शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
4
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
5
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
6
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
7
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
8
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
9
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
10
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
11
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
12
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
13
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
14
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
15
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
16
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
17
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
18
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
19
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
20
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
Daily Top 2Weekly Top 5

उदापूर पुनर्वसनाची नवीन प्रक्रिया

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 18, 2018 22:46 IST

टाकळी (डोल्हारी) सिंचन प्रकल्पासाठी पुनर्वसन होत असलेल्या उदापूर गावाच्या पुनर्वसनाची नवीन प्रक्रिया राबवा, असे आदेश जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी दिले. अमरावती उपविभागीय आयुक्त कार्यालयात प्रकल्पग्रस्तांच्या उपस्थितीत आढावा बैठक घेण्यात आली.

ठळक मुद्देजलसंपदा मंत्र्यांचे आदेश : प्रकल्पग्रस्तांच्या उपस्थितीत अमरावतीत आढावा

लोकमत न्यूज नेटवर्कनेर : टाकळी (डोल्हारी) सिंचन प्रकल्पासाठी पुनर्वसन होत असलेल्या उदापूर गावाच्या पुनर्वसनाची नवीन प्रक्रिया राबवा, असे आदेश जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी दिले. अमरावती उपविभागीय आयुक्त कार्यालयात प्रकल्पग्रस्तांच्या उपस्थितीत आढावा बैठक घेण्यात आली. यात प्रकल्पग्रस्तांची बाजू आमदार बच्चू कडू यांनी मांडली. विदर्भ सिंचन महामंडळाचे उपाध्यक्ष सुनील देशमुख यावेळी उपस्थित होते.गावकऱ्यांना विश्वासात न घेता परस्पर खोट्या दस्तावेजाद्वारे पुनर्वसनाची प्रक्रिया राबविण्यात आली. याविषयी प्रकल्पग्रस्तांनी तक्रार केली. यावेळी जिल्हा पुनर्वसन अधिकारी, पाटबंधारे अधीक्षक अभियंता, मध्यम प्रकल्पाचे कार्यकारी अभियंता यांना उपस्थित मंत्र्यांनी विचारणा केली. त्यांनी दिलेल्या उत्तरावरुन पुनर्वसनात मोठ्या प्रमाणात गैरप्रकार झाल्याचे निदर्शनास आले. पुनर्वसन बेकायदेशीर असल्याच्या निष्कर्षाप्रत मंत्री पोहोचले. आतापर्यंत झालेली संपूर्ण प्रक्रिया रद्द करून गावकऱ्यांना विश्वासात घेऊन एका जागेचा ग्रामसभा, गावकऱ्यांच्या सोयीचा ठराव घेवून नवीन पुनर्वसन प्रक्रिया राबवावी, असे आदेश देण्यात आले. आता पुनर्वसनासंदर्भात काय निर्णय लागतो, याकडे उदापूरसह प्रकल्पबाधित गावातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.व्यापाऱ्यांच्या जमिनी खरेदीचा घाटउदापूर ग्रामवासियांना विश्वासात घेण्यात आले नाही. मनमर्जीने पुनर्वसनासाठी जागा निश्चित करण्यात आली. व्यापाऱ्यांच्या जमिनी खरेदी करण्यासाठीचा घाट रचला गेला. दारव्हा सिंचन उपविभागातील उपअभियंता सुधीर पवार यांनी यात महत्वपूर्ण भूमिका पार पाडली. त्यांची तत्काळ बदली करावी, चौकशीत गैरप्रकार आढळल्यास या अभियंत्याला निलंबित करावे, अशी मागणी करण्यात आली. प्रसंगी जलसंपदा मंत्र्यांना प्रकल्पग्रस्तांनी निवेदन सादर केले.तीव्र आंदोलनाचा इशाराआजंती रोडवरील पुनर्वसन रद्द करण्याचा सूचना ना. गिरीश महाजन यांनी केल्या. यानंतरही पुनर्वसन रद्द न झाल्यास आमदार बच्चू कडू यांच्या नेतृत्वात उग्र आंदोलन छेडण्याचा इशारा गावकऱ्यांनी दिला. यावेळी प्रा. अजय दुबे, उदापूरच्या उपसरपंच कविता भोयर, माजी सरपंच रामेश्वर सांगळे, अजय भोयर, प्रकल्पग्रस्त रवींद्र मुंडे, किसनराव मनवर, राजू जुनघरे, पुरुषोत्तम भोयर, श्रीराम इरपाते, नरेश कोकाटे, विलास पवार, संदीप करपते, भोयर, बाळू पवार, विजय श्रृंगारे, नीलेश तोंडे, चौधरी, दिलीप तिजारे, डॉ.वसंत सांगळे, रामहरी कावळे, साधू इंजाळकर, झोडपाटील, गजानन इसाळकर, बबन खोडे, कैलास कटके, पप्पु तायडे, हेमंत भोयर आदी उपस्थित होते.

टॅग्स :Sunil Deshmukhसुनिल देशमुख