शहरं
Join us  
Trending Stories
1
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
2
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
3
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
4
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
5
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
6
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
7
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
8
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
9
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
10
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
11
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
12
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
13
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
14
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
15
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
16
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
17
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
18
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
19
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
20
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

मृतदेहासह नेर पोलीस ठाण्यावर धडक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2019 21:13 IST

तालुक्यातील पांढरी येथे विनयभंगाच्या वादातून युवकावर दोघांनी चाकू हल्ला केला. या युवकाचा उपचारादरम्यान गुरुवारी यवतमाळात मृत्यू झाला. त्यानंतर मृताच्या कुटुंबीयांनी चाकूहल्ला करणाऱ्यांना तत्काळ अटक करा, या मागणीसाठी मृतदेह घेऊन दुपारी नेर ठाण्यासमोर आंदोलन केले.

ठळक मुद्देप्राणघातक हल्ल्यातील युवकाचा मृत्यू : खुनाचा गुन्हा दाखल, आरोपी फरारच

लोकमत न्यूज नेटवर्कनेर : तालुक्यातील पांढरी येथे विनयभंगाच्या वादातून युवकावर दोघांनी चाकू हल्ला केला. या युवकाचा उपचारादरम्यान गुरुवारी यवतमाळात मृत्यू झाला. त्यानंतर मृताच्या कुटुंबीयांनी चाकूहल्ला करणाऱ्यांना तत्काळ अटक करा, या मागणीसाठी मृतदेह घेऊन दुपारी नेर ठाण्यासमोर आंदोलन केले. काही तासानंतर ठोस आश्वासन मिळाल्याने त्यांनी आंदोलन मागे घेतले.महेश भिवाजी तायडे (२३) रा. शिरसगाव पांढरी असे मृताचे नाव आहे. ३० डिसेंबरला सायंकाळी विनयभंग केल्याच्या कारणावरून आरोपी अजय डबले (२२), पियूष डबले (२०) व त्यांच्या मित्रांनी सर्व रा. अंबिकानगर यवतमाळ यांनी महेशवर चाकूहल्ला केला. यात तो गंभीर जखमी झाला. त्यानंतर त्याला यवतमाळ शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. नेर पोलिसांनी चाकूहल्ला करणाºयांविरोधात गुन्हा दाखल केला. मात्र पाच दिवसांपासून अटकेची कारवाई करण्यात आली नाही. दरम्यान, महेशचा मृत्यू झाला. यामुळे संतापलेल्या तायडे कुटुंबीयांनी थेट नेर पोलीस ठाण्यात धाव घेतली. महेशच्या खुनातील आरोपींना अटक होत नाही तोपर्यंत अंत्यसंस्कार करणार नाही, असा पवित्रा त्यांनी घेतला.तायडे कुटुंबीयांची पोलिसांनी समजूत काढण्याचा प्रयत्न केला. मात्र ते जुमानत नव्हते. शेवटी महसूल राज्यमंत्री संजय राठोड यांच्या स्वीय सहायकाने मध्यस्थी केल्यानंतर वाद निवळला. तायडे कुटुुंबीयांनी महेशवर अंत्यसंस्कार करण्याचे मान्य केले. तणाव निर्माण झाल्याने उपविभागीय पोलीस अधिकारी नीलेश पांडे घटनास्थळी दाखल झाले. ठाणेदार अनिल किनगे यांनी पांढरी येथे चोख पोलीस बंदोबस्त लावला.बंदोबस्तातच महेशवर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यानंतर भिवाजी तायडे यांच्या तक्रारीवरून अष्टशिला डबले, भानूदास धवने, अवधुत डबले, महोदव धवने यांच्या विरोधात गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरू होती.

टॅग्स :MurderखूनPoliceपोलिस