शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी सत्तेसाठी कधीच हापापलेलो नाही, सर्वाधिक सत्ता..."; अजित पवारांनी मांडलं रोखठोक मत
2
"दादांना विचारतो त्यांनी कुठल्या ज्योतिष्याकडे पाहिलं"; CM व्हावं वाटतं म्हणणाऱ्या अजित पवारांना गोगावलेंचा टोला
3
बलुचिस्तानात मोठा खेला...! सरकारी इमारतींवर बंडखोरांचा ताबा, लावली आग; भारताला पोकळ धमक्या देणारा पाक उघडा पडला
4
१३२ सेवा, २४ राज्ये, २८४ जिल्ह्यांना जोडणाऱ्या ‘वंदे भारत’मुळे रेल्वेची किती कमाई होते?
5
Pune Accident: कीर्तन ऐकून घरी परतताना भरधाव मर्सिडीजनं उडवलं; दुचाकीस्वार जागीच ठार
6
“प्रत्येकाने सद्भावना मंत्र जोपासावा, महाराष्ट्र धर्म वाचवण्यासाठी काँग्रेसचा सत्याग्रह”
7
Sita Navami 2025: संततीप्राप्तीसाठी सीता नवमीचे व्रत कसे व कधी करावे ते जाणून घ्या!
8
भयंकर! ४ वर्षे पालकांनी ३ मुलांना घरात ठेवलेलं कोंडून; कारण ऐकून बसेल मोठा धक्का
9
पुत्र जन्मला! मराठी अभिनेत्रीच्या घरी पाळणा हलला, गोंडस लेकाला दिला जन्म
10
पत्नीची हत्या करुन मृतदेह पुरला, तीन दिवसांनी हात बाहेर येताच...; दृष्य पाहून पोलिसही हादरले
11
लाडकी बहीण योजनेसाठी निधी वळवला; संजय शिरसाट संतापले, म्हणाले, “खाते बंद केले तरी चालेल”
12
"तुम्ही अजित पवारांना भेटल्या, खरं की खोटं... उत्तर द्या?"; सुषमा अंधारे-अंजली दमानिया सोशल मीडियावर भिडल्या
13
“तेव्हा मी केंद्रात होतो, फडणवीस नाही”; जातनिहाय जनगणनेवर पृथ्वीराज चव्हाण स्पष्टच बोलले
14
Tata Motors नं Q4 निकाल आणि डिविडेंडपूर्वी घेतला मोठा निर्णय; ५०० कोटी रुपयांचं आहे प्रकरण
15
"...तर पाकिस्तान हल्ला करेल!"; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची भारताला पोकळ धमकी
16
Tarot Card: 'पेराल ते उगवेल' याची प्रचिती देणारा आठवडा; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य!
17
गर्लफ्रेंडसोबत चायनीज खाताना आईने लेकाला रंगेहाथ पकडलं; रस्त्यात चपलेने मारलं, धू-धू धुतलं
18
'या' कंपनीनं लाँच केला १८० दिवसांचा प्लान; SonyLIV सारख्या OTT चं मिळणार सबस्क्रिप्शन, काय आहे खास?
19
Leopard in Marathi: परीकडे बघून राधा अन् समृद्धी हसली; तिघींची गट्टी जमली
20
क्रिकेटवेडी, बोल्ड फोटो अन् शुबमनसोबत रिलेशनशीपची चर्चा; अवनीत कौर नेमकी आहे तरी कोण?

जिल्हा परिषद गट आणि गणांची नव्याने फेररचना

By admin | Updated: August 20, 2016 00:03 IST

जिल्हा परिषदेचे गट आणि पंचायत समित्यांच्या गणांची नव्याने फेररचना होणार आहे.

