शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रीय शिक्षक पुरस्काराची प्रक्रिया सुरू, पण प्रतिसाद कमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2020 11:06 IST

केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाअंतर्गत ‘राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार’ योजना राबविली जाते. त्यासाठी यंदा १५ जूनपासून ६ जुलैपर्यंत ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले होते. मात्र ६ जुलै उलटून गेल्यावरही अपेक्षित प्रमाणात अर्ज न आल्याने मुदतवाढ द्यावी लागली आहे.

ठळक मुद्देमोबाईलवरूनही अर्ज भरा पुरस्कार नाही मिळाला, तरी प्रमाणपत्र मिळणार

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : पाच सप्टेंबर रोजी वितरित केल्या जाणाऱ्या राष्ट्रीय शिक्षक पुरस्काराची प्रक्रिया सुरू झाली असून यंदा शिक्षकांना मोबाईलवरूनही पुरस्कारासाठी अर्ज करता येणार आहे. विशेष म्हणजे, पुरस्कारासाठी निवड झाली नाही, तरी प्रक्रियेत सहभागी झाल्याबद्दल प्रमाणपत्र मिळणार आहे.

केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाअंतर्गत ‘राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार’ योजना राबविली जाते. त्यासाठी यंदा १५ जूनपासून ६ जुलैपर्यंत ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले होते. मात्र ६ जुलै उलटून गेल्यावरही अपेक्षित प्रमाणात अर्ज न आल्याने मुदतवाढ द्यावी लागली आहे. पुरस्कार योजनेच्या संचालक जी. विजया भास्कर यांनी याबाबत ६ जुलै रोजीच राज्याच्या मुख्य सचिवांसह शिक्षण सचिवांना पत्र पाठवून ११ जुलैपर्यंत अर्ज मागविण्याची सूचना दिली आहे.

मनुष्यबळ विकास मंत्रालयाच्या पोर्टलवर मोबाईलवरूनही शिक्षकांना अर्ज भरता येणार आहे. महत्त्वाचे म्हणजे, या अर्जांची छाननी जिल्हा निवड समितीने केल्यानंतर, राज्याच्या निवड समितीकडून निवड केली जाणार आहे. त्यातून निवड शिक्षकांची नावे पुरस्कारासाठी केंद्राकडे पाठविली जाणार आहेत. मात्र ज्यांना प्रत्यक्ष पुरस्कार मिळणार नाही, परंतु, जिल्हा व राज्य निवड समितीकडून ज्यांच्या नावे पुढे ‘फॉर्वड’ केली जातील, त्यांच्यासाठी पोर्टलवर ‘अ‍ॅटोमॅटिक’ प्रमाणपत्र तयार होणार आहे. हे प्रमाणपत्र निवड समितीसदस्यांच्या स्वाक्षरीनिशी शिक्षकांना दिले जाणार आहे. शिवाय, त्याचीच एक प्रत पोर्टलवरही पुन्हा अपलोड केली जाणार आहे. त्यामुळे प्रत्यक्ष पुरस्कार मिळाला नाही, तरी प्रक्रियेत सहभागी होताच शिक्षकांना सन्मान मिळणार आहे.असे आहे वेळापत्रकशिक्षकांनी ११ जुलैपर्यंत ऑनलाईन अर्ज दाखल करणेजिल्हा निवड समितीने छानन करून निवडक अर्ज राज्य समितीकडे २१ जुलैपर्यंत पाठविणेराज्य समितीकडून निवडक शिक्षकांची नावे राष्ट्रीय निवड समितीकडे ३१ जुलैपर्यंत पाठविणेराष्ट्रीय समितीकडून ३ ऑगस्टपर्यंत शिक्षकांना सूचित करून ६ ते १४ ऑगस्ट या काळात शिक्षकांच्या मुलाखती घेऊन प्रत्यक्ष निवड प्रक्रिया होईल.निवड झालेल्या शिक्षकांना १६ ते १७ ऑगस्टपर्यंत निमंत्रणे पाठवून ५ सप्टेंबर रोजी पुरस्कार वितरण होईल.

टॅग्स :Teacherशिक्षक