शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

नेर तालुक्याची आरोग्यसेवा कुपोषित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 5, 2019 23:46 IST

जनतेच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी असलेले तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र आणि उपकेंद्र यंत्रणेच्या बाबतीत कुपोषित आहे. कर्मचाऱ्यांचा तुटवडा आणि कार्यरत कर्मचाºयांचा कामचुकारपणा यामुळे नागरिकांना दर्जेदार आणि तत्काळ आरोग्यसेवेपासून वंचित राहावे लागत आहे. शिवाय या तालुक्याला औषध तुटवड्याच्याही समस्येला तोंड द्यावे लागत आहे.

ठळक मुद्देकर्मचाऱ्यांचा तुटवडा : अपुरा औषधसाठा, आरोग्य केंद्र नामधारी, उपाययोजनांची मागणी

किशोर वंजारी ।लोकमत न्यूज नेटवर्कनेर : जनतेच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी असलेले तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र आणि उपकेंद्र यंत्रणेच्या बाबतीत कुपोषित आहे. कर्मचाऱ्यांचा तुटवडा आणि कार्यरत कर्मचाºयांचा कामचुकारपणा यामुळे नागरिकांना दर्जेदार आणि तत्काळ आरोग्यसेवेपासून वंचित राहावे लागत आहे. शिवाय या तालुक्याला औषध तुटवड्याच्याही समस्येला तोंड द्यावे लागत आहे.तालुक्यात १७ आरोग्य उपकेंद्र आहेत. यातील पाच ठिकाणी आरोग्य सेवा पुरविण्यासाठी कर्मचारी नाहीत. रिक्त जागांमुळे हे उपकेंद्र शोभेची वास्तू ठरले आहे. मोझर, सातेफळ, खरडगाव, कोव्हळा, चिकणी, उमरठा, मालखेड(बु), वीरगव्हाण, बाणगाव आदी गावांसाठी आरोग्यसेवक कार्यरत आहेत. मात्र त्यांचे दर्शन लोकांना होत नाही.ग्रामीण भागात जलजन्य आजाराने तोंड वर काढले आहे. दूषित पाण्यामुळे विविध प्रकारचे आजार होत आहे. याविषयी लोकांमध्ये जनजागृती आणि उपाययोजनांची जबाबदारी प्राथमिकस्तरावर आरोग्यसेवकांची आहे. दूषित पाण्याचे नमुने घेऊन तपासणीसाठी पाठविण्याचे सौजन्य त्यांच्याकडून दाखविले जात नाही. शिरसगाव, पाथ्रड(गोळे), पिंपळगाव, दहीफळ, बोरगाव, मांगलादेवी, नेर नबाबपूर या गावासाठी तर आरोग्यसेवकच नाही.तालुक्याला आरोग्यसेवा पुरविणाºया केंद्रांमध्ये औषधसाठा पुरविला जातो. मात्र प्रत्यक्ष लोकांपर्यंत पोहोचत नाही. ही औषधी नेमकी जाते कुठे याचा शोध घेण्याची गरज आहे. तालुक्यात तीन प्राथमिक आरोग्य केंद्र आहे. याठिकाणीही आरोग्यसेवेपासून वंचित राहावे लागत असल्याची नागरिकांची ओरड आहे. आरोग्य विभागाच्या विविध योजनाही प्रभावीपणे राबविल्या जात नाही.जिल्ह्याच्या आरोग्य विभागाचे दुर्लक्षनेर तालुक्याची आरोग्य यंत्रणा आजारी आहे. कर्मचाऱ्यांचा तुटवडा, औषधांची लावली जात असलेली विल्हेवाट. यामुळे नागरिक त्रस्त आहेत. याविषयी काही जागरूक नागरिकांकडून अनेकदा तक्रारी झाल्या. मात्र याकडे सातत्याने होत असलेल्या दुर्लक्षामुळे कर्मचाऱ्यांचे मनोबल वाढत चालले आहे. जिल्ह्याच्या आरोग्य यंत्रणेने या विषयाकडे लक्ष द्यावे, अशी मागणी आहे.