शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

शिवशाही बसमध्ये पोलिसांना नो एन्ट्री; तपासकामापायी आर्थिक कोंडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2018 13:08 IST

एसटी महामंडळाने आरामदायी, वातानुकूलित शिवशाही बसेस प्रवाशांच्या सेवेत आणल्या असल्या तरी या शिवशाहीने पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांचे मात्र चांगलेच वांधे केले आहेत.

ठळक मुद्देवॉरंट चालत नाही निमआराम बसही बंदगुन्ह्यांच्या तपासावर परिणाम

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : एसटी महामंडळाने आरामदायी, वातानुकूलित शिवशाही बसेस प्रवाशांच्या सेवेत आणल्या असल्या तरी या शिवशाहीने पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांचे मात्र चांगलेच वांधे केले आहेत. कारण या बसमध्ये पोलिसांना दिला जाणारा वॉरंट चालत नाही. या बस आल्यामुळे महामंडळाने लांबपल्ल्याच्या निमआराम बसेस बंद केल्या आहेत. त्यामुळे तपासाला जाताना पोलिसांची आर्थिक कोंडी होत आहे.पोलिसांना वेगवेगळ्या गुन्ह्यांच्या तपासानिमित्ता अनेकदा जिल्ह्याबाहेर, कधी राज्याच्या टोकावर तर वेळप्रसंगी दुसऱ्या राज्यातसुद्धा जावे लागते. अशा वेळी पोलिसांना रेल्वे किंवा एसटी प्रवासासाठी खात्याकडून वॉरंट दिला जातो. या वॉरंटचे पैसे शासन चुकविते. बहुतांश सीआयडी, आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलिसांना तपासासाठी नेहमीच पुणे, मुंबई व अन्य शहरात दूरवर जावे लागते. सीआयडीच्या यंत्रणेला तर कायमच एकतर उच्च न्यायालयात किंवा पुणे मुख्यालयात येरझारा माराव्या लागतात. त्यासाठी पोलिसांचा सहसा रेल्वेने जाण्याचा कल असतो. मात्र ऐनवेळी रेल्वेचे आरक्षण मिळत नसल्याने पोलिसांना एसटी बसवर अवलंबून रहावे लागते.

कागदपत्रांचे गठ्ठे अन् लांबचा प्रवासत्यातही सोबत तपासाच्या कागदपत्रांचे गठ्ठे व लांबचा प्रवास असल्याने पोलिसांचा आरामदायी बसने जाण्याकडे कल असतो. शिवशाही बसेस आल्याने पोलिसांना हायसे वाटले होते. परंतु प्रत्यक्षात शिवशाहीमध्ये कोणत्याही पासेसला परवानगी नसल्याने पोलिसांचा हिरमोड झाला. शिवशाहीमुळे महामंडळाने यापूर्वी चालविल्या जाणाऱ्या निमआराम बसेसची संख्या घटविली. अनेक ठिकाणी त्या बंदही झाल्या. त्यामुळे पोलिसांवर आता ‘रुटीन’ बसमध्ये जाण्याची वेळ आली आहे. त्याचा परिणाम गुन्ह्यांच्या तपासावर होतो आहे. बाहेरगावी तपासाला जाण्याचे टाळणे, फोनवरूनच खानापूर्ती करणे असे प्रकार वाढले आहेत. त्यातूनच अनेक प्रकरणात तपासाची गती मंदावली आहे. दूरवर तपास कामी जाणाऱ्या पोलिसांसाठी तरी शिवशाहीत ‘पोलीस वॉरंट’ची मुभा द्यावी, अशी एकमुखी मागणी पुढे आली आहे.

इंधनासाठी ‘व्यावसायिकांची’ मदतपोलीस दलात मोठे अधिकारी सोबत असतील तर वाहनाची व्यवस्था होते. परंतु प्रत्येक वेळी वाहन मिळेलच याची शाश्वती नसते. अनेकदा सलोख्याच्या संबंधावर वाहन मिळाले तरी त्यात इंधन कोठून टाकायचे असा प्रश्न पडतो. अशा वेळी ‘व्यावसायिकांची’ मदत घेण्याशिवाय पोलिसांकडे पर्यायही नसतो. शिपाई-जमादार असतील तर त्यांना एसटीने जाण्याशिवाय दुसरा मार्ग नसतो. हे चित्र राज्यात सर्वदूर सारखेच आहे.

टॅग्स :Shivshahiशिवशाही