शहरं
Join us  
Trending Stories
1
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
2
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
3
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
4
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
5
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
6
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
7
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
8
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
9
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
10
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
11
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
12
"महत्त्वाच्या इमारतींमध्ये अजूनही चिनी cctv; सरकार सत्य दडवतंय"; राहुल गांधी यांचा आरोप
13
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
14
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
15
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
16
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
17
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
18
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
19
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
20
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
Daily Top 2Weekly Top 5

नवीन प्रयोग; नरभक्षक वाघीण शोधायला मुत्राची फवारणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 2, 2018 11:32 IST

गेल्या दीड महिन्यांपासून वनविभागाच्या शोध पथकाला गुंगारा देणाऱ्या नरभक्षक वाघिणीला जेरबंद करण्यासाठी आता नवीन प्रयोग करण्यात येत आहे.

ठळक मुद्देनागपूरच्या महाराज बागेतून आणले दुसऱ्या वाघिणीचे मूत्र

नरेश मानकर ।लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : गेल्या दीड महिन्यांपासून वनविभागाच्या शोध पथकाला गुंगारा देणाऱ्या नरभक्षक वाघिणीला जेरबंद करण्यासाठी आता नवीन प्रयोग करण्यात येत आहे. यासाठी नागपूरच्या महाराज बागेतील एका वाघिणीचे मूत्र आणण्यात आले असून नरभक्षक वाघिणीचा वावर असणाऱ्या भागात हे मूत्र फवारण्यात येत आहे. या मुत्राच्या उग्र वासामुळे ही नरभक्षक वाघीण झाडाझुडूपातून बाहेर येईल व तिला तातडीने जेरबंद करण्यात यश येईल, असा विश्वास शोध पथकाने व्यक्त केला आहे.गेल्या ४७ दिवसांपासून वनविभागाने टी-१ वाघिणीला पकडण्याचे जेवढे प्रयत्न केले, ते सर्व प्रयत्न फोल ठरले आहेत. मध्यप्रदेशातून चार हत्ती आणले. परंतु ते हत्तीही उधळले. वाघिणीला जेरबंद करण्यासाठी आणलेल्या एका पिसाळलेल्या हत्तीनेच महिलेला ठार केले. पाच शार्पशुटर, तीन मोठे पिंजरे, ५०० वन कर्मचारी व खासगी कर्मचाऱ्यांची फौज एवढेच नाही तर वाघिणीचा हवाई शोध घेण्यासाठी पॅरामिटर, इटालीयन कुत्रे आणण्यात आले होते. परंतु याचा काहीही उपयोग झाला नाही. या शोध मोहिमेत लाखो रूपयांचा चुराडा झाला. परंतु नरभक्षक वाघीण हाती लागली नाही. एकटी वाघीण सर्वांनाच भारी पडली. या वाघिणीला जेरबंद करण्यासाठी सर्व शासकीय यंत्रणा कामी लागली. खासगी शिकाऱ्यांचीही मदत घेण्यात आली. परंतु त्याचा काहीही उपयोग झाला नाही.आता वनविभागाने १४ जणांचे बळी घेणाऱ्या या वाघिणीला जेरबंद करण्यासाठी नवीन प्रयोग सुरू केला आहे. दुसऱ्या वाघिणीच्या मुत्राच्या उग्र वासामुळे वाघीण कुठेही झाडाझुडूपात लपून असली तरी ती बाहेर येते, अशी माहिती वनविभागाच्या एका अधिकाऱ्याने दिली. त्यामुळे नागपूरच्या महाराज बागेतील वाघिणीचे मूत्र आणण्यात आले असून ते मूत्र नरभक्षक वाघिणीचे वास्तव्य असणाऱ्या संभाव्य कक्ष क्रमांक ६५२ मध्ये फवारण्यात आले.मूत्र फवारल्यानंतर याच कक्षातील ट्रॅप कॅमेऱ्यात वाघीण कैद झाली असून तिचे पगमार्कही आढळून आले आहेत. त्यामुळे शोधपथकाच्या नरभक्षक वाघिणीला जेरबंद करण्याच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत. याही काळात थंडावलेल्या या शोधमोहिमेला गती आली आहे. नवा प्रयोग यशस्वी होतो की नाही, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

दहशतीमुळे शेतातील कामे पडली ठप्पपांढरकवडा वनविभागातील राळेगाव व पांढरकवडा वनपरीक्षेत्रात नरभक्षक वाघिणीची दहशत अद्यापही कायम असून जंगलाशेजारी असणाऱ्या शेतातील कामे ठप्प झाली आहे. सोयाबीनचे व कपाशीचे पीक शेतात असूनही ते काढण्यासाठी शेतात जायला कुणीही तयार नाही. गावातील मजुरांना मजुरी मिळत नसल्यामुळे काही मजुरांनी गाव सोडून मजुरीसाठी दुसऱ्या गावाकडे धाव घेतली आहे. लोणी, सराटी, बोराटी, भुलगड, खैरगाव, विहिरगाव, येडशी, तेजणी, जिरा, मिरा, सखी, झोटींगधरा, तेजनी आदी गावांमध्ये या नरभक्षक वाघिणीची चांगलीच दहशत आहे.

टॅग्स :Tigerवाघ