शहरं
Join us  
Trending Stories
1
"कतारवर हल्ला म्हणजे अमेरिकेवर हल्ला, पुन्हा असं घडलं तर..."; ट्रम्प यांचा इस्रायलला इशारा
2
महाराष्ट्रात 'जम्बो'भरती! ४ ऑक्टोबरला एकाचवेळी तब्बल १०,३०९ उमेदवार शासकीय सेवेत होणार दाखल
3
"माझ्या पतीची बिनशर्त सुटका करा..."; सोनम वांगचुक यांच्या पत्नीचे थेट राष्ट्रपतींना पत्र
4
भिवंडीतील मानकोली येथे वह्या बनवणाऱ्या कंपनीच्या गोदामाला आग; सुदैवाने जीवितहानी नाही
5
महाराष्ट्रातील हॉटेल, दुकाने आता २४ तास सुरू राहणार; पण 'या' आस्थापनांवर मात्र निर्बंध कायम
6
“मराठा समाजाला आरक्षणाची अत्यंत गरज, पण सरकारने...”; खासदार शाहू महाराजांनी व्यक्त केली खंत
7
ठाणे महापालिकेच्या अतिक्रमण विभागप्रमुखाला २५ लाखांची लाच घेताना अटक; अगोदर घेतलेले १० लाख
8
मंत्रालयातील लूटीला चाप बसणार! सल्लागारांच्या नियुक्त्यांमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी निर्णय
9
GST घटला, पण सरकारचा खजिना भरला, सप्टेंबर महिन्यात झाली विक्रमी कमाई   
10
ICC Womens World Cup : 'लेडी मॅक्सवेल'ची विक्रमी सेंच्युरी; असा पराक्रम करणारी ठरली पहिली बॅटर
11
मुंबई मनपा निवडणुकीपूर्वी उद्धवसेनेला मोठा धक्का; ‘या’ गटाचे प्रमुख, पदाधिकारी शिवसेनेत
12
VIDEO: परंपरा.. प्रतिष्ठा.. अनुशासन.. 'या' ठिकाणी पुरूष साडी नेसून करतात गरबा, कारण...
13
“वाट कसली पाहता? शेतकरी भाजपात आल्यावर कर्जमुक्ती करणार का?”; उद्धव ठाकरेंचा थेट सवाल
14
संविधान सत्याग्रह पदयात्रेदरम्यान पोलिसांकडून पाळत, काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांचे सरकारला आव्हान, म्हणाले...
15
NHIDCL: एनएचआयडीसीएलमध्ये नोकरी, 'या' पदांसाठी भरती; १ लाख ५० हजारांपर्यंत पगार!
16
वय वर्ष ३१, संपत्ती ₹२१,१९० कोटी! कोण आहे भारतातील सर्वात तरुण अब्जाधीश? काय काम करतो?
17
लोकसंख्येतील बदल घुसखोरीपेक्षाही घातक...! असं का म्हणाले पंतप्रधान मोदी? देशाला दिला गंभीर इशारा
18
'ओला दुष्काळ जाहीर करा', उद्धव ठाकरेंनी दाखवले CM फडणवीसांचे पत्र, म्हणाले, "मलाही वेदना झाल्या.."
19
CM फडणवीसांचा ‘तो’ Video विरोधकांनी दाखवला; म्हणाले, “गांभीर्याने विचार करा, असले राजकारण...”
20
शौक बड़ी चीज है! १७ व्या वर्षी iPhone 4, iPad 2 साठी विकली किडनी, आता आयुष्यभराचं दुखणं

खेड्यात वाघाच्या दहशतीचे गूढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 2, 2018 21:56 IST

जिल्ह्यातील आर्णी, नेर, कळंब, दारव्हा, यवतमाळ, उमरखेड, पांढरकवडा, घाटंजी, झरी तालुक्यामध्ये वाघ असल्याची चर्चा कमीअधिक प्रमाणात सुरू आहे. याला दुजोरा देण्यासाठी वाघाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल केला जात आहे.

