शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी एकाकी, कुणी ऐकत नाही, LPG मुद्द्यावर पक्षातच उभी फूट; नेते करतायत मोदींचे कौतुक
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
5
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात लागला बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
6
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
7
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
8
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
9
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
10
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
11
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
12
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
13
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
14
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
15
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
16
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
17
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
18
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
19
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
20
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
Daily Top 2Weekly Top 5

‘जेडीआयईटी’मध्ये राष्ट्रीयस्तरावरील तांत्रिक परिषद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2019 23:42 IST

जवाहरलाल दर्डा अभियांत्रिकी महाविद्यालयात ‘नॅशनल कॉन्फरन्स आॅन रिसेंट ट्रेड्स इन इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी’ ही राष्ट्रीयस्तरावरील तांत्रिक परिषद पार पडली. यात देशातील अभियांत्रिकी व पॉलिटेक्निक महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी सहभागी होत आपले शोधनिबंध सादर केले.

ठळक मुद्देदेशभरातील विद्यार्थ्यांचा सहभाग : नामवंत टेक्निकल जर्नलमध्ये शोधनिबंध प्रकाशित होणार

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : जवाहरलाल दर्डा अभियांत्रिकी महाविद्यालयात ‘नॅशनल कॉन्फरन्स आॅन रिसेंट ट्रेड्स इन इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी’ ही राष्ट्रीयस्तरावरील तांत्रिक परिषद पार पडली. यात देशातील अभियांत्रिकी व पॉलिटेक्निक महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी सहभागी होत आपले शोधनिबंध सादर केले.मेकॅनिकल इंजिनीअरिंंग विभागातर्फे सिव्हील, केमिकल, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन टेक्सटाईल, इलेक्ट्रीकल, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी व कॉम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग विभागाच्या संयुक्त विद्यमाने ही परिषद आयोजित केली होती. अभियांत्रिकी विद्यार्थ्यांना भविष्यात येणाऱ्या तांत्रिक आव्हानांची जाणीव व्हावी आणि अभ्यासक्रमासोबतच कौशल्य विकासावर भर देण्याच्या उद्देशाने ही परिषद घेण्यात आली. प्राचार्य डॉ. रामचंद्र तत्त्ववादी अध्यक्षस्थानी होते.परिषद संयोजक व मेकॅनिकल इंजिनिअरिंग विभाग प्रमुख डॉ. राजेशकुमार उत्तमराव संभे यांनी या परिषदेचे महत्त्व सांगितले. प्रमुख पाहुणे यंग सायंटिस्ट अजिंक्य कोट्टावार यांनी संशोधन व विकासाचे महत्त्व नमूद केले. संचालन प्रा. मोहीत पोपट यांनी, तर आभार आयोजन सचिव डॉ. उमाकांत कोंगरे यांनी मानले.या परिषदेत देशाच्या विविध महाविद्यालयातील ८०० हून अधिक विद्यार्थ्यांनी आपल्या शोधनिबंधाचे वाचन केले. उत्कृष्ट शोधनिबंध इंटरनॅशनल जर्नल आॅफ इंजिनिअरिंग अप्लीकेशन अँड टेक्नॉलॉजी या नामवंत टेक्नीकल जर्नलमध्ये प्रकाशित होणार आहे. पाच विभागात शोधनिबंध सादरीकरण झाले. एक टेक्नीकल गेमिंग इव्हेंटचा विभाग होता. विविध महाविद्यालयातील तज्ज्ञ प्राध्यापकांनी शोधनिबंधाचे परिक्षण केले.पाचही विभागात ‘जेडीआयईटी’ प्रथमजेडीआयईटी’च्या विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय कामगिरी करत पाचही विभागात प्रथम क्रमांक पटकाविला. पहिल्या विभागात रूचिक व्यवहारे ग्रुप, दुसऱ्या विभागात साक्षी कुसनेनवार, तिसºया विभागात शुभम लाढी, चौथ्या विभागात अभिजित मंगरे, तर पाचव्या विभागातून सेजल तायडे ग्रुपने प्रथम स्थान पटकाविले. गेमिंग इव्हेंटमध्ये ब्लार्इंड-सी विभागात जेडीआयईटीची अश्विनी जगताप प्रथम, तर लॅनगेमिंग एनएफएक्समध्ये अनिकेत अंगाईतकर याने प्रथम स्थान प्राप्त केले. लॅनगेमिंग सीएस-गो मधून धामणगाव पौलिटेक्नीकच्या गिरिश राऊत याने प्रथम येण्याचा मान पटकाविला.

टॅग्स :JDIETजेडीआयईटी