शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात पाचव्या टप्प्यातील १३ लोकसभा मतदारसंघात अंदाजे ५४.३३ टक्के मतदान  
2
भगवान जगन्नाथ मोदींचे भक्त; संबित पात्रांच्या वक्तव्याने नवा वाद, विरोधकांनी BJP ला घेरले...
3
इराणमधील सत्तासंघर्षामधून इब्राहीम रईसींचा बळी? खोमेनींच्या मुलावर संशय, इराणमध्ये चर्चांना उधाण
4
Narendra Modi : "राजपुत्र उघडपणे सांगत आहेत..."; राहुल गांधींच्या जुन्या Video चा उल्लेख करत मोदींचा घणाघात
5
उत्तर प्रदेशमध्ये बनावट मतदान, अनेक खुलासे; २५ मे रोजी होणार पुन्हा मतदान
6
लोकसभा निवडणुकीदरम्यान बीड आणि बारामतीमध्ये बोगस मतदान, शरद पवारांचा गंभीर आरोप  
7
भोंगळ कारभार! मतदान करता न आल्यानं कलाकार संतापले; सांगितलं नेमकं काय घडलं
8
‘ही लढाई संपलेली नाही, तर आता खरी सुरुवात झालीय’, जयंत पाटील यांचं शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांना भावूक पत्र 
9
सॅमसंगची मोठी घोषणा! तुम्ही तुमचा फुटलेला किंवा खराब झालेला फोन वर्षातून दोनदा दुरुस्त करू शकता
10
"उद्धव ठाकरे यांनी नेहमीप्रमाणे त्यांचे रडगाणे सुरु केले आहे"; देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
11
‘...हा तर अरविंद केजरीवाल यांच्या हत्येचा कट’, ‘आप’चा PMO वर सनसनाटी आरोप
12
... म्हणूनच काँग्रेसवाले आमच्या वाहनांवर हल्ले करतायत; कंगना यांचा गंभीर आरोप
13
प्लेऑफमध्ये KKR विरुद्ध SRHचं पारडं जड, अशी आहे आकडेवारी, थेट फायनल गाठणार की…
14
पंतप्रधान नेतन्याहू आणि हमास प्रमुखांना अटक होणार? ICC अटक वॉरंट जारी करण्याच्या तयारीत
15
मुंबईकर आजोबांना सलाम! नाकात नळी, मतदानाला आले, ओळखपत्र विसरले; पुढे...
16
जिथे शिवसेनेचं मतदान आहे, तिथे...; निवडणूक आयोग भाजपाची चाकरी करत असल्याचा उद्धव ठाकरेंचा आरोप
17
निवडणूक आयोगाच्या नियोजनावर भाजपाही संतापली; "मतदारांचे हाल दुर्दैवी, यातून..."
18
लोकसभेची उमेदवारी घेऊन वायकरांनी आपली अटक टाळली; गजानन कीर्तीकरांचा खळबळजनक दावा
19
"जे लोक मतदान करणार नाहीत त्यांना..."; अभिनेते परेश रावल यांनी मांडली रोखठोक भूमिका
20
अमेरिका, कॅनडा, अरब देशातून AAP ला अवैध फंडिग; ED नं गृह मंत्रालयाला सोपवला रिपोर्ट

आई हरविली अन् मुले सापडली!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 25, 2020 6:00 AM

यापूर्वीही ती यवतमाळात एकटी आली होती. बसस्थानकावर उतरून आॅटोरिक्षा पकडून थेट मंगेशच्या घरी जाणे हा तिचा शिरस्ता होता. मात्र यावेळी यवतमाळचे बसस्थानकच नव्या जागेत बदलले आहे. त्यामुळे अनुसयाबाई संभ्रमित झाल्या. कुठे जावे हे त्यांना कळेना. वाघापूरकडे जाण्याऐवजी ती वडगावकडे निघून गेली. मग तर पंचायईतच झाली. काही केल्या घर सापडेना. शेवटी शनिवारपासून गुरुवारपर्यंत ती भटकत राहिली.