२०११ च्या जनगणनेचा आधार : २०१७ मध्ये होणार निवडणूक यवतमाळ : जिल्हा परिषदेचे गट आणि पंचायत समित्यांच्या गणांची नव्याने फेररचना होणार आहे. त्यासाठी सन २०११ ची जनगणना गृहित धरण्यात येणार असून नगरपरिषद प्रभाग रचनेप्रमाणेच सॅटेलाईटव्दारे या गट आणि गणांची पुनर्रचना होण्याचे संकेत आहे. येत्या जानेवारी-फेब्रुवारीत जिल्हा परिषद आणि १६ पंचायत समित्यांची निवडणूक होऊ घातली आहे. आत्तापर्यंत जिल्हा परिषदेचे ६२ गट आणि १२४ गण होते. त्यापूर्वी ६३ गट आणि १२६ गण होते. पाच वर्षांपूर्वी एक गट आणि दोन गण कमी झाले होती. आता पुन्हा ६२ गट आणि १२४ गणांमध्ये कपात होण्याची शक्यता आहे. यवतमाळ नगरपरिषदेत लगतच्या आठ ग्रामपंचायती समाविष्ट झाल्या. तसेच जिल्ह्यातील सहा ठिकाणी नगर पंचायती अस्तित्वात आल्या. त्यामुळे गट आणि गणांची पुनर्रचना करणे आवश्यक झाले आहे. यवतमाळ शहरालगतच्या आठ ग्रामपंचायत नगरपरिषदेत समाविष्ट झाल्या. त्याचप्रमाणे कळंब, राळेगाव, मारेगाव, झरी, बाभूळगाव आणि महागाव या सहा तालुका ठिकाणी नगर पंचायती अस्तित्वात आल्या आहेत. यवतमाळ नगरपरिषदेत जवळपास एक लाख ३० हजारांच्यावर, तर सहा नगर पंचायतीत ४० हजारांच्यावर लोकसंख्या नव्याने सहभागी झाली. त्यामुळे गट आणि गणांच्या मतदार संख्येत घट होणार आहे. या बदलामुळेच आता गट आणि गणांची नव्याने फेररचना करावी लागणार आहे. नवीन फेररचनेत गट आणि गणांची संख्या कमी होण्याचे संकेत आहे. यात यवतमाळला सर्वाधिक फटका बसण्याची शक्यता आहे. यवतमाळ तालुक्यातील किमान दोन ते तीन गट आणि चार ते सहा गण कमी होण्याची शक्यता आहे. तत्पूर्वी विद्यमान समाजकल्याण सभापती लता खांदवे यांचा मतदार संघ असलेला वडगाव गट रद्द झाला आहे. आता पुन्हा दोन ते तीन गट कमी होण्याचे संकेत आहे. तथापि अधिकृतरित्या राज्य निवडणूक आयोगाने या संदर्भात अद्याप कोणत्याच सूचना येथील निवडणूक विभागाला दिल्या नाहीत. मात्र सन २०११ च्या जणनगणेचा आधार घेऊन नवीन गट आणि गणांची फेररचना सॅटेलाईटचा वापर करून होणार आहे. (शहर प्रतिनिधी) कळंब, राळेगाव, महागाव, झरी, बाभूळगाव व मारेगावात अदलाबदल कळंब, राळेगाव, महागाव, झरी, बाभूळगाव व मारेगाव येथे आता नगर पंचायत अस्तित्वात आली. त्यामुळे या तालुक्यातील गट आणि गणांमध्ये मोठ्या प्रमाणात उलथापालथ होण्याची शक्यता आहे. या अदलाबदलीत अनेक गावे पूर्वीच्या गट अथवा गणातून नवीन गट अथवा गणात समाविष्ट होतील. या सहाही शहरातील मतदारांना आता जिल्हा परिषद अथवा पंचायत समिती सदस्यांना निवडून देता येणार नाही. परिणामी या तालुक्यातील गट आणि गणाची मतदार संख्याही कमी होईल. लोकसंख्येच्या प्रमाणानुसार एखादवेळी तेथील गट आणि गणही कमी होतील. मात्र केवळ दोनच गट असलेल्या तालुक्यात यामुळे त्रांगडे निर्माण होण्याची शक्यता बळावली आहे.