शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
4
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
5
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
6
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
7
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
8
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
9
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
10
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
11
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
12
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
13
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
14
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
15
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
16
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
17
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
18
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
19
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
20
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
Daily Top 2Weekly Top 5

आचारसंहितेपूर्वी कंत्राटी ग्रामसेवकांना नियुक्ती आदेशाच्या हालचाली

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 26, 2024 18:04 IST

५२ पदांची निवड : दोन दिवस जिल्हा परिषदेत होणार उमेदवारांच्या कागदपत्रांची तपासणी, अनुसूचित क्षेत्राबाहेरील पदाचा निकाल जाहीर

लोकमत न्यूज नेटवर्क यवतमाळ : विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लवकरच लागण्याची चिन्हे आहेत. आचारसंहिता लागल्यास कंत्राटी ग्रामसेवक उमेदवारांचे नियुक्ती आदेश लांबणीवर पडू शकतात. यामुळे ३० सप्टेंबर व एक ऑक्टोबर रोजी दोन दिवस जिल्हा परिषदेत पात्र उमेदवारांच्या कागदपत्रांची तपासणी करण्यात येणार आहे त्यानंतर लवकरच नियुक्ती आदेश देण्याच्या प्रशासनाच्या हालचालींना वेग आला आहे. 

जिल्हा परिषदेअंतर्गत २०२३-२४ या वर्षात झालेल्या सरळसेवा पद‌भरतीमध्ये कंत्राटी ग्रामसेवक अनुसूचित क्षेत्राबाहेरील (नॉन पेसा) या पदाचा निकाल जाहीर करण्यात आला. निकालानुसार तात्पुरती ५२ पदांची निवड यादी व प्रतीक्षा यादी जिल्हा परिषदेच्या संकेतस्थळावर सोमवारी प्रसिद्ध करण्यात आली. यादीत ज्यांचे नाव समाविष्ट आहे. त्यांनी सरळसेवा परीक्षेचा अर्ज भरताना ज्या कागदपत्रांच्या आधारे अर्ज सादर केला आहे. त्या सर्व मूळ कागदपत्र व त्या कागदपत्रांच्या दोन छायांकित प्रतीसह ३० सप्टेंबर व एक ऑक्टोबर रोजी सकाळी ११ वाजता जिल्हा परिषद सभागृहात उपस्थित राहावे लागणार आहे. ५२ जागांसाठी निवड व प्रतीक्षा यादीतील १९८ उमेदवारांच्या कागदपत्रांची तपासणी करण्यात येणार आहे. जिल्हा परिषदेअंतर्गत विविध संवर्गासाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात आली होती. लोकसभा निवडणुकीमुळे नियुक्ती आदेश देण्यासाठी आचारसंहिता शिथिल होण्याची प्रतीक्षा जिल्हा परिषद प्रशासनाला करावी लागली होती. आता विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे पुन्हा अशी वेळ येऊ नये, यासाठी सामान्य प्रशासन विभाग कामाला लागले आहे. कागदपत्रांच्या तपासणीनंतर पात्र उमेदवारांना लवकरच नियुक्ती आदेश मिळेल. 

पेसा क्षेत्रातील १०९ पदेकंत्राटी ग्रामसेवकांची २०९ पर्द पैसा क्षेत्रातील आहेत व चिंगर पैसा क्षेत्रात ५२ पढे आहेत, पेसा क्षेत्रातील व बिगर पेसा क्षेत्रातील एकूण १६२ पदे आहेत. मात्र, पैसा क्षेत्रातील पदे हे सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर शासनाकडून प्राप्त निर्देशानंतर भरण्यात येणार आहे. सध्या केवळ ५२ पदांची निवड व प्रतीक्षा यादीनुसार प्रक्रिया पार पडणार आहे.

उमेदवारांना प्रत्यक्ष आदेशाची प्रतीक्षाजिल्हा परिषदेत कंत्राटी ग्रामसेवकाना नियुक्ती आदेश देण्यासाठी प्रशासन कामी लागले आहे. लेखी परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांना प्रत्यक्ष नियुवती आदेश कधी मिळेल याची प्रतीक्षा व उत्सु‌कता आहे.

टॅग्स :Yavatmalयवतमाळ