शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
3
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
4
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
5
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
6
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
7
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
8
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
9
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
10
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
11
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
12
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
13
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
14
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
15
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
16
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
17
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
18
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
19
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
20
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू

बिटरगावातील व्यापाऱ्याच्या खुनामागे पैशाचा वाद

By admin | Updated: March 28, 2017 01:19 IST

बिटरगाव येथील धान्य व्यापाऱ्याच्या खुनामागे धान्य खरेदीतील पैशाचा वाद असल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे.

यवतमाळ : बिटरगाव येथील धान्य व्यापाऱ्याच्या खुनामागे धान्य खरेदीतील पैशाचा वाद असल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे. यातील मारेकरी हा बिटरगाव येथीलच असून त्याला परभणी येथून अटक करण्यात आली आहे. बळीराम उर्फ बळी गणपत तुपेकर (२४) रा. बिटरगाव असे अटकेतील मारेकऱ्याचे नाव आहे. त्याने गावातीलच धान्य व्यापारी व्यंकटेश वट्टमवार (४८) यांचा शनिवारी सायंकाळी कुऱ्हाडीने घाव घालून निर्घृण खून केल्याचे पुढे आले. बळीचा भाऊ दत्ता तुपेकर याने विकलेल्या धान्याचे पैसे मागण्यासाठी बळी व्यापाऱ्याकडे गेला होता. परंतु व्यवहार भावासोबत झाला त्यामुळे त्यालाच पैसे देईल, असे म्हटल्यावरून वाद वाढला. या वादातच बळीने व्यंकटवर कुऱ्हाडीने वार करून पळ काढला. परंतु खून करताना कुणीही प्रत्यक्षदर्शी नव्हता. त्यामुळे गुन्ह्याचा तपास करण्याचे आव्हान पोलिसांपुढे होते. पोलिसांनी मृताच्या शरीरावरील कुऱ्हाडीचे घाव आणि पळालेल्या आरोपीच्या पावलाचे ठसे याला केंद्रबिंदू केले. व्यापाऱ्यावर हल्ला करणारा हा डावखोरा आणि लंगडत चालणारा असल्याच्या निष्कर्षाप्रत पोलीस पोहोचले. त्यानंतर अशा व्यक्तीचा गावातच शोध सुरू झाला. शेवटी आरोपी बळी असल्याचे प्रथमदर्शनी पुढे आले. तसेच तो गावात नसल्याने पोलिसांचा संशय आणखी बळावला. यावरूनच त्याला परभणी जिल्ह्यातील मिरखेल शेतशिवारातून अटक केली. ही कारवाई परिविक्षाधीन पोलीस अधीक्षक अजय बन्सल यांच्या मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक शिवाजी लष्करे, सहायक निरीक्षक सुरज बोंडे, उपनिरीक्षक श्रीकांत जिंदमवार, जमादार भीमराव शिरसाठ, हरीष राऊत, चालक तांबेकर, होमगार्ड गायकवाड यांनी केली. (कार्यालय प्रतिनिधी)डाव्या हाताने वार आणि अपंगाच्या पाऊलखुणाधान्य व्यापाऱ्याच्या शरीरावर झालेले कुऱ्हाडीचे वार हे डाव्या हाताने केलेले असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. शिवाय घटनास्थळी आढळलेले पायाचे ठसे हे कुण्यातरी अपंगाचे असावे, असा निष्कर्ष काढला गेला. या दोन बाबीच पोलिसांना आरोपीपर्यंत पोहोचविण्यासाठी महत्वपूर्ण ठरल्या.