शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांचा भारतावर २५ टक्के टॅरिफ बॉम्ब; १ ऑगस्टपासून लागू होणार आयात शुल्क, दंडही आकारणार
2
भारत-पाक युद्ध तिसऱ्या देशाने थांबवले नाहीच; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी खोडला दावा
3
‘लाडकी बहीण’च्या लाभार्थी महिला कर्मचाऱ्यांवर कारवाई; राज्य सरकारने जारी केले आदेश
4
मालेगाव खटल्याचा निकाल आज; १७ वर्षांनी विशेष NIA कोर्ट निर्णय देणार, संपूर्ण देशाचे लक्ष
5
संघर्षाचा शेवट गोड! तिसऱ्या मजल्यावरून ३९ व्या मजल्यावर; बीडीडीवासीयांचा आनंद गगनात मावेना
6
सर्वांत महाग-शक्तिशाली निसार उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण; पृथ्वीची प्रत्येक इंच जमीन मॅप करणार
7
“मोदी यांच्या आचारसंहिता भंगप्रकरणी कोर्टात जाणार, निवडणूक आयोगाची कारवाईस टाळाटाळ”: चव्हाण
8
कृषी खात्यातील कथित भ्रष्टाचाराची चौकशी करा!; सुरेश धस यांचे मुख्यमंत्र्यांना पुन्हा पत्र
9
डिझेल दर सवलतीमुळे एसटीचे ११.८ कोटी वाचणार; स्पर्धात्मक निविदेमुळे महामंडळाला फायदा
10
देशातील विमानांमध्ये सुरक्षेच्या २६३ त्रुटी! सर्वाधिक एअर इंडिया, तिसऱ्या क्रमांकावर इंडिगो
11
मुंडेंचे नाव आले अन् माझा छळवाद सुरू झाला: अण्णा डांगे; भाजपात फेरप्रवेश, मन केले मोकळे
12
अतिक्रमित जमिनींचा मिळणार मालकी हक्क, ३० लाख कुटुंबांना लाभ; चंद्रशेखर बावनकुळेंची माहिती
13
रशियात ८.८ तीव्रतेचा भूकंप; जपान, अमेरिकेत त्सुनामीसारख्या लाटांचे थैमान; जगात भीतीचे ‘हादरे’
14
एकनाथ शिंदे दिल्लीत, देवेंद्र फडणवीस राज्यपालांच्या भेटीला; महायुतीत काहीतरी मोठं घडतंय? 
15
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे १५०० रुपये कधी मिळणार? जाणून घ्या
16
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?
17
"बळजबरी आणि दबावाने काहीही..."; डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ इशाऱ्याला चीनचे जशास तसे उत्तर
18
सारा तेंडुलकरची मैत्रीण बनली दिल्ली प्रीमियर लीगची स्पोर्ट्स अँकर, कोण आहे 'ती'? जाणून घ्या
19
मोटो जी ८६ पॉवर 5G भारतात लॉन्च, जाणून घ्या खिसियत आणि किंमत!
20
ड्रग्ज पार्टीच्या कारवाईचे व्हिडिओ व्हायरल कोणी केले? रोहिणी खडसे यांचा पोलिसांना सवाल

नेर, राळेगावात बंद संमिश्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 30, 2020 06:00 IST

मौलाना रिजवान कुरैशी, मुन्ना शेख, सुनील गवई, नजीर राही यांच्या नेतृत्त्वात शहरातून मोर्चा काढून व्यापाऱ्यांना बंदचे आवाहन करण्यात आले. याला प्रतिसाद देत संपूर्ण प्रमुख बाजारपेठ बंद ठेवली होती. देशात अर्थव्यवस्था ढासळत आहे, महागाईचा निर्देशांक उच्चांक गाठत आहे, बेरोजगारीचा प्रश्न गंभीर झाला आहे, विविध क्षेत्रात मनुष्यबळाचा अभाव आहे हे प्रश्न दुर्लक्षित करून सीएए, एनआरसी कायदा आणला.