ठळक मुद्देबदललेल्या बसस्थानकाने चुकला रस्ता : पाच दिवस पोराचे घर शोधत फिरत राहिली

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : थकत्या वयात मुलाला भेटण्यासाठी वृद्ध आई आर्वीतून निघाली.. यवतमाळात पोहोचली. पण यवतमाळात आली अन् बसस्थानकाची जागाच बदललेली दिसली. भांबावलेली ही आई वाट चुकली. पोराचे घर काही केल्या सापडेना. एक दोन नव्हे तब्बल पाच दिवस ती नुसतीच फिरत राहिली.. अखेर गुरुवारी रात्री या आईला काही तरुणांनी गाठले. तीच तिची मुले बनली अन् त्यांनी तिला तिच्या खऱ्या मुलापर्यंत सहीसलामत नेऊन पोहोचविले...अनुसयाबाई गजानन भोयर असे या आईचे नाव आहे. वर्धा जिल्ह्यातील आर्वी हे तिचे गाव. दोन मुलांसह ती आर्वीच्या आंबेडकर वॉर्डात राहते. मात्र तिचा तिसरा मुलगा मंगेश हा रोजगारासाठी यवतमाळच्या वाघापूर परिसरात राहतो. मंगेशला एक मुलगा आणि एक मुलगी आहे. या नातवांच्या ओढीने अनुसयाबाई शनिवारी १८ जानेवारीला आर्वीतून एसटीत बसून यवतमाळकडे निघाली. यापूर्वीही ती यवतमाळात एकटी आली होती. बसस्थानकावर उतरून आॅटोरिक्षा पकडून थेट मंगेशच्या घरी जाणे हा तिचा शिरस्ता होता. मात्र यावेळी यवतमाळचे बसस्थानकच नव्या जागेत बदलले आहे. त्यामुळे अनुसयाबाई संभ्रमित झाल्या. कुठे जावे हे त्यांना कळेना. वाघापूरकडे जाण्याऐवजी ती वडगावकडे निघून गेली. मग तर पंचायईतच झाली. काही केल्या घर सापडेना. शेवटी शनिवारपासून गुरुवारपर्यंत ती भटकत राहिली.शनिवारी निघालेली आई अजूनही मंगेशच्या घरी कशी पोहोचली नाही, म्हणून आर्वीतील संजय आणि सुरेश ही मुले हैराण झाली. तिघांनीही शोध सुरू केला. मंगेशने पुलगाव गाठले. वेगवेगळ्या बसस्थानकावर आईचा फोटो चिकटून स्वत:चा नंबरही लिहिला. पण पत्ता लागेना.गुरुवारी रात्री ७ वाजताच्या सुमारास ही वृद्ध आई वडगाव परिसरातील बजरंग चौकात रस्त्याच्या कडेला थकून बसलेली होती. त्याचवेळी प्रा. जयंत चावरे यांना तिच्याकडे पाहून शंका आली. त्यांनी विचारपूस केल्यावर अनुसयाबाईची संपूर्ण हकीगत पुढे आली. चावरे यांच्या माहितीवरून संकल्प फाऊंडेशनचे अध्यक्ष प्रलय टिप्रमवार आपल्या सहकाऱ्यांसह तेथे पोहोचले. अन् शोध सुरू झाला मंगेशच्या घराचा.टिप्रमवार यांनी आपले पुलगाव येथील शिक्षक भाऊ सागर टिप्रमवार यांना फोन करून अनुसयाबाईच्या आर्वी येथील घराचा पत्ता सांगितला. सागर यांनी तो पत्ता आर्वी येथील आपले शिक्षक मित्र वाढवे यांना सांगितला. त्यावरून वाढवे यांनी अनुसयाबाईचा मुलगा सुरेश याला शोधले. त्याच्याकडून यवतमाळातील अनुसयाबाईचा मुलगा मंगेश यांचा फोननंबर मिळविला. अन् फोन येताच मंगेश अक्षरश: धावतच वडगावात आईजवळ पोहोचला. आई दिसताच त्याच्या डोळ्यातून अक्षरश: अश्रूच्या धारा लागल्या...आई घरी पोहोचली नाही, तेव्हा आमच्या पायाखालची जमीनच सरकली होती. पण आपल्या यवतमाळच्या लोकांनी माझ्या आईची आपल्या आईसारखी काळजी घेतली. आई आता सुखरूप आहे. माझ्याजवळच आहे.- मंगेश भोयर, यवतमाळ