शहरं
Join us  
Trending Stories
1
World Boxing Championship: भारताच्या लेकीचा 'गोल्डन पंच' ! जास्मिन लंबोरियाने बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये जिंकलं सुवर्ण
2
आजचे राशीभविष्य- १४ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस फायद्याने भरलेला, पण हितशत्रूंपासून सावध राहा
3
गुन्हेगारी पार्श्वभूमी, तुरुंगवास आणि..., कोण आहे टॉमी रॉबिन्सन, ज्याच्या आवाहनानंतर लंडनमध्ये निघाला लाखोंचा मोर्चा
4
पाकिस्तानात दहशतवाद्यांच्या हल्ल्यात १९ सैनिक ठार; ४५ दहशतवाद्यांचा खात्मा
5
"तुम्हाला काय वाटतं याला काही महत्त्व नसतं..."; IND vs PAK सामन्यावर सुनील गावसकरांचे मत
6
लंडनमध्ये १ लाखाहून अधिक स्थलांतर विरोधी आंदोलक रस्त्यावर उतरले, अनेक पोलिसांवर हल्ला
7
मतपेढीच्या राजकारणामुळे ईशान्य भारताचे मोठे नुकसान : पंतप्रधान मोदी
8
'दशावतार' सिनेमासाठी रजनीकांतचा झालेला विचार? दिग्दर्शक म्हणाले- "दिलीप प्रभावळकरांनी नकार दिला असता तर..."
9
पोलिसांच्या ८ तासांच्या ड्युटीचे काय झाले? मनुष्यबळ वाढल्यास ८ तासांची ड्युटी शक्य
10
तुम्ही आता मागास झालात, आपआपसात विवाह ठरवूया; प्रा. लक्ष्मण हाके यांचा मनोज जरांगे यांना प्रस्ताव
11
अंगात 'सिंदूर' नव्हे तर खरी देशभक्ती भिनली पाहिजे; उद्धव ठाकरे यांची भाजपवर टीका
12
'एआय'मुळे खासगी आयुष्य धोक्यात! चेहऱ्यांचे बनावट फोटो, खोटे आवाज, सही याचा गैरवापर
13
आशिया चषकात दुबईच्या मैदानावर आज भारत-पाकिस्तान हायव्होल्टेज द्वंद्व
14
सर्व्हर डाऊनमुळे शेकडोंची 'स्टाफ सिलेक्शन' परीक्षा हुकली; केंद्रावर झाला गोंधळ : पोलिसांना केले पाचारण
15
तुम्हीही शौचालयात मोबाइल घेऊन जाता का?
16
एसईबीसी आरक्षणावर काय परिणाम होईल? मराठा आरक्षणावरील नव्या जीआरबाबत हायकोर्टाची राज्य सरकारला विचारणा
17
कोर्टाचे वारंवार निर्देश म्हणजे आमच्या अधिकारांवर गदा; निवडणूक आयोग म्हणाले, एसआयआर विशेषाधिकार
18
नवरात्रीत लवकर देवीदर्शन हवंय, दामदुप्पट मोजा; मंदिर प्रशासनाने केली शुल्कात वाढ
19
हिंसाचार सोडा, शांतीचा मार्ग स्वीकारा; मणिपूरला शांततेचे प्रतीक बनवू ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आवाहन
20
अमेरिकेनं ओसामा संपवला, पण त्याच्या बायकांचं काय झालं? पाकिस्तानच्या माजी राष्ट्रपतीच्या सहकाऱ्यानं सागितलं

वीज महावितरण कंपनी १४ हजार कोटींच्या कर्जात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2020 11:04 IST

महाराष्ट्र राज्य वीज महावितरण कंपनी आधीच १४ हजार कोटी रुपयांच्या कर्जात आहे. त्यात आता शासनाकडून काही सवलतींची घोषणा केली जात असल्याने महावितरणपुढील आर्थिक संकट आणखी वाढण्याची चिन्हे आहेत.