ठळक मुद्देसीएए, एनआरसी कायदा रद्द करा : बाभूळगाव, नेर, कळंब येथे तालुका प्रशासनाला निवेदन

लोकमत न्यूज नेटवर्कनेर/राळेगाव/बाभूळगाव : असंवैधानिक सीएए व एनआरसी कायद्याविरोधात विविध संघटनांनी बुधवारी बंदची हाक दिली होती. या बंदला नेर शहरात संमिश्र प्रतिसाद मिळाला. या बंदला विविध २० संघटनांनी पाठिंबा देत सदर कायदा रद्दची मागणी करण्यात आली.मौलाना रिजवान कुरैशी, मुन्ना शेख, सुनील गवई, नजीर राही यांच्या नेतृत्त्वात शहरातून मोर्चा काढून व्यापाऱ्यांना बंदचे आवाहन करण्यात आले. याला प्रतिसाद देत संपूर्ण प्रमुख बाजारपेठ बंद ठेवली होती. देशात अर्थव्यवस्था ढासळत आहे, महागाईचा निर्देशांक उच्चांक गाठत आहे, बेरोजगारीचा प्रश्न गंभीर झाला आहे, विविध क्षेत्रात मनुष्यबळाचा अभाव आहे हे प्रश्न दुर्लक्षित करून सीएए, एनआरसी कायदा आणला.वंचित बहुजन आघाडी, भारिप-बहुजन महासंघ, एमआयएम, भीम तरुण उत्साही मंडळ, भारतीय बौद्ध महासभा, मौलाना अबुल कलाम आझाद विचार मंच आदी संघटनांनी बंदमध्ये सहभाग नोंदविला. डॉ. अशोक खोब्रागडे, संघमित्रा गायकवाड, अरविंद पाटील, मनोहर देशमुख, बापूराव रंगारी, अशोक फुलझलके, प्रवीण रंगारी, मनोज झोपाटे, रवी मुंदाने, रेहान खान, प्रमोद गायकवाड, सिद्धांत मिसळे, लक्ष्मण वानखडे, सुभाष गायकवाड, अन्सार शहा, वंदना मिसळे, चंदा मिसळे, प्रीती गवई, रत्ना मिसळे, शोहेब खान, अब्दुल बाशीद, अ‍ॅड. लतिफ मिर्झा, अन्सार शहा आदींनी पुढाकार घेतला. ठाणेदार पितांबर जाधव, पोलीस उपनिरीक्षक धीरज राऊत, राजेश चौधरी, प्रदीप खडके, राजू भगत, नितीन कडुकर, राजेश भगत यांनी चोख पोलीस बंदोबस्त ठेवला होता.कळंब येथे तहसीलदारांना निवेदनकळंब : सीएए व एनआरसी कायदा रद्द करण्यात यावा, या मागणीसाठी येथे विविध संघटनांनी तहसीलदारांना निवेदन सादर केले. प्रतीक भुजाडे, ओमप्रकाश भवरे, मधुकर अलोणे, लक्ष्मण भावे, सुनील लोणकर, गफ्फार भाई, अब्दुल खतीब, दीपक ब्राह्मणे आदींनी निवेदन सादर केले. या शिष्टमंडळाने तहसीलदारांकडे आपल्या तीव्र भावना व्यक्त केल्या.राळेगावात महिलांचा उत्स्फूर्त सहभागराळेगाव : सीएए व एनआरसी विरोधात राळेगाव शहरात बंदला संमिश्र प्रतिसाद मिळाला. तत्पूर्वी येथील क्रांती चौकातून रॅली काढण्यात आली. यामध्ये महिलांचा मोठा सहभाग होता. शहरातील विविध भागातून मार्गक्रमण करत ही रॅली खरेदी विक्री संघ कार्यालय परिसरात पोहोचली. याठिकाणी मोर्चाच्या आयोजकांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. बहुजन क्रांती मोर्चाचे संजय इंगोले यांच्या नेतृत्त्वात तहसीलदारांना निवेदन सादर करण्यात आले. तत्पूर्वी शहरातील काही शाळांना सुटीही दिली होती.बाभूळगाव येथे ‘ईव्हीएम’चाही प्रश्न मांडलाबाभूळगाव : बहुजन क्रांती मोर्चासह विविध संघटनांनी बुधवारी येथील तहसीलदारांना राष्ट्रपती यांना पाठविण्यासाठी निवेदन सादर केले. सीएए व एनआरसी कायदा रद्द करावा, ही मागणी करण्यात आली. यासोबतच ईव्हीएमद्वारे होणारी निवडणूक प्रक्रिया थांबविण्याचीही मागणी निवेदनातून केली आहे. याशिवाय नागरिकांचे विविध प्रश्न मांडण्यात आले आहे. बहुजन क्रांती मोर्चाचे सुरेंद्र परडखे, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर अध्यक्ष सैयद जहीर, शेख शहेजाद, सुधाकर दातार, अनिकेत राऊत, किरण लोहोटे, मिलिंद दातार, विजयराज शेगेकर आदी उपस्थित होते. 

टॅग्स :National Register of Citizensराष्ट्रीय नागरिकत्व नोंदयादी