शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
5
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
6
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
7
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
8
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
9
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
10
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
11
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
12
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
13
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
14
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
15
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
18
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
19
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
20
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
Daily Top 2Weekly Top 5

नेरचे वली साहेबनगर प्रतिबंधित क्षेत्र घोषित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 8, 2020 05:00 IST

नेर येथे शिक्षक असलेली व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह आली आहे. या व्यक्तीचे मूळ गाव कारंजा आहे. नेर येथे येण्यापूर्वी ती कारंजाला वास्तव्याला होती. तेथेही त्यांनी खासगी डॉक्टरांकडे उपचार घेतला. त्या रुग्णाच्या संपर्कात आलेल्यांना कॉरंटाईन करण्याची प्रक्रिया वाशिम जिल्हा प्रशासनाने हाती घतली आहे. नेर शहरातही तो नागरिक राहात असलेला परिसर प्रतिबंधित क्षेत्र घोषित केला आहे.

ठळक मुद्देनिर्जंतुकाची फवारणी : रुग्णाचे कारंजा कनेक्शन असल्याने शोधाशोध

लोकमत न्यूज नेटवर्कनेर : शहरातील शिक्षक कोरोना पॉझिटिव्ह आल्याने खळबळ निर्माण झाली आहे. वलीसाहेबनगर परिसर पूर्णत: सील करण्यात आला आहे. तसेच वाईत जाणारा रस्ता व रत्नापूर ढेका नगराला जोडणारे रस्ते बंद करण्यात आले आहे. या भागात निर्जंतूक औषधांची फवारणी केली जात आहे.नेर येथे शिक्षक असलेली व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह आली आहे. या व्यक्तीचे मूळ गाव कारंजा आहे. नेर येथे येण्यापूर्वी ती कारंजाला वास्तव्याला होती. तेथेही त्यांनी खासगी डॉक्टरांकडे उपचार घेतला. त्या रुग्णाच्या संपर्कात आलेल्यांना कॉरंटाईन करण्याची प्रक्रिया वाशिम जिल्हा प्रशासनाने हाती घतली आहे. नेर शहरातही तो नागरिक राहात असलेला परिसर प्रतिबंधित क्षेत्र घोषित केला आहे. तेथील सर्व नागरिकांना होम कॉरंटाईन केले आहे. जिल्हाधिकारी एम.डी. सिंह यांनी नेर शहरात येऊन प्रत्यक्ष पाहणी केली व उपस्थित यंत्रणांना सूचना दिल्या. प्रतिबंधित क्षेत्रासह नेर शहरातील नागरिकांनी घराबाहेर पडू नये, असे आवाहन तहसीलदार अमोल पोवार, ठाणेदार प्रशांत मसराम, गटविकास अधिकारी युवराज मेहत्रे, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. रवींद्र दुर्गे, डॉ. प्रदीप खोडवे यांनी केले आहे. सदर शिक्षक नेर येथे वास्तव्यास असताना त्याच्या संपर्कात कोणकोण आले याचा शोध घेतला जात आहे.त्या रुग्णाने कारंजात केली तपासणीकोरोना पॉझिटिव्ह आलेल्या नेर येथील रुग्णाने ३ मे रोजी जिल्ह्याची सीमा ओलांडून कारंजा येथे जावून वैद्यकीय तपासणी केली. तेथील डॉक्टरांना संशय आल्यानंतर त्याला यवतमाळच्या शासकीय रुग्णालयात जाण्याचा सल्ला देण्यात आला. मात्र तत्पूर्वी या रुग्णाने कारंजातील पॅथॉलॉजी, एक्स-रे येथेही तपासणी केल्या. त्यामुळे कारंजातील डॉक्टर दाम्पत्य, त्या खासगी रुग्णालयातील संपूर्ण स्टाफ, पॅथॉलॉजी व एक्स-रे क्लिनिकमधील स्टाफ कॉरंटाईन करण्याची प्रक्रिया वाशिम जिल्हा प्रशासनाने हाती घेतली आहे. जवळपास ७० जणांना कॉरंटाईन केले जाणार आहे.नेर शहर तीन दिवस बंदकोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळल्यामुळे नेर शहर कडकडीत बंद राहणार आहे. पुढील तीन दिवस अत्यावश्यक वस्तूंची दुकानेही बंद ठेवण्यात येणार आहे. नागरिकांनी घराबाहेर पडू नये, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याPoliceपोलिस