ठळक मुद्देवनविभाग संभ्रमात : सोशल मीडियावर व्हिडीओंचा भडीमार

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : जिल्ह्यातील आर्णी, नेर, कळंब, दारव्हा, यवतमाळ, उमरखेड, पांढरकवडा, घाटंजी, झरी तालुक्यामध्ये वाघ असल्याची चर्चा कमीअधिक प्रमाणात सुरू आहे. याला दुजोरा देण्यासाठी वाघाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल केला जात आहे. अनेक ठिकाणी तडसालाच वाघ समजून शेतशिवार ओस पडत आहेत. अवनी नरभक्षक वाघिणीच्या खात्म्यानंतर वाघ इतरत्र दिसल्याच्या अफवांना मोठ्या प्रमाणात खतपाणी मिळत आहे.निसर्गाने जिल्ह्याला समृद्ध अशी वनसंपदा दिली आहे. ७० ते ८० च्या दशकात अगदी कोणत्याही खोरीत वाघ राहत असल्याचे ज्येष्ठांकडून ऐकायला मिळत होते. आता पुन्हा त्याच चर्चा प्रत्यक्ष अनुभवायला मिळत आहे. कोणत्याही शेतशिवारात जंगलता फिरताना वाघ दिसल्याची चर्चा कमी अधिक प्रमाणात रंगत आहे. वाघांची संख्या वाढल्याने त्यांनी अधिवास क्षेत्रात वाढ केल्याचे काही वन्यजीवप्रेमी सांगतात. प्रत्यक्ष वाघामुळे सध्या तरी ग्रामीण जीवन ढवळून निघाले आहे. एखाद्याने वाघ दिसला असे सांगितले की, किमान दोन दिवस त्या परिसरात कोणी फिरकत नाही. यामुळे शेतीची कामे, रोजमजुरी बुडत आहे. घनदाट जंगलात राहणारा वाघ अचानक गावालगतच्या झुडपी जंगलात दिसल्याचा दावा केला जातो.यवतमाळ तालुक्यातील भांबराजा, पिंप्री (लासिना), बोरजई, नारकुंड, उमर्डा नर्सरी परिसरात वाघ असल्याचा दावा ग्रामस्थांकडून केला जात आहे. मात्र वनविभागाच्या हाती कोणताच पुरावा लागलेला नाही. तरीही दक्षता म्हणून वाघाचे अधिवास असल्याचे फलक येथे वनविभागाने लावले आहे. अशीच स्थिती आर्णी तालुक्यातील लोणबेहळ जंगल परिसराची आहे.झरी, पांढरकवडा, राळेगाव, घाटंजी, कळंब तालुक्यातील नांझा परिसरात वाघाचा संचार असण्याला वनविभागाने दुजोरा दिला आहे. तेथे काही वन्यजीव प्रेमी ‘रुट लेव्हल’वर काम करत आहे. असेच प्रयत्न वाघ दिसल्याच्या वावड्या उठलेल्या भागात होण्याची आवश्यकता आहे. यासाठी वनविभागाच्या यंत्रणेलाही प्रशिक्षित करण्याची गरज आहे. वनरक्षक, वनचौकीदार यांचा ग्रामस्थांशी थेट संपर्क होतो. अफवा का असे ना, त्याची शहानिशा करण्याची गरज निर्माण झाली आहे. यातूनच वाघाच्या दहशतीचे गुढ उकलता येईल.वन विभागाला हवेत पुरावे, गावकरी हतबलवाघ आहे हे मान्य करण्यासाठी वनविभागाला पुरावे हवे आहेत. पायाचे ठसे (पगमार्क), त्याचे केस व इतर काही खानाखुणा हव्यात. मात्र या गोळा कशा करायच्या याबाबत ग्रामस्थांना कोणतीच माहिती नाही. काही ठिकाणी तर वाघाने शिकार केल्यानंतर ती ओढून परत आणली जाते किंवा जमिनीत पुरली जाते. वाघ असेल तर या कृत्यामुळे तो अधिक आक्रमक होण्याची शक्यता आहे.

टॅग्स :Tigerवाघ