शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
5
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
6
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
7
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
8
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
9
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
10
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
11
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
12
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
13
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
14
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
15
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
16
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
17
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
18
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
19
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

आर्णीतून राष्ट्रवादीची ‘जवाब दो’ पदयात्रा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 29, 2018 21:44 IST

राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे सोमवारपासून आर्णीतून सरकारला जाब विचारण्यासाठी जवाब दो पदयात्रा सुरू केली. यात्रा सुरू करताना पक्षाचे जिल्हाध्यक्ष आमदार ख्वाजा बेग यांनी सरकारला थापा मारणे बंद करा, असा इशारा दिला.

ठळक मुद्देआमदार ख्वाजा बेग : सरकारने आता थापा मारणे थांबवावे, आधी आश्वासने पूर्ण करा

लोकमत न्यूज नेटवर्कआर्णी : राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे सोमवारपासून आर्णीतून सरकारला जाब विचारण्यासाठी जवाब दो पदयात्रा सुरू केली. यात्रा सुरू करताना पक्षाचे जिल्हाध्यक्ष आमदार ख्वाजा बेग यांनी सरकारला थापा मारणे बंद करा, असा इशारा दिला.आर्णी येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्मारकापासून जवाब दो पदयात्रेला सुरुवात झाली. यावेळी मार्गदर्शन करताना आमदार ख्वाजा बेग यांनी सरकारवर सडकून टीका केली. केंद्र व राज्य सरकारने निवडणुकीपूर्वी विविध घोषणा दिल्या होत्या. जनतेला अनेक आश्वासने दिली होती. प्रत्यक्षात सामान्य जनतेच्या हाती काहीच पडले नाही, असा आरोप त्यांनी केला. याचाच जाब विचारण्यासाठी राष्ट्रवादीतर्फे जवाब दो पदयात्रा सुरू करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.शासनाने शेतकरी, विद्यार्थी, बेरोजगार तरुण, महिला, व्यापारी या सर्वांसाठी काहीही ठोस केले नाही. शेतकऱ्यांचा शेतमाल खरेदी केला जात नाही. कर्जमाफी पूर्णपणे झाली नाही. अनेकांना पीककर्ज मिळाले नाही. बोंडअळीचे अनुदानसुद्धा मिळाले नाही. त्यामुळे हे सरकार अपयशी ठरल्याचा आरोप आमदार बेग यांनी केला. पदयात्रा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार आहे. वसंतराव घुईखेडकर, नाना गाडबैले, क्रांती धोटे, डॉ.आरती फुपाटे, मनीषा काटे, बाजार समिती सभापती राजू पाटील, पी.जी. राठोड, वर्षा निकम, गोपाल कोठारी, चिराग शहा, स्वाती व्यवहारे, उमा शिवरामवार, अंजली खंदार, शेषराव राठोड, रवी नालमवार, राजेंद्र शिवरामवार आदी उपस्थित होते.पायदळ दिंडी काढणारे मुख्यमंत्री आता गप्प का ?काँग्रेस-राष्ट्रवादीचे सरकार असताना विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पायदळ दिंडी काढून शेतमालाला रास्त भाव मागितले होते. त्यांनी कापसाला प्रतिक्विंटल सात हजार तर सोयाबीनला पाच हजारांची मागणी केली होती. आता त्यांचेच सरकार असूनही ते गुपचूप का, असा सवाल आमदार ख्वाजा बेग यांनी केला. याचा जाब त्यांनी जनतेला द्यावा, असे आवाहनही त्यांनी दिले.