शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
3
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
4
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
5
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
6
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
7
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
8
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
9
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
10
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
11
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
12
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
13
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
14
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
15
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
16
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
17
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
18
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
19
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
20
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
Daily Top 2Weekly Top 5

नक्षलग्रस्त ३५ गावे अंधारात

By admin | Updated: June 9, 2014 00:10 IST

विद्युत कंपनीच्या सुस्तावलेल्या कारभाराचा फटका पारवा परिसरातील गावांना वारंवार बसत आहे. थोडाही वारा आल्यास वीज पुरवठा खंडित होतो. एकदा गेलेली वीज केव्हा येईल याचा नेम राहात नाही.

अब्दुल मतीन - पारवाविद्युत कंपनीच्या सुस्तावलेल्या कारभाराचा फटका पारवा परिसरातील गावांना वारंवार बसत आहे. थोडाही वारा आल्यास वीज पुरवठा खंडित होतो. एकदा गेलेली वीज केव्हा येईल याचा नेम राहात नाही. गेली अनेक वर्षांपासूनची ही समस्या वीज कंपनीने सोडविली नाही. परिणामी या नक्षलग्रस्त भागातील लोकांना अंधारात रात्र काढावी लागते. याचा पुन्हा अनुभव शनिवारी रात्री आला. रात्री ८.३0 वाजता गूल झालेली वीज रविवारी दुपारी १ वाजता सुरू झाली. जीवाची काहिली करणार्‍या उन्हामुळे त्रस्त नागरिकांना रात्रीच्यावेळी थंड हवेची गरज आहे. परंतु वीज पुरवठाच खंडित झाल्याने डासांचा प्रादुर्भाव आणि घामाच्या धारा झेलत तब्बल ३५ गावातील नागरिकांना रात्र काढावी लागली. परिसरात शनिवारी वादळ-वारा नसतानाही वीज पुरवठा खंडित का झाला, हा न समजणारा प्रश्न होता. एरवी थोड्याही वार्‍याने वीज खंडित होते. या भागातील वीज तारा लोंबकळणार्‍या आहे. त्यामुळे विद्युत कंपनी कुठलीही जोखीम न स्वीकारता वीज पुरवठा खंडित करते. परंतु कायमस्वरूपी उपाय शोधला जात नाही. नागरिकांनी कित्येकदा तक्रारी केल्यानंतरही कंपनीला जाग येत नाही. मोर्चे, आंदोलने केल्यानंतरही समस्या निकाली काढली जात नाही. या समस्येने नागरिकांना भंडावून सोडले आहे. आठवड्यातून कित्येकदा वीज पुरवठा खंडित होतो. या भागात भारनियमन नसले तरी त्यापेक्षाही मोठी शिक्षा खंडित वीज पुरवठय़ाच्या रूपाने भोगावी लागत आहे. या भागातील बहुतांश गावे जंगलालगत आहे. टिपेश्‍वर अभयारण्य काही अंतरावर आहे. वन्य जीवांच्या हल्ल्यात अनेक जण जखमी झाले. जनावरे ठार करण्यात आली. अशा स्थितीत परिसरातील वीज पुरवठा खंडित होवू नये, अशी अपेक्षा नागरिकांना आहे. परिसरात सिंगल फेज योजना कार्यान्वित करण्यात आली आहे. जेणेकरून नागरिकांना अखंडित वीज मिळावी. ही उपाययोजनाही नियोजन आणि उदासीनतेमुळे फेल ठरली आहे. याशिवाय नागरिकांना वापरापेक्षा जादा युनिटचे बिल दिले जाते. तक्रारी केल्यानंतरही हा प्रश्न निकाली काढला जात नाही. घाटंजी येथे असलेल्या कार्यालयात जावून बिलात दुरुस्ती करून आणा, असा आदेश दिला जातो. या प्रकारात वीज ग्राहकांचा वेळ आणि पैसा खर्ची जातो. चूक विद्युत कंपनीची आणि भुर्दंंड मात्र ग्राहकांना बसतो. या समस्येचा ससेमीरा चुकविता चुकविता नागरिकांना नाकीनऊ येत आहे.