शहरं
Join us  
Trending Stories
1
'मोदी तेरी कब्र...' काँग्रेसच्या रॅलीतून पीएम मोदींवर वादग्रस्त टीका; भाजपचा पलटवार...
2
₹1000 कोटींच्या सायबर फ्रॉड रॅकेटचा भांडाफोड; 58 कंपन्यांविरुद्ध CBI ने दाखल केले आरोपपत्र
3
'ममता बॅनर्जींना अटक करा'; मेस्सी स्टेडिअम गोंधळावर आसामचे मुख्यमंत्री हिमंता सरमा यांची थेट मागणी
4
Palghar Crime: वसईत पाच वर्षाच्या मुलीवर बलात्कार करून हत्या; १८ वर्षांनंतर आरोपी सापडला उत्तर प्रदेशात
5
'मंत्री झाला म्हणजे जास्त कळते, असा गैरसमज करून घेऊ नये', जयंत पाटील मंत्री सावकारेंवर भडकले, 'हजामती' शब्दावरून चकमक
6
आता '४ दिवसीय आठवडा' शक्य! कर्मचाऱ्यांसाठी मोठा दिलासा; नवीन कामगार कायद्यात '३ दिवस सुट्टी'ची तरतूद
7
नाईट क्लबमध्ये आग, दिल्लीत मेसेज पोहोचला अन् लुथरा ब्रदर्स थांयलंडमध्ये; पडद्यामागे काय घडलं? Inside Story
8
'डिजिटल अरेस्ट' च्या जाळ्यात अडकली, ३३ लाखांची आरटीजीएसही करायला बँकेती गेली; मॅनेजरच्या लक्षात आले...
9
विमानात अमेरिकन महिलेचा श्वास गुदमरू लागला, देवदूत बनून धावली काँग्रेसची महिला नेता आणि वाचवले प्राण   
10
रेपो रेट कपातीनंतरही FD वर बंपर रिटर्न! SBI मध्ये २ लाख जमा करून मिळेल ८३,६५२ रुपये निश्चित व्याज
Daily Top 2Weekly Top 5

36 हजार मतदारांची नावे यादीतून वगळली जाणार !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2021 05:00 IST

जिल्हा निवडणूक विभाग मतदारयादी पुनरिक्षणाचा कार्यक्रम युद्ध पातळीवर राबवित आहे. त्या कामासाठी २५५० बीएलओंची नियुक्ती करण्यात आली आहे. यामध्ये शिक्षक आणि अंगणवाडी ताई यांचा समावेश आहे. घरोघरी जाऊन सर्वेक्षण केल्यानंतर प्रत्यक्ष पाहणी करून फोटो नसणारी व्यक्ती त्याठिकाणी उपस्थित नसेल, तर स्थानिकांच्या आधारे पंचनामा करून ही नावे वगळली जात आहेत. 

ठळक मुद्देअडीच हजार बीएलओंची शोधमोहीम : १७६४ नावे डुप्लिकेट

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ :  जिल्हा निवडणूक विभाग मतदारयादी पुनरिक्षणाचा कार्यक्रम युद्ध पातळीवर राबवित आहे. त्या कामासाठी २५५० बीएलओंची नियुक्ती करण्यात आली आहे. यामध्ये शिक्षक आणि अंगणवाडी ताई यांचा समावेश आहे. घरोघरी जाऊन सर्वेक्षण केल्यानंतर प्रत्यक्ष पाहणी करून फोटो नसणारी व्यक्ती त्याठिकाणी उपस्थित नसेल, तर स्थानिकांच्या आधारे पंचनामा करून ही नावे वगळली जात आहेत. जिल्ह्यामध्ये सात विधानसभा क्षेत्रात ३६ हजार ५७४ नावे वगळली जाणार आहेत. यामध्ये सर्वाधिक ३३ हजार ४८२ नावे यवतमाळ विधानसभा क्षेत्रातील आहे.अनेकवेळा सूचना दिल्यानंतरही मतदारांनी आपले फोटो सादर केले नाहीत. यामुळे ही व्यक्ती अस्तित्वात नसावी, असा अंदाज निवडणूक आयोगाने व्यक्त केला आहे. ही व्यक्ती मयत झाली असावी, अथवा त्याठिकाणी राहात नसेल, यामुळेच त्यांची छायाचित्रे उपलब्ध झाली नाही, असा निष्कर्ष निघाला आहे.

छायाचित्र जमा करण्यासाठी ८ जुलैची डेडलाईनमतदार यादीमध्ये छायाचित्र जमा करण्यासाठी २५ जूनची डेडलाईन देण्यात आली होती. ही डेडलाईन ३० जूनपर्यंत वाढविण्यात आली. यानंतरही छायाचित्र न आल्याने आता ८ जुलैपर्यंत याला मुदतवाढ देण्यात आली आहे. यानंतर मतदार यादीतून छायाचित्र नसलेले मतदार काढले जाणार आहे.

येथे जमा करा छायाचित्र प्रत्येक गावामध्ये बीएलओ मार्फत घरोघरी सर्वेक्षण होत आहे.बीएलओंकडे छायाचित्र नसल्यास मतदार यादीसाठी छायाचित्र देता येतील.बीएलओ येऊन गेले असतील तर तहसील कार्यालयामध्ये निवडणूक विभागात छायाचित्र जमा करता येते. त्यादृष्टीने उपाययोजना करण्यात आलेल्या आहे.

 

टॅग्स :Election Commission of Indiaभारतीय निवडणूक आयोग