शहरं
Join us  
Trending Stories
1
टॅरिफबाबत भारत आणि अमेरिकेमध्ये चर्चेचे दरवाजे अजूनही खुले, दोन्हीकडून मिळाले संकेत  
2
"रशिया युक्रेन युद्ध मोदींचे" अमेरिकन राजदूताने भारताला धरलं जबाबदार, टॅरिफ कमी करण्यासाठी ठेवली अट
3
पुतिन नव्हे..., आता झेलेन्स्कींवरच भडकले ट्रम्प, म्हणाले, "युद्ध..., युक्रेनने ऐकले नाही, तर बंदी घालेन!"
4
बुलढाणा मतदारसंघातील मतांच्या फेरमोजणीची मागणी, पराभूत उमेदवार जयश्री शेळकेंचा हायकोर्टात अर्ज
5
जामीन अर्जावरील सुनावणी ४३ वेळा पुढे ढकलल्याबद्दल सर्वोच्च न्यायालयाची नाराजी, आरोपीला दिलासा
6
आजचे राशीभविष्य, २८ ऑगस्ट २०२५: मानहानी होण्याची शक्यता, विधायक कार्य हातून घडेल
7
जम्मू-काश्मीरमध्ये पावसाने हाहाकार, वैष्णोदेवी मार्गावरील भूस्खलन घटनेतील मृतांची संख्या ४१ वर, जम्मू-उधमपूरमध्ये ११५ वर्षांतील रेकॉर्ड झाले ब्रेक
8
ट्रम्प यांच्या सूचनेनंतर पाच तासांतच शस्त्रसंधी, मतदार अधिकार यात्रेत राहुल गांधी यांचा आरोप
9
वर्षानुवर्षे खटला चालणे, हे शिक्षेसारखेच. सर्वोच्च न्यायालयाने व्यक्त केली खंत
10
मराठा वादळ मुंबईच्या दिशेने, आंदोलनाला केवळ एक दिवसासाठी सशर्त परवानगी
11
शाळांमध्येच होणार विद्याथ्यांचे आधार बायोमेट्रिक अपडेट, १७ कोटी आधार क्रमांक अजूनही प्रलंबित; पालकांचा वेळ, श्रम व त्रास वाचणार
12
तब्बल २० लाख नोकऱ्या धोक्यात ? ट्रम्प टॅरिफचा भारताला जबर फटका
13
वीज कोसळल्याने चौघांचा मृत्यू; मृतांमध्ये आईसह तरुण मुलाचा समावेश, धापेवाडा व धामणगाव शिवारातील घटना
14
पश्चिम विदर्भात अतिवृष्टीचा सहा लाख हेक्टरला फटका, ऑगस्टमध्ये सर्वाधिक नुकसान; कृषी विभागाचा अहवाल
15
'पहिला देश, नंतर व्यापार'! डोनाल्ड ट्रम्प यांच्या 'टॅरिफ'नंतरही भारत झुकला नाही; मोदी सरकारने दिला हा संदेश
16
"जे उचकायचं ते उचका, मी कोणाच्या बापाला घाबरत नाही"; चित्रा वाघांचा मनोज जरांगेंवर पलटवार
17
पावसाचा हाहाकार! चीनमध्ये १.८४ लाख कोटींचं नुकसान; पाकिस्तानमध्ये ३०० जणांचा मृत्यू, भारतात...
18
मिनियापोलिस शहरातील शाळेवर हल्ला; तिघांचा मृत्यू, अनेक विद्यार्थी जखमी
19
कर्जाच्या ओझ्याखाली दबला पाकिस्तान; IMFच्या बेलआऊट पॅकेजनंतरही अर्धा देश उपाशी!
20
Vaishno Devi Landslide: ना सावरण्याची संधी मिळाली, ना पळण्याची... प्रत्यक्षदर्शींनी सांगितली आपबिती

नेर तालुक्यात रानडुकरांच्या हैदोसाने पिके उद्ध्वस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 10, 2020 05:00 IST

शिरसगाव येथील राहुल खडसे या शेतकऱ्याने दोन एकर शेतात भाजीपाला शेती सुरू केली आहे. सेंद्रीय पद्धतीने भाजीपाला पिकवून तो आपल्या कुटुंबाची गुजरान करतो. यावर्षीसुद्धा त्याने सोयाबीन या पारंपरिक पिकाला बगल देत वांगे, भेंडी, गवार, बरबटी यासारखा भाजीपाला शेतात लावला. मेहनतीला रंगही आला. भाजीपाला पीक बहरत असतानाच एका रात्री रानडुकराने संपूर्ण भाजीपाला पीकच उद्ध्वस्त केले.

ठळक मुद्देहल्ल्यात जीवितालाही धोका : शेतकऱ्यांची पीक वाचविण्याची धडपड, अनेकांनी बदलविली पीक पद्धती

किशोर वंजारी ।लोकमत न्यूज नेटवर्कनेर : तालुक्यातील शेतकऱ्यांनी अनेक संकटाचा सामना करत यावर्षीच्या खरीप हंगामाची पेरणी केली आहे. पिकलेला माल बाजारात विकण्यासाठी शेतकऱ्यांना सर्वाधिक संघर्ष करावा लागत आहे. त्यामुळे काही शेतकऱ्यांनी आपल्या पीक पद्धतीत बदल करत भाजीपाल्याची लागवड केली. मात्र रानडुक्कर व इतर वन्य प्राण्यांमुळे शेतमालाचे प्रचंड नुकसान होत आहे. पीक वाचवावे कसे या विवंचनेत शेतकरी आहे.शिरसगाव येथील राहुल खडसे या शेतकऱ्याने दोन एकर शेतात भाजीपाला शेती सुरू केली आहे. सेंद्रीय पद्धतीने भाजीपाला पिकवून तो आपल्या कुटुंबाची गुजरान करतो. यावर्षीसुद्धा त्याने सोयाबीन या पारंपरिक पिकाला बगल देत वांगे, भेंडी, गवार, बरबटी यासारखा भाजीपाला शेतात लावला. मेहनतीला रंगही आला. भाजीपाला पीक बहरत असतानाच एका रात्री रानडुकराने संपूर्ण भाजीपाला पीकच उद्ध्वस्त केले. दोन महिन्यांपासून कष्ट करून उभे केलेले पीक रानडुक्कर व इतर वन्य प्राण्यांनी काही तासात नष्ट केले. आता राहुलपुढे मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. दिवसरात्र पिकाच्या संगोपनाची तयारी आहे. तसे प्रयत्नही केले. मात्र रात्रीच्या काळोखात रानडुकरासारख्या हिंस्त्र प्राण्यांपासून भाजीपाला पिकाचे संरक्षण करणे म्हणजे स्वत:चा बळी देण्याचा प्रकार आहे. रानडुकराच्या हल्ल्यात अनेक शेतकºयांनी जीव गमावला, काहींना अपंगत्वही आले. आता त्या कुटुंबात शेती करणाराच उरला नाही, अशी स्थिती आहे.वनविभागाची मदत ठरते तुटपुंजीवनविभाग शेतकऱ्यांना मदतीच्या नावाखाली अत्यल्प मोबदला देतो यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान भरून निघत नाही. शिवाय वन्य प्राण्यांनी पिकांचे नुकसान केल्याची तक्रार केल्यानंतरही त्याचा पंचनामा करण्यासाठी वनविभागाची यंत्रणा त्यांच्या सोयीने शेतात पोहोचते. त्यामुळे नुकसानीचे प्रमाण दिवसागणिक वाढत जात आहे. याकरिता वन विभागाने ठोस उपाययोजना करावी, अशी मागणी होत आहे.

टॅग्स :agricultureशेतीFarmerशेतकरी