शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
5
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
6
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
7
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
8
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
9
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
10
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
11
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
12
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
13
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
14
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
15
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
16
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
17
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
18
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
19
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
20
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
Daily Top 2Weekly Top 5

एनआयएच्या पथकाची यवतमाळ जिल्ह्यात धाड; बनावट नोटांविरोधात कारवाई

By सुरेंद्र राऊत | Updated: December 2, 2023 20:45 IST

संशयिताला पहाटे ४ वाजता घेतले ताब्यात

यवतमाळ : राष्ट्रीय तपास यंत्रणेला देशांतर्गत चालणारे बनावट नोटांचे रॅकेट हाती लागले. यातील काही धागेदोरे यवतमाळात असल्याचा संशय आहे. त्यावरून मुंबई येथील एनआयएच्या पथकाने शनिवारी पहाटे ४ वाजता यवतमाळ जिल्ह्यातील आर्णी तालुक्यातील ब्राम्हणवाडा येथे धाड टाकली. तेथून एका संशयिताला ताब्यात घेतले आहे. काही महत्वाचा पुरावाही एनआयए पथकाच्या हाती लागल्याचे सांगण्यात येत आहे. 

एनआयएच्या दिल्ली कार्यालयातून देशभर बनावट नोटा विरोधात धाडसत्र राबविण्यात आले. चार राज्यांमध्ये छापे टाकण्यात आले. महाराष्ट्रातील कोल्हापूर व यवतमाळ दोन जिल्ह्यात धाडी घालण्यात आल्या. यवतमाळातील आर्णी पोलिस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या ब्राम्हणवाडा येथे शनिवारी पहाटे मुंबई एनआयएचे पथक धडकले. यावेळी आर्णी पोलिसांची चमू त्यांच्या मदतीला होती. ब्राम्हणवाडा येथून उत्तम भीमराव चव्हाण याला ताब्यात घेतले. यासोबतच कोल्हापूरमध्ये धाड टाकून संशयित राहुल तानाजी पाटील यालाही ताब्यात घेण्यात आले आहे.

तसेच उत्तरप्रदेशातील शहाजापूर जिल्ह्यातून विवेक ठाकूर, आदित्य सिंग, बल्लारी जिल्ह्यातील महेंद्र यांनाही ताब्यात घेतले आहे. या नेटवर्कच्या माध्यमातून १००, ५००, २०० अशा बनावट चलनी नोटा तयार करून त्याचे देशांतर्गत वितरण केले जात होते, असा आरोप आहे. त्यावरूनच ही कारवाई करण्यात आली. यवतमाळ जिल्ह्यातील ब्राम्हणवाडा येथे केलेल्या कारवाईबाबत स्थानिक पोलिसांकडून दुजोरा देण्यात आला आहे. मात्र पथकाच्या धाडीत नेमके काय हाती लागले याबाबत बोलण्याचे पोलिस अधिकाऱ्यांनी टाळले. निवडणूक असलेल्या राज्यात वितरण केल्याचा संशय 

छत्तीसगड, तेलंगणा या निवडणूक झालेल्या राज्यांमध्ये बनावट नोटांचे वितरण केल्याचा संशय आहे. बनावट नोटा तयार करण्यासाठी देशाच्या सीमावर्ती राज्यातून साहित्य आणले जात होते. व त्याचा वापर केला जात होता. यवतमाळ जिल्ह्यातील संशयित उत्तम हा इतर साथीदारांच्या मदतीने भारतभर या बनावट नोटा पुरविण्याचे काम करीत असल्याचा संशय आहे. त्यातूनच ही कारवाई सुरू आहे.