शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
4
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
5
मिरा-भाईंदरमधील उड्डाणपूलाचा आकार बाटलीसारखा का? एमएमआरडीएच्या कामावर फडणवीसांचं स्पष्टीकरण
6
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
7
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
8
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
9
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
10
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
11
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
12
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
13
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
14
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
15
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
16
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
17
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
18
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
19
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

नेर येथे पीक विम्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे निवेदन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 13, 2019 21:04 IST

तालुक्यातील शेतकऱ्यांना पीक विम्याचा लाभ तत्काळ देण्यात यावा, या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे तहसीलदारांना निवेदन देण्यात आले. यासंदर्भात योग्य ती कार्यवाही केली जाईल, असे आश्वासन देण्यात आले.

लोकमत न्यूज नेटवर्कनेर : तालुक्यातील शेतकऱ्यांना पीक विम्याचा लाभ तत्काळ देण्यात यावा, या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे तहसीलदारांना निवेदन देण्यात आले. यासंदर्भात योग्य ती कार्यवाही केली जाईल, असे आश्वासन देण्यात आले.सन २०१८-१९ या हंगामात पीक आणेवारी ५० टक्क्याच्या आत असल्यामुळे शासनाने नेर तालुका दुष्काळग्रस्त घोषित केला आहे. त्यावेळी तालुक्यातील नागरिक आणि शेतकऱ्यांना विविध प्रकारच्या सुविधा उपलब्ध करून देणे आवश्यक होते. विमाधारक शेतकºयांना पीक विमा लागू होईल, अशी अपेक्षा होती. मात्र ठराविक शेतकºयांना विम्याचा लाभ मिळाला. तालुक्यात सोयाबीन, कापूस, तूर ही प्रमुख पिके आहेत. या पिकांचा मोठ्या प्रमाणात विमा उतरविण्यात आला होता. शासनाने कोणत्या पिकाला किती विमा द्यावा, याची आकडेवारीही प्रशासनाकडे उपलब्ध नाही. यावर्षीचा खरीप हंगाम सुरू होऊनही विम्याची रक्कम शेतकºयांना मिळाली नाही. सर्व शेतकºयांना लाभ मिळावा, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.निवेदन देताना राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस वसंत घुईखेडकर, नेर तालुका अध्यक्ष सुनील खाडे, नगरसेवक सुभाष भोयर, तन्वीर खाँ पठाण, अ‍ॅड. बाबा चौधरी, युवराज अर्मळ, नानासाहेब भोकरे, इरफान अकबानी, अमोल घरडे, पद्माकर राऊत, नीलेश देशमुख, बाळासाहेब गावंडे, संदीप चौधरी, अ‍ॅड. दिलीप देशमुख, प्रकाश घरडे, गजानन गोळे आदी उपस्थित होते.

टॅग्स :Crop Insuranceपीक विमाNCPराष्ट्रवादी काँग्रेस