शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

घाटातील खुनाचे रहस्य उलगडले

By admin | Updated: January 26, 2017 01:03 IST

दिग्रस मार्गावरील बेलगव्हाण घाटात गळा चिरून केलेल्या तरुणाच्या खून प्रकरणाचे रहस्य उलगडले असून भावाच्या मृत्यूचा बदला ....

युवराज मस्केचा खून सुडातून : दोन सख्ख्या भावांसह तिघांना अटक पुसद : दिग्रस मार्गावरील बेलगव्हाण घाटात गळा चिरून केलेल्या तरुणाच्या खून प्रकरणाचे रहस्य उलगडले असून भावाच्या मृत्यूचा बदला घेण्यासाठी खून केल्याचे पुढे आले. या प्रकरणी दोन सख्ख्याभावांसह तिघांना अटक करण्यात आली आहे. संतोष काशीनाथ काळे (३७), केतन काशीनाथ काळे (२७) दोघेही रा.मंगलमूर्तीनगर, पुसद आणि मनोज मदनसिंग परिहार (३२) रा.पुसद अशी अटकेतील आरोपींची नावे आहे. पुसद-दिग्रस मार्गावरील बेलगव्हाण घाटात उमरखेड येथील युवराज धनराज मस्के (३०) याचा मृतदेह गळा चिरलेल्या अवस्थेत आढळून आला. या प्रकरणी ग्रामीण पोलिसांनी अज्ञात मारेकऱ्याविरुद्ध खुनाचा गुन्हा नोंदवून तपास जारी केला. यात सदर खून भावाची हत्त्या केल्याने झाल्याचे उघडकीस आले. यातील आरोपी संतोष व केतन काळे यांचा मोठा भाऊ नितीन काशीनाथ काळे हा २००६ मध्ये उमरखेड येथे मस्के यांच्या घरी राहात होता. त्यावेळी नितीनने विष प्राशन केल्याने मृत्यू झाला होता. नितीनला युवराजची आई चंदाबाई मस्के हिनेच विष पाजल्याचा रोष संतोष व केतनच्या मनात होता. दरम्यान, चंदाबाई पतीपासून विभक्त होऊन पुसद येथे राहात होती. तेथे युवराज आपल्या आईला भेटण्यासाठी अधून-मधून येत होता. रविवार, २२ जानेवारी रोजी युवराज मस्के पुसदला आला होता. त्यावेळी आरोपी संतोष व केतन आणि मनोज परिहार यांनी बदला घेण्याच्या दृष्टीने युवराजला सकाळी १० वाजता एका वाईन बारमध्ये नेले. तेथे येथेच्छ दारू ढोसली. मनोज परिहारसोबत वाद झाला. या वादात मनोजने युवराजच्या डोक्यात ग्लास मारला. त्यानंतर मद्यधुंद झालेल्या युवराजला दवाखान्यात नेण्याच्या बहाण्याने दिग्रस मार्गावरील बेलगव्हाण घाटात नेले. तेथे संतोष व मनोजने युवराजचा धारदार शस्त्राने गळा चिरून खून केला. त्यानंतर मोहीम फत्ते झाले की नाही, हे पाहण्यासाठी केतन दुचाकीने घटनास्थळावर गेला. युवराज मृत झाल्याचे पाहून तिघेही दिग्रसला दुचाकीला पसार झाले, अशी माहिती अटकेतील आरोपींनी पोलिसांना दिली. या प्रकरणी उपविभागीय पोलीस अधिकारी अजयकुमार बन्सल (आयपीएस) यांच्या मार्गदर्शनात ठाणेदार धनंजय जगदाळे, पुसद शहर डीबी पथक आणि वाहतूक शाखा तपास करीत आहे. (प्रतिनिधी)