शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
2
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
3
फ्लॅटसाठी १ कोटी मोजले, मध्यरात्री बाल्कनीचे छत कोसळले...; व्हायरल व्हिडीओमुळे रिअल इस्टेट क्षेत्राचे पितळ उघडे पडले
4
मोठे गिफ्ट! आता कारच्या डॅशबोर्डवर दिसणार व्हॉट्सॲप; चॅटिंग, कॉलही करता येणार; Apple CarPlay साठी खास अ‍ॅप लाँच
5
"माझ्याकडे दैवी शक्ती आहे..." म्हणत लुटले १६ एकर रान; भोंदू अशोक खरातचा शेतकऱ्यांना गंडा, १४ वा गुन्हा दाखल
6
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
7
आजी म्हणायची कोरे कपडे घालू नका... पण का? जुन्या पिढीच्या 'त्या' भीतीला विज्ञानाचा आधार!
8
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
9
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
10
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
11
Viral Video: "नोकरी हवी तर किम जोंग उनला शिवी दे..."; कंपनीची अजब अट पाहून उमेदवार थरथरला
12
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने आपला उमेदवार मागे घ्यावा; सुप्रिया सुळेंची काँग्रेसला विनंती
13
मस्करीची कुस्करी! मित्राच्या गुप्तांगात भरली एअर कॉम्प्रेसरने हवा; आतड्यांचा अक्षरशः गोळा झाला अन्...
14
इस्रायलच्या हल्ल्यांनं लेबनान हादरला, १० मिनिटांत १०० हून अधिक ठिकाणी हल्ले! २५४ जणांचा मृत्यू, अनेक जखमी; इराण म्हणाला...
15
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
16
Kruthika Reddy : इंजेक्शन, गर्लफ्रेंड अन् डिजिटल पुरावे; डॉ. कृतिका रेड्डी हत्याप्रकरणात पतीच्या चॅटने फिरली चक्र
17
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
18
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
19
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
20
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
Daily Top 2Weekly Top 5

मुस्लीम आरक्षणासाठी धडक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 10, 2018 22:18 IST

मुस्लीम समाजाला आरक्षण लागू करावे, या मागणीसाठी शुक्रवारी समाजबांधवांनी येथे मोर्चा काढून तहसीलदारांना निवेदन सादर केले. यामध्ये समाजबांधवांचा लक्षणीय सहभाग होता. महाराष्ट्र शासनाने नियुक्त केलेल्या मोहम्मद रहेमान अभ्यास गटाने सांगितलेली आरक्षणाची आवश्यकता दुर्लक्षित करण्यात आल्याची बाब यावेळी प्रामुख्याने मांडण्यात आली.

ठळक मुद्देनेरमध्ये मोर्चा : मो. रहेमान अभ्यास गटाचा अहवाल दुर्लक्षित असल्याचा आरोप

लोकमत न्यूज नेटवर्कनेर : मुस्लीम समाजाला आरक्षण लागू करावे, या मागणीसाठी शुक्रवारी समाजबांधवांनी येथे मोर्चा काढून तहसीलदारांना निवेदन सादर केले. यामध्ये समाजबांधवांचा लक्षणीय सहभाग होता. महाराष्ट्र शासनाने नियुक्त केलेल्या मोहम्मद रहेमान अभ्यास गटाने सांगितलेली आरक्षणाची आवश्यकता दुर्लक्षित करण्यात आल्याची बाब यावेळी प्रामुख्याने मांडण्यात आली.जामा मशीद येथे नमाज अदा करून नेताजी चौकातून मोर्चा काढण्यात आला. अमरावती रोड मार्गे तहसील कार्यालयावर मोर्चा धडकला. जमियत उलेमा हिंद नेरच्यावतीने या मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. तहसील परिसरात मोर्चाचे रूपांतर सभेत झाले. याठिकाणी मौलवी मौलाना रिजवान उल्लाह खाँ, अ‍ॅड. लतिफ मिर्झा, जफर एन. खान, गुलाब खाँ, इम्तियाज सेठ, मुसा टिक्की, मौलवी उबेद, बासिद खान आदींनी उपस्थितांना संबोधित केले.मुस्लीम समाजाची सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक अधोगती होत आहे. अत्यंत केविलवाणी अवस्था या समाजाची झाली आहे. न्या. राजेंद्र सच्चर कमिटी, न्या. रंगनाथ मिश्रा तसेच महाराष्ट्र शासनाच्यावतीने नियुक्त मोहम्मद रहेमान अभ्यास गटाने आपल्या अहवालात मुस्लीम समाजाला आरक्षणाची आवश्यकता नमूद केली आहे. मात्र शासन मुस्लीम आरक्षणाबाबत वंचित आहे. मुस्लीम समाजाला त्यांचे न्याय व हक्क त्वरित मिळावे यासाठी पाच टक्के आरक्षण देण्यात यावे, अशी मागणी यावेळी करण्यात आली. मागणी पूर्ण न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा यावेळी देण्यात आला. योवळी मौलाना रिजवान उल्लाह खाँ, मिर्झा लतिफ, जफर एन. खान, गुलाब खाँ, नगरसेवक तनवीर खाँ, मुसा टिक्की, मौलवी उबेद, बासीद खान, मौलवी खालिद, शरद मोरे, वंदना मिसळे, मोहीन पटेल, अत्तेहर उलहक, शाहबाज खाँ, शोहेब खाँ, मौलवी रहेमतुल्ला, मोहम्मद अली साहब, अब्दुल्ला शेख, राजीकभाई, जफरूल्ला खाँ आदी उपस्थित होते. त्यांच्या उपस्थितीत तहसीलदार अमोल पोवार यांना निवेदन देण्यात आले. ठाणेदार अनिल किनगे, सहायक पोलीस निरीक्षक पुंडगे, राजू कुकडे, राजेश चौधरी, राजेश भगत, जीवन राठोड, नितीन कडुकार, महेश तडसे, मोहन कसबे, कासम निमसुलवार, प्रदीप खडके, गुणवंत पाटील आदींनी चोख बंदोबस्त ठेवला होता.

टॅग्स :Muslimमुस्लीमreservationआरक्षण