शहरं
Join us  
Trending Stories
1
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
4
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
5
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
6
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
7
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
8
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!
9
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
10
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
11
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
12
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
13
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
14
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
15
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
16
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
17
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
18
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
19
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
20
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..

नवजात बालकांसाठी ५० खाटांचे नवे युनिट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2018 22:12 IST

येथील वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात अमेरिकेतील कॅलिफोर्निया विद्यापीठाच्या सहकार्याने ५० बेडचे नवजात शिशू दक्षता कक्ष उभारले जाणार आहे. कॅलिफोर्निया विद्यापीठ, टाटा ट्रस्ट आणि राज्य शासनातर्फे संयुक्तपणे हे युनिट सुरू केले जाईल.

ठळक मुद्देशासकीय वैद्यकीय महाविद्यालय : कॅलिफोर्निया विद्यापीठाचे अर्थसहाय्य, टाटा ट्रस्टकडून पाहणी

रूपेश उत्तरवार।लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : येथील वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात अमेरिकेतील कॅलिफोर्निया विद्यापीठाच्या सहकार्याने ५० बेडचे नवजात शिशू दक्षता कक्ष उभारले जाणार आहे. कॅलिफोर्निया विद्यापीठ, टाटा ट्रस्ट आणि राज्य शासनातर्फे संयुक्तपणे हे युनिट सुरू केले जाईल.शासकीय वैद्यकीय महाविद्यालय अतिदुर्गम भागातील महाविद्यालय म्हणून ओळखले जाते. येथे प्रसूतीकरिता येणाऱ्या महिलांची संख्या सर्वाधिक असते. मात्र शिशू दक्षता कक्षात पुरेशी व्यवस्था नसल्याने नवजात बाळांना खासगी रूग्णालयात उपचारासाठी न्यावे लागते. सर्वसामान्यांना खासगी रूग्णालयात होणारा उपचार महागडा ठरतो. वेळेपूर्वी जन्माला आलेले बाळ, कुपोषित बालके, कावीळ, प्रसूतीदरम्यान किचकट प्रकरणात बाळाला काही दिवस अतिदक्षता कक्षात ठेवले जाते. त्यासाठी शासकीय रूग्णालयात केवळ १४ बेड उपलब्ध आहे. आता नवजात बालकांसाठी स्वतंत्र शिशू संगोपन कक्ष उभारला जाणार आहे. वार्ड क्रमांक १० मध्ये ५० बेड क्षमतेचे हे संगोपन केंद्र राहणार आहे. या कक्षात शासकीय रूग्णालयात प्रसूत होणाºया महिलांच्या बालकांसह बाहेर ठिकाणी प्रसूत झालेल्या बालकांवरही उपचार केला जणार आहे. अमेरिकेतील कॅलिफोर्निया विद्यापीठाने त्याकरिता पुढाकार घेतला आहे. नुकतीच या संदर्भात डॉ.निलीमा राघवन यांनी वैद्यकीय महाविद्यालयाची पाहणी केली. त्यांनी अधिष्ठात्यांची भेट घेतली. त्या अनुषंगाने लागणारी उपकरणे आणि डॉक्टरांची उपलब्धता आहे किंवा नाही, याची त्यांनी माहिती घेतली. डॉक्टरांची कमतरता भासल्यास त्यांची पदे शासकीय स्तरावर मंजूर करून घेतली जाणार आहे. बुधवारी टाटा ट्रस्टचे संचालक डॉ.विनय कोठारी यांनी वैद्यकीय महाविद्यालयात आढावा बैठक घेतली. या बैठकीचा अहवाल राज्य शासनाकडे पाठविला जाणार आहे.खासगी रुग्णालयातील दर भिडले गगणालानवजात शिशूंच्या असलेल्या अतिदक्षता कक्षाचे खासगी रूग्णालयातील दर गगनाला भिडलेले आहेत. यामुळे सर्वसामान्य रूग्णांची आर्थिक लूट होते. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात हा अतिदक्षता कक्ष सुरू झाल्यानंतर खासगी डॉक्टरांच्या आर्थिक लुटीला लगाम बसणार आहे.शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात तयार होणाºया नवजात शिशू अतिदक्षता कक्षामुळे सामान्य ग्राहकांना दिलासा मिळेल. काम युद्धपातळीवर सुरू आहे. आढावा बैठकी सुरू आहे.- डॉ.मनीष श्रीगिरीवारअधिष्ठाता, वैद्यकीय महाविद्यालय, यवतमाळ.

टॅग्स :Yawatmal Medical Collegeयवतमाळ मेडिकल कॉलेज