शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
2
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
3
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
4
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
5
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
6
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
7
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
8
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
9
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
10
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
11
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
12
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
13
ड्रग्जमाफियांनी पोखरली मुंबई विमानतळाची सुरक्षा; ड्रग्जचे पार्सल करायचे क्लिअर : कस्टम अधीक्षकासह दोन पोलिसांना अटक
14
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
15
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
16
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
17
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
18
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
19
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
20
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी

अनैतिक संबंधाच्या संशयातून वर्षभरापूर्वी झालेला खून उघड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2022 05:00 IST

त्यांची कसून चौकशी केली असता त्यांनी खुनाचा घटनाक्रम सांगितला. त्यानंतर पोलीस पथकांनी वसंतनगर, काळीदौलत, पुणे, नागपूर, सोलापूर अशा विविध ठिकाणांवरून गुन्ह्यातील आरोपींची धरपकड केली. यातील मुख्य आरोपी नितीन लक्ष्मण शास्त्रकार याला नागपुरातून ताब्यात घेतले. सोबतच त्याला खुनात मदत करणारी त्याची पत्नी, वडील लक्ष्मण परसराम शास्त्रकार, भाऊ चेतन, मित्र देवानंद उर्फ देवा देवराव वाघमारे (रा. काळीदौलत खान), प्रमोद दारासिंग राठोड यांना अटक केली. 

लोकमत न्यूज नेटवर्कदिग्रस : तालुक्यातील वसंतनगर येथील ५१ वर्षीय व्यक्ती मार्च २०२१ पासून बेपत्ता होती.  अनैतिक संबंधाच्या संशयावरून नात्यातीलच व्यक्तीने त्याचा खून केल्याचे उघड झाले आहे. पोलिसांनी वर्षभरानंतर गुरुवारी सहा आरोपींना सबळ पुराव्यासह अटक केली. श्रावण उर्फ विठ्ठल परसराम शास्त्रकार (५१) हे ९ मार्च २०२१ रोजी घरून बेपत्ता झाले. त्यांचा मोबाईलही बंद होता. या प्रकरणी मुरलीधर परसराम शास्त्रकार यांनी मोठा भाऊ बेपत्ता असल्याची तक्रार दिग्रस पोलीस ठाण्यात दिली. त्यानंतर आठ दिवसांपूर्वी मुरलीधर शास्त्रकार यांना त्यांच्या भावाचे नात्यातीलच व्यक्तींनी अपहरण केल्याची माहिती मिळाली. याची तक्रार घेऊन शास्त्रकार यांनी पाेलीस अधीक्षक डॉ. दिलीप पाटील भुजबळ यांची भेट घेतली. अधीक्षकांनी या प्रकरणात संगनमताने अपहरण केल्याचा गुन्हा दाखल करण्याचे निर्देश दिले व याचा तपास उपविभागीय पाेलीस अधिकारी दारव्हा आदित्य मिरखेलकर यांच्याकडे सोपविला. सोबत चार पोलीस पथके तपासकामी लावली. या प्रकरणात पहिले संशयित म्हणून चेतन लक्ष्मण शास्त्रकार व लक्ष्मण परसराम शास्त्रकार या पिता-पुत्रांना ताब्यात घेण्यात आले. त्यांची कसून चौकशी केली असता त्यांनी खुनाचा घटनाक्रम सांगितला. त्यानंतर पोलीस पथकांनी वसंतनगर, काळीदौलत, पुणे, नागपूर, सोलापूर अशा विविध ठिकाणांवरून गुन्ह्यातील आरोपींची धरपकड केली. यातील मुख्य आरोपी नितीन लक्ष्मण शास्त्रकार याला नागपुरातून ताब्यात घेतले. सोबतच त्याला खुनात मदत करणारी त्याची पत्नी, वडील लक्ष्मण परसराम शास्त्रकार, भाऊ चेतन, मित्र देवानंद उर्फ देवा देवराव वाघमारे (रा. काळीदौलत खान), प्रमोद दारासिंग राठोड यांना अटक केली. आरोपी नितीनने खुनाची कबुली देताना पोलिसांपुढे धक्कादायक खुलासा केला. श्रावण परसराम शास्त्रकार यांचे कुटुंबातील महिलेशी अनैतिक संबंध होते. या धक्क्याने काका गोपाल यांचा मृत्यू झाला. त्यामुळेच त्यांचे अपहरण करून खून केल्याचे नितीनने सांगितले. ९ मार्च २०२१ रोजी श्रावण शास्त्रकार यांना दुचाकीवर बसवून काळीदौलत खान येथे आणले व निर्जनस्थळी त्यांची दगडाने ठेचून हत्या केली. त्यानंतर शेतालगतच्या नाल्यातील खोलगट भागात मृतदेह पुरला. आरोपीच्या या कबुलीनंतर पोलिसांनी पुरलेला मृतदेह बाहेर काढला. ते प्रेत श्रावण उर्फ विठ्ठल शास्त्रकार यांचे असल्याचे सिद्ध झाले. दिग्रस पोलिसांनी गुन्ह्यामध्ये कलम ३०२, १२० ब, २०१ यांची वाढ केली. 

  तपास पथकाला २५ हजारांचे पारितोषिक - वर्षभरापूर्वी झालेला खून उघड करण्यासाठी सहायक पोलीस अधीक्षक तथा उपविभागीय पोलीस अधिकारी आदित्य मिरखेलकर, पोलीस निरीक्षक प्रदीप परदेशी, दिग्रस ठाणेदार पांडुरंग फाडे, सहायक निरीक्षक विजयरत्न पारखी, विवेक देशमुख, सायबर सेलचे अमोल पुरी, उपनिरीक्षक भगवान पायघन, योगेश रंधे, नरेंद्र मानकर, दोडके, जमादार सर्जु चव्हाण, श्रावण राऊत, सचिन राऊत, अविनाश गोदमले, अक्षय ठाकरे, प्रमोद इंगोले, अनुप मडके, आशिष महेंद्र, बबलू चव्हाण, पंकज पातुरकर, मोहंमद भगतवाले, सलमान शेख, प्रदीप दळवी, जितेंद्र चौधरी, सायबर सेलचे कविश पाळेकर, प्रगती कांबळे यांनी परिश्रम घेतले. या अधिकारी, कर्मचाऱ्यांना पोलीस अधीक्षकांनी रोख २५ हजारांचे पारितोषिक, सीनोट, जीएसटी असे प्रोत्साहनपर बक्षीस जाहीर केले आहे.

पुण्याकडे जाताना रस्त्यातच केली अटक - आरोपींना पोलीस आपल्या मागावर असल्याची कुणकुण लागली. त्यामुळे काळीदौलत खान येथील देवा व प्रमोद राठोड हे दोन आरोपी पुणे येथे पसार होण्यास निघाले. स्थानिक गुन्हे शाखा पथक त्यांच्या मागावर असल्याने मेहकर पोलिसांच्या मदतीने अर्ध्या रस्त्यातच या दोघांना ताब्यात घेतले. याच पद्धतीने नितीन व त्याची पत्नी यांंनाही नागपुरातून पाळत ठेवून उचलले.

 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी