लोकमत न्यूज नेटवर्कराळेगाव : शेती तोट्याचा व्यवसाय असल्याची ओरड नेहमी होते. मात्र शेतीत केलेल्या विविध प्रयोगाने भरभराटही येते, हे रिधोराच्या युवा शेतकऱ्याने सिद्ध करून दाखविले आहे. निसर्गशेती करून वेगवेगळे फळ पीक घेणाऱ्या या युवकाने एक मॉडेल तयार केले आहे.आकाश कांडुरवार असे या युवा शेतकऱ्याचे नाव आहे. एमबीए झालेला हा युवक आधुनिक शेतीकडे वळला. स्वत: करत असलेले प्रयोग इतरांनीही करावे आणि समृद्ध व्हावे, असा त्याचा संदेश आहे. आजोबा गणपतराव कांडुरवार यांचा शेतीचा वारसा तो चालवत आहे. वडिलांकडूनही जितके शिकता येईल तितके शिकून घेत त्याने अत्याधुनिक शेतीचा प्रयोग यशस्वी केला.तामिळनाडू, कर्नाटक, गुजरात आदी राज्यात फिरून तेथील शेतकऱ्यांपासून आकाशने गुण घेतला. मालाबार, निंब, कडुलिंब, आवळा, पेरू, जांभूळ, सैतुक, खिरणी, चारोळी, निंबू, अंजीर, शेंद्री कवठ, वॉटर अॅप्पल, चिकू, रामफळ, सीताफळ अशा वेगवेगळ्या प्रकारची रोपं त्याने स्वत:च्या शेतात लावली. सोबतच तीन एकरात इस्राईली पद्धतीने आंबा लावला. विविध प्रकारचे प्रयोग इतर शेतकऱ्यांनीही करावे, असे आकाशचे आवाहन आहे.अॅग्रो टुरिझमचा प्रयोगनैसर्गिक पद्धतीने शेतीचे एक मॉडेल आकाश कांडुरवार याने तयार केले आहे. निसर्गापासून घेतलेले निसर्गाला परत देणे अत्यंत आवश्यक आहे. गायीचे गोमूत्र जमा करणे, कचरा कुजविणे, गांडूळखत तयार करणे आणि ते वापरणे महत्त्वाचे असल्याचे सांगत तो स्वत: हे प्रयोग करीत आहे. स्वत:च्या शेतात चंदन, मालाबार, केसर आंबा आदी प्रकारची रोपं लावण्यासोबतच सोयाबीन आणि कापूसही तो घेतो. सोबतच अॅग्रो टुरिझमचा प्रयोग त्याने सुरू केला आहे.
रिधोरा गावात तयार झाले निसर्ग शेतीचे मॉडेल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2020 05:00 IST
आकाश कांडुरवार असे या युवा शेतकऱ्याचे नाव आहे. एमबीए झालेला हा युवक आधुनिक शेतीकडे वळला. स्वत: करत असलेले प्रयोग इतरांनीही करावे आणि समृद्ध व्हावे, असा त्याचा संदेश आहे. आजोबा गणपतराव कांडुरवार यांचा शेतीचा वारसा तो चालवत आहे. वडिलांकडूनही जितके शिकता येईल तितके शिकून घेत त्याने अत्याधुनिक शेतीचा प्रयोग यशस्वी केला.
रिधोरा गावात तयार झाले निसर्ग शेतीचे मॉडेल
ठळक मुद्देइस्राईली पद्धतीने आंबा : सुशिक्षित युवा शेतकऱ्याकडून नवनवीन प्रयोग, विविध राज्यातून मिळविली माहिती