शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्री संजय राठोडांच्या खात्यात बदल्यांमध्ये प्रचंड अनियमितता, कोट्यवधींचा ‘गेम’, अनेक अधिकारी कार्यकाळ संपल्यानंतरही खुर्चीवरच
2
राजा रघुवंशी हत्याकांडातील आरोपीला पाहताच राग अनावर, प्रवाशाने ऑन कॅमेरा सणसणीत लगावली, VIDEO व्हायरल
3
शुभांशू शुक्ला यांची अंतराळ मोहीम पुन्हा स्थगित; ऑक्सिजन गळतीमुळे मिशनला लागला ब्रेक
4
बॉलिवूड अभिनेत्रीला स्टेज ४ ब्रेस्ट कॅन्सरचं निदान, लेकीला अमेरिकेला पाठवलं; म्हणाली...
5
"हो, मी बाबा होणार आहे...", अरबाज खानने पहिल्यांदाच दिली प्रतिक्रिया; म्हणाला, "नर्व्हस आहेच..."
6
राशीभविष्य, ११ जून २०२५: आर्थिक लाभाची शक्यता, कामात यश मिळेल, प्रतिस्पर्ध्यांना नामोहरम कराल!
7
घरातून पळून जाऊन लग्न करणाऱ्या जोडप्यांना दणका, हायकोर्टाच्या आदेशानंतर नियमात बदल!
8
SIP देईल छप्परफाड रिटर्न की RD नं बनाल कोट्यधीश? तुमच्या पैशांचा खरा 'बाहुबली' कोण, जाणून घ्या
9
सोनम रघुवंशीने केलेला 'तो' हट्ट ऐकला नसता, तर कदाचित राजा रघुवंशीचा जीव वाचला असता...
10
तुमच्या स्वप्नातील गाडी महागणार? चीनच्या 'या' निर्णयामुळे ऑटो मार्केटमध्ये खळबळ!
11
भाईजान इज बॅक! सलमान खानने ५९ व्या वर्षी घटवलं वजन, फोटो पाहून चाहतेही अवाक; म्हणाले, "हँडसम..."
12
फ्लॅटची साईज वाढली पण कमी झाला कार्पेट एरिया; घर घेणाऱ्यांना होतंय डबल नुकसान, समजून घ्या
13
Mumbai: उत्पन्नामुळं देशभरात चर्चेत आलेल्या मुंबईतील 'त्या' रिक्षावाल्याच्या पोटावर पाय!
14
SSY नं किती श्रीमंत बनेल तुमची मुलगी; १०००, २०००, ३०००, ५००० आणि १०००० रुपयांच्या गुंतवणूकीवर किती रिटर्न?
15
'मला कुणीच लुटू शकत नाही, मीच सगळ्यांना लुटून आलीये'; हत्याकांडानंतर सोनमचा आईशी झालेला संवाद
16
मोठी बातमी! सोलापुरातील करमाळ्याचे माजी आमदार जयवंत जगताप एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत
17
"आम्ही ६-७ तास कचऱ्याच्या ढिगाऱ्यात होतो अन्....", धनुषने रश्मिकाबाबत केला अजब खुलासा
18
प्रजनन क्षमता दर कमी होऊनही यंदा भारताची लोकसंख्या पोहोचणार तब्बल १४६ कोटींवर
19
कुटुंब पूर्ण झालं! सुप्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री दुसऱ्यांदा झाली आई, पतीही आहे लोकप्रिय अभिनेता
20
मुंबईत एका प्रभागात एकच नगरसेवक, नवी मुंबई, ठाणेसह अन्य महापालिकांत चार

खासदार भावना गवळी हरविल्या.. भाजप महिला मोर्चाची पोलिसात तक्रार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2022 18:32 IST

जिल्ह्यातील भाजप महिला मोर्चाने शहर पोलिसात खासदार भावना गवळी हरविल्याची तक्रार दाखल केली.

यवतमाळ : शिवसेनेकडून जिल्ह्यात शिवसंपर्क अभियान सुरू केले आहे. परंतु, या अभियानात यवतमाळ-वाशीम मतदार संघाच्या खासदार भावना गवळी दिसून आल्या नाहीत. तसेच, त्या मागील सहा महिन्यापासून मतदारसंघात फिरकल्या नसल्याचे कारण देत भाजपने 'खासदार दाखवा.. बक्षिस मिळवा' असे पोस्टरच शहरात लावून टाकले. तर, आता जिल्ह्यातील भाजप महिला मोर्चाने खासदार भावना गवळी हरविल्याची तक्रार दाखल केल्याने राजकीय चर्चांना उधान आले आहे.

मुंबईत सुरू असलेली शिवसेना-भाजपमधील राजकीय कुरघोडी आता गावपातळीवर उतरली आहे. दोन्ही पक्षांकडून आरोप-प्रत्यारोप केले जात आहेत. हा हायव्होल्ट ड्रामा जिल्हास्तरावरही राबवावा, असाच अजेंडा सध्या तरी दिसत आहे. भाजप महिला मोर्चाच्या सदस्यांनी बुधवारी यवतमाळ शहर ठाणेदारांच्या नावाने तक्रार अर्ज दिला. 

खासदार भावना गवळी आमच्या मतावर निवडून आल्या. मी एक मतदार म्हणून मागील सहा महिन्यांपासून अनेक समस्यांचा सामना करीत आहे. माझ्या प्रमाणेच सामान्य जनतेलाही अनेक अडचणी आहेत. याबाबतचे साधे निवेदन द्यायचे असेल, तरी कुणाला द्यावे, आमच्या समस्या कोण सोडविणार, याबाबत संभ्रम निर्माण झाला आहे. खासदार गवळी यांना भ्रमणध्वनीद्वारे संपर्क केला असता तो बंद येत आहे. समर्थवाडी येथील निवासस्थानी कुणी उपस्थित नसते. त्यामुळे आमच्या खासदार हरविल्याची तक्रार दाखल करून आपण त्यांचा शोध घ्यावा, असे या तक्रारीत नमूद केले आहे. 

दरम्यान, गेल्या काही महिन्यांपासून खासदार भावना गवळी मतदारसंघात दिसून न आल्याने 'खासदार दाखवा बक्षीस मिळवा' असे बॅनर भाजपने लावले होते. भाजपने लावलेले बॅनर शिवसैनिकांनी काढून टाकले. खासदार भावना गवळी यांना समर्थन देत शिवसैनिकांनी संताप व्यक्त केला. या प्रकरणाने जिल्ह्यातील राजकारण पुन्हा पेटले आहे.

टॅग्स :PoliticsराजकारणBhavna Gavliभावना गवळीShiv SenaशिवसेनाBJPभाजपा