शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
3
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
4
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
5
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
6
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
7
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
8
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
9
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
10
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
11
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
12
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
13
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
14
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
15
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
16
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
17
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
18
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
19
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
20
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
Daily Top 2Weekly Top 5

खड्ड्याने घेतला आईचा बळी, मुलाची रस्त्यावरच गांधीगिरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 8, 2021 05:00 IST

आपल्या आईचा रस्त्याने बळी घेतला. इतरांची आई सुरक्षित राहावी यासाठी त्याने एकट्याने प्रयत्न सुरू केले आहे. ज्या ठिकाणी आईचा अपघात झाला, तिथे पांढरे पट्टे आखून निषेध असे लिहिले.

लोकमत न्यूज नेटवर्क

यवतमाळ : रस्त्यावर वाहने उसळून अनेकांचा बळी घेतला जात आहे. त्यानंतरही सार्वजनिक बांधकाम विभाग, स्थानिक लोकप्रतिनिधी काही बोलण्यास तयार नाहीत. दारव्हा  रस्त्याचे काम थांबलेले आहे. यामुळे दारव्हा येथील युवकाला आपल्या आईला गमवावे लागले. रस्त्यावर वाहन उसळून झालेल्या अपघातात आईचा मृत्यू झाला. यातून कसेबसे सावरत त्या युवकाने गांधीगिरी करीत इतरांना धोका होऊ नये व शासकीय यंत्रणेचे लक्ष वेधण्यासाठी लाडखेडजवळ ज्या ठिकाणी आईचा अपघात झाला, तिथे पांढरे पट्टे आखून निषेध असे लिहिले. हा व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल होत आहे. युवराज पांडुरंग दुधे, रा. दारव्हा असे या युवकाचे नाव आहे. त्याची आई शोभा पांडुरंग दुधे (५५) यांचा २४ मे रोजी अपघात झाला. रुग्णालयात उपचार घेत असताना डोक्याला गंभीर दुखापत असल्याने त्यांचा मृत्यू झाला. 

आपल्या आईचा रस्त्याने बळी घेतला. इतरांची आई सुरक्षित राहावी यासाठी त्याने एकट्याने प्रयत्न सुरू केले आहे. यवतमाळ-दारव्हा हा रस्ता मागील वर्षभरापासून निर्माणाधीन अवस्थेत आहे. या मार्गावर प्रचंड खड्डे पडले आहेत. त्यामुळे दररोज अपघात होत असतात. या रस्त्यावरून जाणारी प्रत्येक व्यक्ती स्थानिक आमदाराच्या नावाने शिमगा करतो. तर बांधकाम विभागालाही शिव्या हासाडल्या जातात. या समस्येकडे येथील विरोधक किंवा सत्ताधारी राजकीय पक्ष लक्ष देण्यास तयार नाही. त्यामुळेच युवराज सारख्या युवकाला यंत्रणेच्या डोळ्यात अंजन घालण्यासाठी रस्त्यावर यावे लागले. आईच्या निधनाचे दु:ख कुणालाही सहन होणारे नाही. या दु:खातून सावरत युवराजने एकाकी लढा उभारला आहे. आता त्याला कितपत यश येते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. त्याच्या या प्रयत्नात इतरांनीही पुढे यावे जेणे करून रस्ता दुरुस्त होऊन होणारी प्राणहानी थांबेल, एवढीच रास्त अपेक्षा युवराजने ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केली. 

दोन माजी मंत्र्यांचा परिसर तरीही रस्ता नाही

यवतमाळ-दारव्हा हा रस्ता यवतमाळ व दिग्रस या दोन विधानसभा क्षेत्रातील माजी मंत्री राहिलेल्या दिग्गज आमदारांच्या मतदारसंघातून जातो. दोघांचेही पक्षात व शासन दरबारी वजन आहे. मात्र या माजी मंत्री, आमदारांकडून रस्त्याच्या अवस्थेकडे दुर्लक्ष केले जात आहे. दीड वर्षापासून उखडलेल्या रस्त्यावर साधे खड्डेही बुजविले जात नाहीत. लोकनेते म्हणून मिरविणाऱ्या या आमदारांनी याकडे लक्ष द्यावे, अशी मागणी होत आहे.

टॅग्स :pwdसार्वजनिक बांधकाम विभागroad safetyरस्ते सुरक्षा