शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
4
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
5
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
6
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
7
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
8
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
9
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
10
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
11
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
12
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
13
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
14
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
15
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
16
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
17
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
18
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
19
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

नांदगव्हाण धरणाचे पुनर्निर्माण उभारणी लवकरच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2018 22:19 IST

शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या नांदगव्हाण धरणाच्या पुननिर्मितीला लवकरच प्रारंभ होणार असून यासाठी साडेतेरा कोटी रुपये मंजूर झाले आहे. महसूल राज्यमंत्री संजय राठोड यांच्या प्रयत्याने या धरणाचे बांधकाम होणार आहे.

ठळक मुद्देसाडेतेरा कोटी मंजूर : महसूल राज्यमंत्री संजय राठोड यांच्या प्रयत्नाला यश

लोकमत न्यूज नेटवर्कदिग्रस : शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या नांदगव्हाण धरणाच्या पुननिर्मितीला लवकरच प्रारंभ होणार असून यासाठी साडेतेरा कोटी रुपये मंजूर झाले आहे. महसूल राज्यमंत्री संजय राठोड यांच्या प्रयत्याने या धरणाचे बांधकाम होणार आहे.शहराला पाणीपुरवठा करणारे नांदगव्हाण धरण फुटल्यामुळे एकच हाहाकार उडाला होता. दिग्रस शहरातील १९ जणांचा महापुराने बळी घेतला होता. तेव्हापासून या धरणाची निर्मिती रखडली आहे. शहराला सतत ३० वर्ष या धरणातून पाणीपुरवठा झाला. तोही सायफन पद्धतीने. त्यामुळे विजेचा खर्चही बचत होत होता. परंतु शहराच्या दृष्टीने अत्यंत महत्वाच्या या प्रकल्पाकडे आजपर्यंत दुर्लक्ष झाले. दरम्यानच्या काळात नगरपालिका प्रशासनाने प्रयत्न सुरू केले. त्याचा महसूल राज्यमंत्री संजय राठोड यांनी सातत्याने पाठपुरावा केला. त्यामुळेच शासनाने साडेतेरा कोटी रुपयांचा निधी मंजूर केला. हा निधी नगरपरिषदेला प्राप्तही झाला. परंतु तांत्रिक बाबींमुळे तो अखर्चित राहिला. दरम्यानच्या काळात संपदा बहुद्देशीय संस्थेने धरण पुनर्बांधणीसाठी समिती गठित करून पाठपुरावा सुरू केला.अखेर सर्व प्रक्रिया पूर्ण करून निविदा काढण्यात आली. त्यातही चौथ्यांदा निविदा काढण्यात आली. यामध्ये आलेल्या निविदेला पडताळून आगामी नगरपालिका सभेत मंजुरी दिली जाईल. या धरणाचा बांधकाम कालावधी १८ महिन्याचा असल्याची माहिती मुख्याधिकारी शेषराव टाले यांनी नांदगव्हाण धरण पुनर्निर्माण जागरण समितीच्या प्रतिनिधींना दिली. यावेळी समितीचे अध्यक्ष सुरेंद्र मिश्रा, मजहर खान, अभय इंगळे, प्रकाश सातघरे, सुरेश चिरडे, किशोर कांबळे, अब्दूल रफिक, विष्णूपंत यादव आदी उपस्थित होते. यामुळे लवकरच दिग्रसकरांना नांदगव्हाण धरणाचे पाणी उपलब्ध होणार आहे.