ठळक मुद्देथकबाकी ५९ हजार कोटी सवलतीच्या घोषणांनी आणखी डबघाईस येण्याची चिन्हे

राजेश निस्ताने।लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : महाराष्ट्र राज्य वीजमहावितरण कंपनी आधीच १४ हजार कोटी रुपयांच्या कर्जात आहे. त्यात आता शासनाकडून काही सवलतींची घोषणा केली जात असल्याने महावितरणपुढील आर्थिक संकट आणखी वाढण्याची चिन्हे आहेत.सुलभ हप्ते, दोन टक्के सूट व आता पुन्हा वीज बिल माफीची तयारी यामुळे महावितरणच्या यंत्रणेतून विरोधी सूर ऐकायला मिळतो आहे. महावितरण आधीच डबघाईस आली असताना त्यात आता शासकीय सवलतीमुळे भर पडण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.

विजेचा दर ७ रुपये २५ पैसे प्रति युनिटविजेचा दर सध्या ७ रुपये २५ पैसे प्रति युनिट असा आहे. वाढीव दर, लॉकडाऊनचा काळ, त्यात उन्हाळा, सर्व लोक घरातच, त्यामुळे विद्युत उपकरणांचा २४ तास वापर आदी देयक वाढण्यामागील प्रमुख कारणे सांगितली जातात.

महसुलात आठ हजार कोटींची कपातमहावितरणने वीज बिलातून वार्षिक ८६ हजार ६५८ कोटी १६ लाख रुपयांच्या महसुलाची आवश्यकता नोंदविली होती. परंतु आयोगाने त्यात आठ हजार ७८३ कोटी ५३ लाख रुपयांची कपात करून महसुली उद्दिष्ट ७७ हजार ८७४ कोटी ६३ लाख रुपयांवर निश्चित केले. सध्या कंपनीवर १४ हजार ५६४ कोटी २१ लाख रुपयांचे कर्ज आहे.

आयोगाची महसुलात ११.२७ टक्के कपातविद्युत बिलाची थकबाकी ५९ हजार ४३१ कोटी १८ लाख एवढी प्रचंड आहे. राज्यातील दोन कोटी ७९ लाख ३४ हजार १३१ वीज ग्राहकांना अविरत वीज पुरवठा सुरू ठेवण्यासाठी महावितरणला ८६ हजार कोटींचा महसूल अपेक्षित आहे. प्रत्यक्षात त्यात आयोगाने ११.२७ टक्के कपात केली आहे.

वीज बिल माफीसाठी आंदोलने सुरूचलॉकडाऊन काळात वीज ग्राहकांना एकत्र देयके दिली गेली. त्यामुळे देयकांचा आकडा प्रचंड फुगला. त्यातूनच नागरिकांमध्ये महावितरणच्या कारभाराविरुद्ध ओरड सुरू झाली. देयके योग्य नाहीत, रीडिंग घेतले नाहीत, असे सांगत ग्राहकांनी वीज बिल कमी करून देण्याची मागणी केली. रस्त्यावर उतरून आंदोलने सुरूआहेत. देयके रीडिंगनुसार व योग्यच आहेत, असे महावितरणचे प्रशासन वारंवार सांगत आहे. महावितरणने वीज बिलाचे सुलभ हप्ते पाडून देण्याची, एकत्र बिल भरल्यास दोन टक्के माफीची सोय केली. मात्र त्यानंतरही वीज बिलाबाबतची ओरड थांबलेली नाही. आता शासनाचा किमान १०० युनिटपर्यंत वीज बिल माफीचा विचार सुरू आहे.

ग्राहकांना दिल्या जाणाऱ्या सवलती या शासनाच्या धोरणाचा भाग आहे, त्याबाबत मी अधिक काही बोलू शकत नाही.- अनिल कांबळे, मुख्य जनसंपर्क अधिकारी (मुंबई)

लॉकडाऊन काळात वीज देयके भरली न गेल्याने महावितरणला आधीच २० हजार कोटींचा फटका बसला आहे. शासनाने सवलती दिल्यास हा फटका आणखी वाढेल. त्यामुळे शासनाने सवलतीची रक्कम महावितरणला द्यावी. वाढीव वीज बिलाबाबत आयोगाने जनसुनावणी घ्यावी.- कृष्णा भोयर, सरचिटणीस, एमएसईबी वर्कर्स फेडरेशन, मुंबई.

संचालकांचा ‘नो-रिस्पॉन्स’महाराष्ट्र राज्य वीज महावितरण कंपनीचे कार्यकारी संचालक (वाणिज्य) सतीश चव्हाण, मुंबई यांच्याशी वारंवार संपर्क केला. मात्र प्रतिसाद मिळाला नाही.

टॅग्स :electricityवीजmahavitaranमहावितरण