शहरं
Join us  
Trending Stories
1
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
2
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
3
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
4
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
5
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
6
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
7
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
8
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
9
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
10
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
11
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
12
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
13
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
14
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
15
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
16
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
17
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
18
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
19
"महत्त्वाच्या इमारतींमध्ये अजूनही चिनी cctv; सरकार सत्य दडवतंय"; राहुल गांधी यांचा आरोप
20
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
Daily Top 2Weekly Top 5

मोकाट डुकरांचे कळप वर्दळीच्या रस्त्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 4, 2020 05:00 IST

वारंवार मागणी करूनही वणी नगरपालिकेने डुकरांचा बंदोबस्त करण्यासाठी कुठलेही पाऊल न उचलल्याने मनसेचे अभिनव ‘व्हॉट्सअ‍ॅप आंदोलन’ सुरू केले आहे. कोणतेही निवेदन द्यायचे नाही, चर्चा करायची नाही, कोणतीही मागणी करायची नाही, फक्त शहरातील डुकरांच्या कळपाचे फोटो काढून ते दररोज पालिका मुख्याधिकाऱ्यांच्या व्हॉट्सअ‍ॅपवर पाठवायचे, अशा स्वरूपाच्या या आंदोलनाची आता नगरपालिका प्रशासन कोणत्या प्रकारे दखल घेते, याकडे वणीकर नागरिकांचे लक्ष लागले आहे.

ठळक मुद्देशहरात अपघात वाढले : बंदोबस्तासाठी मनसेचे अभिनव ‘व्हॉट्सअ‍ॅप आंदोलन’

लोकमत न्यूज नेटवर्कवणी : शहरात मोकाट डुकरांची संख्या प्रचंड वाढली असून डुकरांचे कळप वर्दळीच्या रस्त्यावर मुक्तपणे धुमाकूळ घालत असल्यामुळे शहरात दररोज अपघात घडत आहेत. वारंवार मागणी करूनही वणी नगरपालिकेने डुकरांचा बंदोबस्त करण्यासाठी कुठलेही पाऊल न उचलल्याने मनसेचे अभिनव ‘व्हॉट्सअ‍ॅप आंदोलन’ सुरू केले आहे.कोणतेही निवेदन द्यायचे नाही, चर्चा करायची नाही, कोणतीही मागणी करायची नाही, फक्त शहरातील डुकरांच्या कळपाचे फोटो काढून ते दररोज पालिका मुख्याधिकाऱ्यांच्या व्हॉट्सअ‍ॅपवर पाठवायचे, अशा स्वरूपाच्या या आंदोलनाची आता नगरपालिका प्रशासन कोणत्या प्रकारे दखल घेते, याकडे वणीकर नागरिकांचे लक्ष लागले आहे.वणी शहरात डुकरांची संख्या इतकी प्रचंड वाढली आहे, की डुकरांचे हे कळप नागरिकांच्या घराच्या आवारात शिरून धुडगूस घालत आहे. ही डुकरे इतकी निडर बनली आहेत की, लहान मुलांवर हल्ल्याचादेखील प्रयत्न करित आहेत. एक महिन्यांपूर्वी खरबडा, गोकुलनगर परिसरात अंगणात खेळत असलेल्या एका चार वर्षीय बालिकेवर डुकरांचा कळप चालून आला होता. परंतु पालकांनी प्रसंगवधान राखून तिला डुकरांच्या तावडीतून सोडविले होते. डुकरांचे कळप वर्दळीच्या रस्त्यावर सैरावैरा धावत असतात. त्यामुळे अनेकदा दुचाकीचालकांचा अपघात घडतो. एका महिन्यात किमान १० ते १५ अपघात या डुकरांमुळे होत आहेत. यापूर्वी डुकरांच्या बंदोबस्तासाठी नगरपालिकेने कंत्राटदार नेमला होता. काही दिवस डुकरांना पकडून दूर नेऊन सोडण्यात आले. परंतु ही मोहिम मध्येच थांबली. मोकाट डुकरांमुळे सामान्य नागरिक त्रस्त झाला आहे. असे असताना नगरपालिका मात्र डुकरांचा बंदोबस्त करण्यासाठी कोणतेही पाऊल उचलत नसल्याने नागरिकांत संताप व्यक्त होत आहे.जनभावना लक्षात घेऊन मनसेचे राज्य उपाध्यक्ष राजू उंबरकर यांनी डुकरांच्या बंदोबस्तासाठी ‘व्हॉट्सअ‍ॅप आंदोलन’ सुरू केले आहे. नागरिकांनी आपल्या परिसरातील डुकरांच्या कळपाचे फोटो माझ्या वैयक्तीक व्हॉट्सअ‍ॅपवर पाठवावे, असे आवाहनही त्यांनी केले आहे.तर मुख्याधिकाऱ्यांच्या घरात डुकरे सोडणारमोकाट डुकरांमुळे शहरातील नागरिकांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत आहे. त्यामुळे पालिकेने येत्या आठ दिवसात डुकरांचा बंदोबस्त न केल्यास मनसेच्यावतीने मुख्याधिकाºयांच्या घरात डुकरे सोडण्याचा इशारा राजू उंबरकर यांनी दिला आहे.

टॅग्स :Animal Abuseप्राण्यांवरील अत्याचार