकीचे देयके आता देता येणार नाही. अमरावती विभागासह इतर काही जिल्ह्यांमध्ये या प्रक्रियेला सुरुवात झाली असून साधारणत: एक नोव्हेंबरपासून राज्यात सर्वत्र मोबाईल अॅप रिडिंगची अंमलबजावणी केली जाण्याची शक्यता आहे. त्यादृष्टीने विद्युत कंपनीकडून प्रयत्न करण्यात येत आहेत. (प्रतिनिधी)अमरावती परिमंडळात अंमलबजावणीअमरावती परिमंडळात (अमरावती व यवतमाळ) सप्टेंबर २०१६ या महिन्यात परिमंडळातील विभागनिहाय मोबाईल अॅपद्वारा रिडिंग घेण्यात आलेल्या ग्राहकांची एकूण संख्या एक लाख २५ हजार ९६४ आहे. त्यामध्ये अमरावती जिल्ह्यातील वीज ग्राहक संख्या ७४ हजार ८६ तर यवतमाळ जिल्ह्यातील ग्राहकांची संख्या ५१ हजार ८७८ इतकी आहे. सप्टेंबरमध्ये मोबाईल अॅपद्वारा रिडिंग घेण्यात आलेली विभागनिहाय ग्राहकसंख्या यवतमाळ ३१, ४४१, पुसद ६४०६, पांढरकवडा १४०३१, अमरावती शहर २०९३१, अमरावती ग्रामीण ३४६०२, अचलपूर ३०५०५, मोर्शी १५०४८ अशी आहे.
आता मोबाईल अॅपद्वारा वीज रिडिंग
By admin | Updated: October 9, 2016 00:10 IST