लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : जगभरात आज आदिवासींची सुमारे दहा कोटी लोकसंख्या आहे. समाजातील प्रत्येकाने त्यांना यथार्थ मदत करावी, त्यांचे जीवनमान उंचावण्यास हातभार लावावा, कारण आजही या समाजातील काही लोक दारिद्र्य, भूकबळी यासारख्या समस्यांनी ग्रस्त आहे. अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांनी संशोधन करून नवनवीन उपकरणांद्वारे आदिवासींचा जीवनस्तर उंचावण्याचा प्रयत्न करणे गरजेचे आहे, असे मत डॉ. प्रकाश आमटे व डॉ. मंदाकिनी प्रकाश आमटे यांनी प्रकट मुलाखतीत मांडले.येथील जगदंबा अभियांत्रिकी महाविद्यालयात डॉ. प्रकाश व डॉ. मंदाकिनी यांची प्रगट मुलाखत पार पडली. त्यांचा सन्मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला. या सन्मानपत्राचे वाचन यवतमाळ आकाशवाणीचे उद्घोषक प्रमोद बाविस्कर यांनी केले. लोकबिरादरी प्रकल्प हेमलकसाचे संस्थापक असलेले डॉ. प्रकाश व डॉ. मंदाकिनी यांनी आपला जीवनक्रम, सामाजिक कार्य, मिळालेली प्रेरणा, समाजापुढील समस्या यावेळी मांडल्या.विवाह अत्यंत साध्या पद्धतीने आणि रविवारच्या मुहुर्तावर संपन्न झाला. समाजकार्याची प्रेरणा डॉक्टरकीचे शिक्षण घेतल्यानंतर बाबा व तार्इंच्या संस्कारातून मिळाली. इतर क्षेत्राचा विचारही मनात शिरला नाही. लोकबिरादरी प्रकल्पात वीज, पाणी, रस्त्याचा अभाव असल्याने काम करणे अत्यंत खडतर प्रवास होता. सुरुवातीला माडिया या आदिवासी लोकांबरोबर संवादात अनेक अडचणी येत होत्या. डॉ. मंदाकिनी आमटे यांनी स्थानिक आदिवासींची भाषा व मराठी भाषा यासंदर्भात एक छोटा शब्दकोष तयार करून संभाषणाच्या समस्येवर मात केली. त्यामुळे या लोकांमध्ये जवळीक वाढली व त्यांच्या आरोग्य समस्यांवर उपचार करणे सोपे झाले.आजच्या परिस्थितीत कोरोनासारख्या व्हायरसद्वारे होणारे संक्रमण हा प्रश्न निसर्गाचा समतोल न राखल्यामुळेच उद्भवला आहे. मानवाने आपल्या गरजा नियंत्रित ठेवणे आवश्यक आहे. निसर्गाचा समतोल राखावा, पर्यावरणाचा ºहास टाळावा, असे आवाहन डॉ. आमटे यांनी केले.लोकबिरादरीतून आर्थिक संपन्नतेकडेलोकबिरादरी प्रकल्पाद्वारे जलसंधारणाचे उपक्रम राबविले जात आहे. त्याद्वारे मत्स्य उत्पादनासारखे उद्योग उभारून आदिवासी आर्थिक संपन्नतेकडे जात आहे. शेतीकडेसुद्धा लक्ष देऊन अन्नधान्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण होण्याचा प्रयत्न करत आहे. या कार्यात त्यांची तिसरी पिढी डॉ. अनिकेत व स्नूषा अनघा अग्रेसर आहे. आदिवासी भागात इंग्रजी माध्यमांच्या शाळा सुरू करून उच्च शिक्षणाची दालनेसुद्धा उपलब्ध करून दिली जात आहे, असे डॉ. आमटे म्हणाले.
आदिवासी समाजाचा जीवनस्तर उंचावण्याची गरज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2020 06:00 IST
जगदंबा अभियांत्रिकी महाविद्यालयात डॉ. प्रकाश व डॉ. मंदाकिनी यांची प्रगट मुलाखत पार पडली. त्यांचा सन्मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला. या सन्मानपत्राचे वाचन यवतमाळ आकाशवाणीचे उद्घोषक प्रमोद बाविस्कर यांनी केले. लोकबिरादरी प्रकल्प हेमलकसाचे संस्थापक असलेले डॉ. प्रकाश व डॉ. मंदाकिनी यांनी आपला जीवनक्रम, सामाजिक कार्य, मिळालेली प्रेरणा, समाजापुढील समस्या यावेळी मांडल्या.
आदिवासी समाजाचा जीवनस्तर उंचावण्याची गरज
ठळक मुद्देप्रकाश व मंदाकिनी आमटे : प्रकट मुलाखतीत मांडले अनुभव, पर्यावरणाचा ऱ्हास टाळण्याचे केले आवाहन