शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

दंत विभागात मिळणार आधुनिक उपचार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 4, 2019 21:06 IST

येथील वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील दंत चिकित्सा विभाग नामधारीच होता. येथे अतिशय जुजबी उपचार सुविधा मिळत नव्हती. आता या विभागाला नव्याने कार्यान्वित केले जात आहे. अत्याधुनिक उपचार सुविधा मिळविण्यासाठी अत्याधुनिक यंत्र सामग्री खरेदी केली जाणार आहे. त्याचा प्रस्ताव मेडिकल प्रशासनाने शासनाकडे पाठविला आहे. या विभागात दंत महाविद्यालया इतक्या उपचार सुविधा उपलब्ध केल्या जाणार आहेत.

ठळक मुद्देनव्या साधनांची खरेदी : ‘मेडिकल’मध्ये दंत महाविद्यालयाच्या स्तराच्या सुविधा

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : येथील वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील दंत चिकित्सा विभाग नामधारीच होता. येथे अतिशय जुजबी उपचार सुविधा मिळत नव्हती. आता या विभागाला नव्याने कार्यान्वित केले जात आहे. अत्याधुनिक उपचार सुविधा मिळविण्यासाठी अत्याधुनिक यंत्र सामग्री खरेदी केली जाणार आहे. त्याचा प्रस्ताव मेडिकल प्रशासनाने शासनाकडे पाठविला आहे. या विभागात दंत महाविद्यालया इतक्या उपचार सुविधा उपलब्ध केल्या जाणार आहेत.दंतचिकित्सा विभागात दातांच्या नसांचा उपचार, खर्रा-तंबाखू, गुटखा खाल्ल्याने तोंड बंद झालेल्या रुग्णांवर उपचार, दातांवर लघुशस्त्रक्रिया, अक्कल दाढ काढणे, हिरड्यावरिल गाठ काढण्यात येत आहे. या शिवाय इतरही उपक्रम शिबीराच्या माध्यमातून राबविले जाणार आहे. शालेय तपासणी, जनजागृती कार्यक्रम, तंबाखू विरोधी अभियान राबविल्या जाणार आहे. पालकमंत्री मदन येरावार, जिल्हाधिकारी अजय गुल्हाणे यांच्या मार्गदर्शनात अधिष्ठात डॉ. मनीष श्रीगिरीवार यांनी दोन आधुनिक डेंटल चेअर, दोन आरव्हीजी मशीन, रुट कॅनलसाठी लागणारे एन्डोमोटर अ‍ॅन्ड अ‍ॅपेक्स लोकॅटोर ही अत्याधुनिक सामग्री खरेदीचा प्रस्ताव तयार केला आहे. याचा उपयोग उपचारासाठी होणार आहे. मागील १५ दिवसात २० रुग्णांच्या दातांच्या नासाचा उपचार झाला आहे. सहा महिन्यात येथे २५ रुग्णांवर चेहऱ्याच्या हाडाचे फॅक्चर्स, जबड्याच्या गाठी, कॅन्सरच्या गाठी यावर उपचार करण्यात आले आहेत. रूग्णसेवा प्रभावीपणे राबविण्यासाठी डॉ. सुरेंद्र गवार्ले व प्रभारी विभाग प्रमुख डॉ. आशा काळबांडे, सहायोगी प्राध्यापक डॉ. स्मिता खडसे, सहायक प्राध्यापक डॉ. अंकुश सुने, दंतचिकित्सक डॉ. देवेंद्र गावंडे, डॉ. रैना मुडे, डॉ. नम्रता ढुमे, डॉ. कौशल माथूर परिश्रम घेत आहे. त्यांनी दंतचिकित्सा विभागाचा पूर्णत: कायापालट केला आहे.जिल्ह्यात दंत व मुखरोग रुग्णांची संख्या मोठी आहे. आताही बाह्य रुग्ण तपासणी विभागात दिवसाला ६० ते ७० रुग्ण तपासणीकरिता येतात. यातील दहा ते बारा रुग्णांवर अत्याधुनिक पद्धतीने दीर्घ उपचार करणे आवश्यक असते. साधनांअभावी या रुग्णांची परवड होत होती.