शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियानं रद्द केली ८ उड्डाणं, आता काय घडलं? पुणे, मुंबई, दिल्लीसह अनेक मोठ्या शहरांतील प्रवाशांची अडचण
2
मुंबई महापालिकेची निवडणूक मविआ एकत्र लढणार की नाही? शरद पवार म्हणाले, "उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची..."
3
प्रियकरासोबत मिळून पतीची केली हत्या, लग्नाआधीपासून सुरू होते अफेअर; हत्येनंतर रचला बनाव
4
Corona Virus : बापरे! कोरोनाने वाढवलं टेन्शन, अवघ्या ४ दिवसांच्या बाळाला आणि एका महिन्यांच्या मुलीला लागण
5
मारन कुटुंबाचा वाद आला समोर, SunTV मधील हिस्स्यावरून दोन भाऊ आमने-सामने
6
Maharashtra Rain: आषाढीपुर्वीच पंढपुरात पुराचा धोका! भीमा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
7
भारताचा उल्लेख करत पाकिस्तानी संसदेत 'गजवा ए हिंद'चा नारा; खासदाराचं चिथावणीखोर भाषण
8
१ लाखाचे झाले १४ लाख! 'या' ५ मिडकॅप म्युच्युअल फंडांचा बंपर नफा, SIP मधूनही गुंतवणूकदार कोट्यधीश!
9
"६०-७० वर्षांच्या महिलांनाही रोमान्स हवा असतो, पण...", नीना गुप्तांचं बोल्ड वक्तव्य
10
HDB Financial Services IPO चा प्राईज बँड ठरला; 'या' तारखेपासून लावता येणार बोली, पाहा डिटेल्स
11
SNB report: स्विस बँकेंत भारतीयांचा पैसा वाढला तिप्पट, आकडा ऐकून चक्रावून जाल!
12
'दक्षिणायन' ही देवांची रात्र का समजली जाते? या काळात कोणत्या गोष्टी टाळायला हव्या? वाचा!
13
Sonam Raghuvanshi : "सोनम रघुवंशी समलैंगिक, तिला..."; ज्योतिषाचा खळबळजनक दावा, भविष्यवाणी ठरलीय खरी
14
"मराठी माणूस एकत्र येऊ नये म्हणून गाठीभेटी घेतात"; ठाकरेंच्या टीकेवर CM फडणवीस म्हणाले, "बोलबच्चन असलेल्यांना..."
15
वंदे भारत एक्सप्रेसमध्ये भाजपा आमदारानं समर्थकांसह प्रवाशाला केली बेदम मारहाण
16
IND vs ENG : हेडिंग्लेच्या मैदानात कसा राहिलाय टीम इंडियाचा रेकॉर्ड? जाणून घ्या सविस्तर
17
इस्त्रायलने २००० किलोमीटरवरुन क्षेपणास्त्र डागले ! इराणचे अणु केंद्र उद्ध्वस्त केले; सॅटेलाईट फोटो आले समोर
18
दोन्ही ठाकरे बंधूंनी एकत्र यावं असं वाटतं का? सायली संजीव म्हणाली- "त्या दोघांनाही..."
19
UCO Bank Case: अभय लोढा यांची दोषमुक्तता करण्यास सीबीआय न्यायालयाने दिला नकार!
20
Israel Stock Market : हल्ल्याच्या बातमीनंतरही इस्रायलचा शेअर बाजार सुस्साट; ५२ आठवड्यांच्या उच्चांकी स्तरावर, कारण काय?

ट्रॅक्टर मालकाला पाच लाखांच्या दंडाची नोटीस

By admin | Updated: January 12, 2017 00:52 IST

पुन्हा गौण खनिज वाहतूक करणार नाही, असे बंधपत्र दिले असताना पुन्हा गौण खनिज वाहतूक करून

बंधपत्र तोडले : महसूल राज्यमंत्र्यांकडे धाव पुसद : पुन्हा गौण खनिज वाहतूक करणार नाही, असे बंधपत्र दिले असताना पुन्हा गौण खनिज वाहतूक करून या बंधपत्राचे उल्लंघन करणाऱ्या ट्रॅक्टर मालकाला पाच लाख रुपये दंडाची नोटीस बजावण्यात आली आहे. अखेर या ट्रॅक्टर मालकाने बचावासाठी थेट महसूल राज्यमंत्र्यांच्या दरबारात धाव घेतल्याची माहिती आहे. नारायण मनुलकर रा.शेंबाळपिंपरी ता.पुसद असे या ट्रॅक्टर मालकाचे नाव आहे. त्यांचा ट्रॅक्टर गौण खनिज वाहतूक करताना २१ आॅक्टोबर २०१६ रोजी पकडण्यात आला होता. त्यावेळी त्यांनी जात मुचलका (बंधपत्र) पुसद तहसीलदारांपुढे सादर केला. या ट्रॅक्टरद्वारे पुन्हा वाहतूक झाल्यास पाच लाखांच्या दंडास मी पात्र राहील, असे त्यात नमूद होते. दरम्यान, हाच ट्रॅक्टर २७ डिसेंबर २०१६ रोजी हनवतखेडा येथील तलाठ्यांनी गौण खनिज वाहतूक करताना पुन्हा पकडला. अर्थात या ट्रॅक्टर मालकाने बंधपत्राचे उल्लंघन केले म्हणून तहसीलदारांनी ट्रॅक्टर मालकाला २ जानेवारी २०१७ रोजी नोटीस जारी केली असून पाच लाखांचा दंड १५ दिवसांच्या आत जमा करावा अन्यथा ट्रॅक्टरचा लिलाव करण्यात येईल, असे त्यात नमूद करण्यात आले. महसूल कायद्यात गौण खनिजाच्या किमतीच्या अधिकाधिक पाच पट दंड करण्याची तरतूद असताना पुसद तहसीलदारांनी तब्बल पाच लाखांचा दंड कोण्या आधारावर केला, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. अखेर या दंडात्मक कारवाईच्या विरोधात महसूल राज्यमंत्र्यांकडे न्याय मिळतो का, या उद्देशाने धाव घेण्यात आल्याचे सांगण्यात येते. दरम्यान, पुसद तहसीलदारांनी महसूल कायद्यातील नव्या सुधारणांचा हवाला देत पाच लाखांच्या दंडाचे समर्थन केले असून ही कारवाई योग्यच असल्याचे ‘लोकमत’शी बोलताना स्पष्ट केले आहे.