शहरं
Join us  
Trending Stories
1
मुफ्ती दहशतवाद्यांच्या घरी जायच्या, काश्मिरी पंडितांना हाकलून कोणी दिलं? फारुख अब्दुल्लांचा आरोप
2
"आम्ही पाकिस्तानी लोकांना मारणार नाही, कारण..."; काय म्हणाले फारुख अब्दुल्ला? सिंधूच्या पाण्यासंदर्भातही मोठं विधान
3
IHMCL Recruitment: आयएचएमसीएलमध्ये नोकरी, एक लाखांहून अधिक पगार; जाणून घ्या पात्रता आणि निवड
4
"घरं तोडायला येतील त्यांना सांगा, राज ठाकरेंशी बोलून घ्या"; एल्फिन्स्टन पूल बाधितांना मनसेने दिला धीर
5
"मी सत्तेसाठी कधीच हपापलेलो नाही, सर्वाधिक सत्ता..."; अजित पवारांनी मांडलं रोखठोक मत
6
Alka Kubal : अलका कुबल यांनी 'माहेरची साडी'साठी घेतलं होतं फक्त इतकं मानधन, पहिल्या कमाईचा आकडाही आला समोर
7
"दादांना विचारतो त्यांनी कुठल्या ज्योतिष्याकडे पाहिलं"; CM व्हावं वाटतं म्हणणाऱ्या अजित पवारांना गोगावलेंचा टोला
8
"शिंदे कसले वाघ, मंत्र्यांचा निधी वळवला जातो, अडचण येताच गावी पळून जातात": अंबादास दानवे
9
Temple: शिवालयाच्या पायरीवर असलेल्या 'या' राक्षसाला नमस्कार करून मंदिरात जाण्याचा प्रघात का?
10
पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा आखाती देशांतील मराठी अनिवासी भारतीयांकडूनही तीव्र निषेध
11
बलुचिस्तानात मोठा खेला...! भारताला पोकळ धमक्या देणारा पाक उघडा पडला; सरकारी इमारतींवर बंडखोरांचा ताबा, लावली आग
12
१३२ सेवा, २४ राज्ये, २८४ जिल्ह्यांना जोडणाऱ्या ‘वंदे भारत’मुळे रेल्वेची किती कमाई होते?
13
Pune Accident: कीर्तन ऐकून घरी परतताना भरधाव मर्सिडीजनं उडवलं; दुचाकीस्वार जागीच ठार
14
Hingoli: डिव्हायडर तोडून टिप्पर थेट ऑटोवर उलटला; टिप्परखाली दबून दोन प्रवाशांचा मृत्यू
15
“प्रत्येकाने सद्भावना मंत्र जोपासावा, महाराष्ट्र धर्म वाचवण्यासाठी काँग्रेसचा सत्याग्रह”
16
कमालच झाली राव! लहान मुलंच म्हणतील फोनला टाटा-बायबाय; फक्त पालकांनी करावं असं काही...
17
मुंबई, पंजाब नाहीतर 'हा' संघ जिंकणार आयपीएलची ट्रॉफी; सुनील गावस्कर यांची भविष्यवाणी
18
पुत्र जन्मला! मराठी अभिनेत्रीच्या घरी पाळणा हलला, गोंडस लेकाला दिला जन्म
19
पत्नीची हत्या करुन मृतदेह पुरला, तीन दिवसांनी हात बाहेर येताच...; दृष्य पाहून पोलिसही हादरले
20
"तुम्ही अजित पवारांना भेटल्या, खरं की खोटं... उत्तर द्या?"; सुषमा अंधारे-अंजली दमानिया सोशल मीडियावर भिडल्या

विकासाला कुणाचाही विरोध होणार नाही

By admin | Updated: December 30, 2016 00:08 IST

नगरपरिषदेत भाजपाकडे स्पष्ट बहुमत तर नगराध्यक्षपद शिवसेनेकडे आहे. हा जनतेने दिलेला कौल आहे.

कांचन चौधरी : नगराध्यक्षांचा पदभार स्वीकारला यवतमाळ : नगरपरिषदेत भाजपाकडे स्पष्ट बहुमत तर नगराध्यक्षपद शिवसेनेकडे आहे. हा जनतेने दिलेला कौल आहे. शहर विकासाला कोणीच विरोध करणार नाही. नगराध्यक्ष म्हणून संपूर्ण यवतमाळकरांनी माझी निवड केली आहे. त्यामुळे सर्वांगीण विकासाला चालना देणार असल्याचे नगराध्यक्ष कांचन बाळासाहेब चौधरी यांनी नगराध्यक्षपदाचा गुरूवारी पदभार स्वीकारल्यानंतर ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. शहरातील पाणी पुरवठ्याचे योग्य नियोजन, शहर स्वच्छता आणि पात्र लाभार्थी घरकूलपासून वंचित राहून नये यासाठी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले. नगरपरिषदेची गत पाच वर्षात प्रशासकीय घडी पूर्णत: विस्कटलेली आहे. यंत्रणा कार्याक्षम करण्यासाठी आवश्यक बदल करणार असल्याचेही त्यांनी सांगितले. जनहिताची कामे करण्यासाठी बहुमताची गरज नाही. कुणाचा वैयक्तीक स्वार्थ आडवा आला तरच विरोध होणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. पदभार स्वीकारते वेळी यावेळी माजी खासदार सदाशिवराव ठाकरे, माजी नगराध्यक्ष बाळासाहेब चौधरी, नगरसेवक गजानन इंगोले, राजेंद्र गायकवाड, किशोर इंगळे, गजानन डोमाळे आदी उपस्थित होते. दरम्यान नवनियुक्त पालकमंत्री मदन येरावार यांनी नगरपरिषदेत येऊन नगराध्यक्ष कांचन चौधरी यांचे स्वागत केले. तर प्रशासनाच्यावतीने मुख्याधिकारी सुदाम धुपे यांनी त्यांचे स्वागत केले. सोमवारी उपाध्यक्ष व स्वीकृत सदस्यांची निवड नगरपरिषदेची सर्र्वसाधारण सभा सोमवारी आयोजित केली आहे. या सभेत उपाध्यक्ष आणि स्वीकृत सदस्यांची निवड केली जाणार आहे. त्यापूर्वी स्वीकृत सदस्यांना जिल्हा प्रशासन अधिकाऱ्यांकडे शनिवारी नामांकन दाखल करावे लागणार आहे. त्यानंतर स्वीकृत सदस्यांची नावे नगराध्यक्षाकडे दिली जाणार आहे. उपाध्यक्षाची निवड सभेतून होणार आहे. उमरखेड नगराध्यक्षांनी बुधवारी सर्वसाधारण सभा आयोजित केली आहे.