शहरं
Join us  
Trending Stories
1
"आजच्या भेटीचा डायरेक्ट संबंध...!"; फडणवीस-राज ठाकरे भेटीवर संजय शिरसाटांची पहिली प्रतिक्रिया, मनसे प्रमुखांना थेट ऑफरच दिली!
2
Raja Raghuvanshi Case: एक चूक अन् डाव पालटला! राजाच्या हत्येला आत्महत्या दाखवायचे होते; सोनमच्या एका चुकीमुळे झाले उघड
3
"ऑपरेशन सिंदूर हे लहान मुलांच्या व्हिडीओ गेमसारखे" नाना पटोलेंचं वक्तव्य
4
भाजपाची खेळी स्वत:वरच उलटली; १० पैकी ९ नगरसेवकांनी बनवला स्वतंत्र गट, CM फडणवीसांना धक्का
5
Interest Rate Cut : स्वस्त झालं होम आणि कार लोन, 'या' ३ बँकांनी ग्राहकांना दिलं मोठं गिफ्ट
6
पाकिस्तानच्या नागरिकांची अन्नासाठी वणवण अन् ११ कोटींचा शेफ बनवणार शाहबाज शरीफ यांचं जेवण!
7
धरणं सुकली, शेतकरी त्रासले; सिंधु पाणी करार स्थगित झाल्याने पाकिस्तानमध्ये हाहाकार! सध्या परिस्थिती काय?
8
Paytm च्या शेअरमध्ये १०% ची मोठी घसरण; सरकारच्या एका पोस्टनं स्टॉकमध्ये भूकंप
9
महापालिका निवडणुकीत ‘मराठी’ मुद्दा गाजण्याची चिन्हे! पाणी, जमीन, भाषा महत्त्वाची, देशाचे विभाजन होऊ नये; मनसेची भूमिका
10
कामाख्या देवीचं दर्शन ठरलं अखेरचं! राजा रघुवंशीचा मंदिरातील 'तो' फोटो आला समोर
11
आधीच कर्जबाजारी त्यात आणखी भर! पाकिस्तान चीनकडून ४० विमाने खरेदी करणार; बजेटमधून मोठा खुलासा
12
ट्रम्प आणि मस्क यांच्यात 'पॅच-अप'? माफी मागताच एकाच रात्रीत संपत्तीत 'एवढी' वाढ!
13
पन्नाशी ओलांडली तरी इतक्या फिट कशा आहेत कविता मेढेकर? म्हणाल्या- "दोन मुलं झाली तरी..."
14
हनिमूनलाच केली नवऱ्याची हत्या; सोनम-राजा रघुवंशीसारखीच अंगावर काटा आणणारी घटना
15
IND vs ENG: कसोटी मालिकेआधी इग्लंडच्या उपकर्णधाराला विराट कोहलीची आठवण, म्हणाला...
16
राज-फडणवीस भेटले, विरोधकांचे टेन्शन वाढवले? महापालिका निवडणुकीच्या तोंडावर झालेल्या या भेटीसंदर्भात नाना पटोले काय बोलले?
17
'काँग्रेस का हात, पाकिस्तान के साथ' हे पुन्हा एकदा सिद्ध झालं; भाजपाचा नाना पटोलेंवर पलटवार
18
मोठी 'राज'कीय घडामोड! देवेंद्र फडणवीस - राज ठाकरे यांची ताज हॉटेलमध्ये बैठक? चर्चांना उधाण
19
देवेंद्र फडणवीस-राज ठाकरे भेटीनंतरही उद्धवसेनेचे नेते मनसेसोबत युतीवर सकारात्मक, म्हणाले... 

जवाहरलाल दर्डा अभियांत्रिकी महाविद्यालयात ‘नॉन ओव्हन प्रोडक्शन टेक्नॉलॉजी’ कार्यशाळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 24, 2018 21:52 IST

येथील जवाहरलाल दर्डा अभियांत्रिकी महाविद्यालयात टेक्सटाईल इंजिनिअरिंग विभागातर्फे नॉन ओव्हन प्रोडक्शन टेक्नॉलॉजी कार्यशाळा घेण्यात आली.

