शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
3
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
4
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
5
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
6
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
9
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
10
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
12
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
13
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
14
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
15
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
16
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
17
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
18
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
19
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
20
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
Daily Top 2Weekly Top 5

खून प्रकरणात खर्डा येथील तरुणाला जन्मठेपेची शिक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 1, 2020 06:00 IST

अजय जयसिंगपुरे याने मागील वर्षी ४ फेब्रुवारी रोजी उमेश देवकर याच्या पत्नीला वरुड गावात तिच्या माहेरी पोहोचवून दिले होते. त्याने केलेल्या या मदतीबद्दल उमेशच्या मनात मात्र राग निर्माण झाला. अजय आणि आपल्या पत्नीचे अनैतिक संबंध असल्याचा संशय घेऊन त्याने वाद घातला. यात त्याने चाकूचे वार करून अजयचा खून केला.

ठळक मुद्देजिल्हा न्यायालय : पत्नीला माहेरी नेणाऱ्या इसमाचा संशयातून खात्मा

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : आपल्या पत्नीला माहेरी जाण्यासाठी मदत करणाºया इसमावर अनैतिक संबंधाचा संशय घेऊन त्याचा खात्मा केला. बाभूळगाव तालुक्यातील खर्डा गावात गेल्या वर्षी हा थरार घडला होता. या प्रकरणात जिल्हा सत्र न्यायालयाने शुक्रवारी आरोपीला जन्मठेपेची शिक्षा ठोठावली.उमेश श्यामराव देवकर (२८) रा. खर्डा असे यातील आरोपीचे नाव आहे. तर अजय रामदास जयसिंगपुरे (४७) असे या घटनेतील मृत इसमाचे नाव आहे.अजय जयसिंगपुरे याने मागील वर्षी ४ फेब्रुवारी रोजी उमेश देवकर याच्या पत्नीला वरुड गावात तिच्या माहेरी पोहोचवून दिले होते. त्याने केलेल्या या मदतीबद्दल उमेशच्या मनात मात्र राग निर्माण झाला. अजय आणि आपल्या पत्नीचे अनैतिक संबंध असल्याचा संशय घेऊन त्याने वाद घातला. यात त्याने चाकूचे वार करून अजयचा खून केला. चाकू हल्ल्यात जखमी झालेल्या अजयला दवाखान्यात नेताना त्याच मुलगा अक्षय याच्यावरही आरोपीने चाकूने वार केले होते. या प्रकरणात मयताने मृत्यूपर्व जबानी नोंदविली होती. त्यावरून बाभूळगाव पोलिसांनी गुन्हा नोंदविला. पोलीस उपनिरीक्षक सोपान पाटोळे, प्रदीप पवार यांनी तपास करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले.या खटल्यात सहा साक्षीदार तपासण्यात आले. त्यात अजयची मृत्यूपूर्व जबानी नोंदविणारे सहायक पोलीस उपनिरीक्षक विनोद देशमुख, तसेच अजयचा मुलगा अक्षय याची साक्ष महत्त्वाची ठरली. दोन्ही पक्षाचा युक्तीवाद ऐकल्यानंतर प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश किशोर पेटकर यांनी आरोपी उमेश देवकर याला जन्मठेप दिली. तसेच ५०० रुपये दंड व न भरल्यास तीन महिने कारावास अशी शिक्षा ठोठावली. या प्रकरणात सरकारी पक्षातर्फे अतिरिक्त सरकारी वकील अ‍ॅड. मंगेश एस. गंगलवार यांनी बाजू मांडली. तर पैरवी अधिकारी म्हणून पोलीस हेडकॉन्स्टेबल प्रकाश रत्ने यांनी काम पाहिले.

टॅग्स :Life Imprisonmentजन्मठेप