लोकमत न्यूज नेटवर्कनेर : चोरीच्या सागवानाचे फर्निचर तयार करून विकणाऱ्यास नेर वनविभागाच्या पथकाने अटक करून ५० हजारांचे सागवान जप्त करण्यात आले. जगन रामजी शेंडे (रा.बोरगाव ) असे या सुताराचे नाव आहे.सागवान चोरून फर्निचर विकण्याचा व्यवसाय जगनने सुरू केला होता. विविध साहित्या तयार करून तो विकत होता. यापूर्वी त्याच्यावर दोनवेळा कारवाई करण्यात आली. बुधवारी सकाळी ११ वाजता सोनखास वनपरिक्षेत्रात गस्तीवर असलेल्या पथकाला जगन सागवान तोडताना आढळला. त्याला ताब्यात घेऊन त्याच्या घराची झडती घेण्यात आली. त्याठिकाणी विविध लाकडी साहित्य आढळून आले. जप्त करण्यात आलेल्या सागवानी वस्तूची किंमत ५० हजार रुपये असल्याचे वनविभागाने सांगितले.ही कारवाई वनपरिक्षेत्र अधिकारी मनोहर पुंड, राजेंद्र डेहनकर, आर.एन. कठाडे, एन.एस. बिजवार, गोविंद राठोड, आर.एम. लढी, टी.एस. बिजवार, गोविंद राठोड, धनराज राठोड, टी.एन.पुनसे, प्रदीप निवल, महालक्ष्मी कापडे, विशाखा चिंचोळे, उज्ज्वला गोळे, प्रिया राऊत आदींनी पार पाडली.
नेरमध्ये चोरीच्या सागवानाचे फर्निचर जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 27, 2017 22:00 IST
चोरीच्या सागवानाचे फर्निचर तयार करून विकणाऱ्यास नेर वनविभागाच्या पथकाने अटक करून ५० हजारांचे सागवान जप्त करण्यात आले. जगन रामजी शेंडे (रा.बोरगाव ) असे या सुताराचे नाव आहे.
नेरमध्ये चोरीच्या सागवानाचे फर्निचर जप्त
ठळक मुद्देचोरीच्या सागवानाचे फर्निचर तयार करून विकणाऱ्यास नेर वनविभागाच्या पथकाने अटक करून ५० हजारांचे सागवान जप्त करण्यात आले.