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : येथील जवाहरलाल दर्डा अभियांत्रिकी महाविद्यालयात टेक्सटाईल इंजिनिअरिंग विभागातर्फे नॉन ओव्हन प्रोडक्शन टेक्नॉलॉजी कार्यशाळा घेण्यात आली. उद्घाटनप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून किनो अ‍ॅटोमेशन मुंबईचे सेल्स अँड मार्केटिंग हेड अमर सुर्वे, रिलायन्स इंडस्ट्रीज मुंबईचे बिझिनेस डेव्हलपमेंट जनरल मॅनेजर चंदन राऊत, जेडीआयईटीचे प्राचार्य डॉ. आर.एस. तत्त्ववादी, टेक्सटाईल इंजिनिअरिंग विभागाचे प्रमुख प्रा. गणेश काकड, शासकीय महिला तंत्रनिकेतनच्या ड्रेस डिझाईनिंग व गारमेंट मॅन्यूफॅक्चरिंग विभागाच्या प्रा. अनघा गाढवे, प्रा. शीतल वनकर, कार्यशाळा समन्वयक प्रा. प्रशांत रहांगडाले उपस्थित होते.यावेळी अमर सुर्वे यांनी टेक्सटाईल क्षेत्राचा प्रवास हा टेक्नीकल टेक्सटाईलच्या दिशेने वेगाने सुरू आहे, असे सांगितले. त्यातीलच एक भाग म्हणजे नॉन ओव्हन तंत्रक्षेत्राचा ज्यामध्ये केवळ तंतूपासून थेट कापडाची निर्मिती करता येते. ज्याचा वापर पाणी शुद्ध करावयाचे फिल्टर, पेट्रोल शुद्ध करावयाचे फिल्टर, वाहनांमधील रूफिंग, डॅशबोर्ड आदी कामांसाठी केला जातो. नवीन रक्तनलिका, कृत्रिम हृदय यासारख्या क्लिष्ट शस्त्रक्रियेदरम्यानसुद्धा केला जातो, असे ते म्हणाले. नॉन ओव्हन मॅन्युफॅक्चरिंग टेक्नॉलॉजी या विषयातील उपयुक्तता, त्याचे फायदे आणि दैनंदिन जीवनातील वापर या विषयावर त्यांनी मार्गदर्शन केले. अमर सुर्वे हे जेडीआयईटीचे माजी विद्यार्थी आहेत.चंदन राऊत यांनीही जेडीआयईटीतून शिक्षण घेतले आहे. त्यांनी आपल्या व्याख्यानातून टेक्नीकल टेक्सटाईल अँड नॉन ओव्हन या क्षेत्रातील रोजगार उपलब्धता व व्यवसायीकरण याविषयी माहिती दिली. उद्योग क्षेत्राशी निगडीत भविष्यातील संधी आणि नवीन उद्योगासाठी शासनाचे प्रोत्साहनपर अनुदान याविषयी त्यांनी मार्गदर्शन केले.कार्यशाळेत जेडीआयईटीच्या टेक्सटाईल विभागाचे आणि शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयातील ड्रेस डिझाईनिंग व गारमेंट मॅन्युफॅक्चरिंग विभागाचे विद्यार्थी, प्राध्यापक सहभागी झाले होते. प्राचार्य डॉ. आर.एस. तत्त्ववादी यांनी कार्यशाळेचा उद्देश सांगितला. प्रा. गणेश काकड यांनी प्रास्ताविक केले. संचालन रजत सोनी यांनी केले. कार्यशाळेसाठी प्रा. संदीप सोनी, प्रा. अजय राठोड, प्रा. प्रशांत रहांगडाले, कार्यशाळा समन्वयक प्रा. राम सावंत, प्रा. मोनाली इंगोले, श्याम केळकर, अमोल गुल्हाने, प्रीतम रामटेके, विनय चौरे, विद्यार्थी प्रतिनिधी अक्षय कैकाडे, पूनम लढ्ढा, विशाल सावंकर, आदित्य अनकमवार, केवीन पटेल, शुभम उरकुडे, मयूर महिंद्रकर, अश्विनी आवारे, प्रिया सिंगनधुपे, रूचा डहाके, चंदू चौगुले, अश्विनी वानखडे, शिफा कामिल, पायल पांड्या, मयूरी वाघ, मोनिका जीवतोडे, शिवम अडोले आदींनी पुढाकार घेतला. कार्यशाळेच्या यशस्वी आयोजनाबद्दल संस्थेचे अध्यक्ष देवेंद्र दर्डा, सचिव किशोर दर्डा यांनी आयोजकांचे कौतुक केले. 

टॅग्स :JDIETजेडीआयईटी