शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
3
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
4
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
5
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
6
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
7
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
8
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
9
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
10
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
11
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
12
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
13
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
14
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
15
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
16
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
17
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
18
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
19
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
20
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
Daily Top 2Weekly Top 5

पांढरकवडा तालुक्यातील नदी-नाल्यात ठणठणाट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 22, 2018 00:03 IST

तालुक्यातून वाहणाऱ्या खुनी नदीसह नदी-नाले आत्तापासूनच कोरडे पडले असून उन्हाळ्यापूर्वीच पाणी समस्या भेडसावणार असल्याची चिन्हे दिसू लागली आहे.

ठळक मुद्देप्रशासनाचे दुर्लक्ष : भीषण पाणीटंचाईचे सावट

लोकमत न्यूज नेटवर्कपांढरकवडा : तालुक्यातून वाहणाऱ्या खुनी नदीसह नदी-नाले आत्तापासूनच कोरडे पडले असून उन्हाळ्यापूर्वीच पाणी समस्या भेडसावणार असल्याची चिन्हे दिसू लागली आहे.तालुक्यातील अनेक गावांमध्ये पाणी पुरवठा योजना आहे. ग्रामपंचायतीमार्फत ही पाणी पुरवठा राबविली जाते. परंतु नळयोजनेच्या ज्या गावांना पाणी पुरवठा होतो, त्या गावातील विहिरीच्या पाण्याची पातळीसुद्धा खाली गेली आहे. त्यामुळे पाणी पुरवठा योजना कुचकामी ठरल्या आहेत. सिंचनाअभावी रबी पिकांना पाणीही देता आले नाही. त्यामुळे रबी पिकांनाही मोठ्या प्रमाणावर फटका बसला आहे. गुरांनाही पिण्याच्या पाण्याची समस्या निर्माण झाली आहे. खुनी नदीला फेब्रुवारीपर्यंत तरी काही ना काही थोड्या प्रमाणात पाणी असायचे. परंतु खुनी नदीही जानेवारीच्या उत्तरार्धातच कोरडी पडली आहे. आतापासूनच पाण्याची समस्या जाणवू लागल्यामुळे उन्हाळ्यात ही समस्या अधिकच तीव्र होणार असल्याची चिन्हे दिसत आहेत.पाणी टंचाई निवारणार्थ दरवर्षी आढावा बैठका घेतल्या जातात. आराखडे केल्या जातात. परंतु पाणी टंचाई निवारणार्थ करावयाची कामे आधी केल्या जात नाही. पाणी टंचाई मोठ्या प्रमाणावर निर्माण झाल्यानंतरच टंचाई निवारणार्थ उपाययोजना केल्या जातात. त्यामुळे तालुक्याला दरवर्षी पाणी टंचाईचा सामना करावा लागतो.मागीलवर्षी देखिल तालुक्यातील साखरा, वाढोणा, करंजी, घोन्सी पोड, मरेगाव वन, भाडउमरी, बोथ, सोनुर्ली, अर्ली, मंगी, बहात्तर, वाºहा, कवठा आदी गावांना पाणी टंचाईचा सामना करावा लागला होता. पाणी टंचाई संदर्भात झालेल्या बैठकीमध्ये वरील गावांसाठी उपाययोजना करण्यासाठी कामेदेखिल प्रस्तावित करण्यात आली होती. परंतु यापैकी अनेक गावातील कामे प्रत्यक्षात झालीच नसल्याने उन्हाळ्यापूर्वीच ग्रामस्थांना पाणी टंचाईला तोंड द्यावे लागत आहे.