शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

नौशाद खान गेल्या दहा वर्षांपासून साकारताहेत सुबक गणेशमूर्ती...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2020 20:26 IST

धार्मिक विद्वेषाचा विळखा दिवसेंदिवस वाढत असताना येथील नौशाद खान इब्राहीम खान या मूर्तिकाराने धार्मिक ऐक्याची प्रचिती दिली आहे.

ठळक मुद्देपुसदमधील धार्मिक एकजुटीचे उदाहरण

अखिलेश अग्रवाललोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : श्रद्धेची भावना जात मानत नाही. शहरातील मुस्लीम तरुणाने गणरायाची मूर्ती घडविण्याचा छंद गेल्या दहा वर्षांपासून जोपासला आहे. धार्मिक विद्वेषाचा विळखा दिवसेंदिवस वाढत असताना येथील नौशाद खान इब्राहीम खान या मूर्तिकाराने धार्मिक ऐक्याची प्रचिती दिली.कला आणि कलावंत यांना जात-पात नसते, हेच नौशादच्या मूर्तीकलेने दाखवून दिले आहे. आपल्या कामातूनच कलावंत परमेश्वराची आराधना करीत असतो. नौशाद खान गेल्या दहा वर्षांपासून गणरायाच्या मूर्ती घडवित आहे. त्यांनी तयार केलेल्या गणेश मूर्तींना बाजारात चांगली मागणीही आहे. कारण नौशाद खान पर्यावरणपूरक मातीच्या मूर्ती घडवितात.

बालाजी वार्डात राहणारे नौशाद खान यांनी बालपणापासून मूर्तीकला जोपासली. हिंदू भावंडांप्रमाणेच ते दरवर्षी लाडक्या गणरायाची आतूरतेने वाट पाहतात. आपल्या हातून तयार झालेली मूर्ती जेव्हा लोक स्थापन करतात, ते पाहून मनाला वेगळाच आनंद मिळतो, असे मूर्तिकार नौशाद खान म्हणतात. जाती-पातीच्या पलिकडे जाणारा हा पुसदचा मूतीर्कार सर्वांसाठी आदर्श ठरला आहे. यंदा मात्र लॉकडाऊनमुळे गणेशोत्सवात किंचित परिणाम जाणवण्याची शक्यता आहे.

टॅग्स :Ganesh Mahotsavगणेशोत्सव