शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रवादीचा चार मतदारसंघावर दावा

By admin | Updated: June 9, 2014 00:07 IST

लोकसभेतील पराभवानंतर किमान विधानसभा निवडणूक हातची जाऊ नये म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसने जोरदार तयारी चालविली आहे. त्याचाच एक भाग म्हणून जिल्ह्यातील विधानसभेच्या सात पैकी चार

विधानसभा निवडणूक : शिष्टमंडळ शरद पवारांना भेटलेयवतमाळ : लोकसभेतील पराभवानंतर किमान विधानसभा निवडणूक हातची जाऊ नये म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसने जोरदार तयारी चालविली आहे. त्याचाच एक भाग म्हणून जिल्ह्यातील विधानसभेच्या सात पैकी चार मतदारसंघांवर दावा सांगितला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचा वर्धापन दिन मुंबईत पार पडला. त्या पार्श्‍वभूमीवर जिल्ह्यातील राष्ट्रवादीचे नेते ना. मनोहरराव नाईक, आमदार संदीप बाजोरिया, जिल्हा परिषद अध्यक्ष प्रवीण देशमुख, जिल्हाध्यक्ष नाना गाडबैले यांनी शनिवारी पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. यावेळी या नेत्यांनी राष्ट्रवादीने स्वबळावर निवडणूक लढवावी आणि ते शक्य नसेल तर विधानसभेच्या यवतमाळ जिल्ह्यातील सात पैकी चार मतदारसंघात निवडणूक लढवावी, अशी मागणी रेटली. सध्या पुसद मतदारसंघ राष्ट्रवादीच्या ताब्यात आहे. याशिवाय यवतमाळ, दिग्रस-दारव्हा आणि उमरखेड या मतदारसंघावर राष्ट्रवादीने दावा सांगितला आहे. या भेटीच्यावेळी राष्ट्रवादीचे नेते ना. छगन भुजबळ, ना. आर.आर. पाटील, प्रदेशाध्यक्ष भास्कर जाधव उपस्थित होते. याशिवाय प्रत्येक तालुकास्तरावरून गेलेल्या राष्ट्रवादीच्या पदाधिकार्‍यांच्या शिष्टमंडळानेही ना. शरद पवार यांची स्वतंत्र भेट घेऊन आपआपल्या मतदारसंघावर दावा सांगताना स्वबळावर विधानसभा लढण्याची मागणी लावून धरली. राष्ट्रवादीच्या नेत्यांनी शरद पवार यांच्याशी चर्चा करताना यवतमाळ जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद गेल्या पाच वर्षात कशी वाढली याचा लेखाजोखा मांडला. जिल्हा परिषद, पंचायत समिती व अनेक स्थानिक स्वराज्य संस्था राष्ट्रवादीच्या ताब्यात असल्याचे सांगण्यात आले. जिल्ह्यात पक्षाची ताकद वाढलेली असताना केवळ एकाच मतदारसंघावर समाधान मानावे का असा प्रश्नही उपस्थित करण्यात आला. राष्ट्रवादी काँग्रेस स्वबळावर लढल्यास जिल्ह्यातील सातही मतदारसंघात आपली ताकद दाखवू शकतो, असा दावाही या नेत्यांनी केला. राष्ट्रवादीच्या स्वबळावर लढण्याच्या या आक्रमक भूमिका व आणखी तीन मतदारसंघांवरील दाव्याने काँग्रेसपुढील आव्हाने वाढणार आहेत. (जिल्हा प्रतिनिधी)