शहरं
Join us  
Trending Stories
1
"उत्तर भारतीयांना तमिळ शिकायला सांगा"; हिंदी शत्रू नाही म्हणणाऱ्या अमित शाहांना कनिमोळींचे प्रत्युत्तर
2
काँग्रेसचा मोठ्या पदावरील बडा नेता भाजपात जाणार? निवडणुकीपूर्वी धक्का बसण्याची चिन्हे
3
“तुमचा वाईट पद्धतीने पराभव केला, तुम्ही आता नरकात...”; ट्रम्प यांचा खामेनी यांच्यावर प्रहार
4
महायुती सरकारमध्ये मतभेद! पाचवीपर्यंत हिंदी नको, अजित पवार गटाने मांडली पक्षाची भूमिका
5
Gold price outlook: जागतिक तणाव झाला कमी, सोन्याच्या दरात होणार मोठी घसरण? एक्सपर्ट म्हणाले...
6
Shefali Jariwala Funeral: शेफालीच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार, पती पराग त्यागीची रडून वाईट अवस्था, भावुक करणारा व्हिडिओ
7
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
8
पाणी अंगावर उडाले म्हणून कोयता घेऊन धावला; छत्रपती संभाजीनगरात नशेखोराचा धुमाकूळ
9
अरे देवा! जीवघेण्या धबधब्याच्या काठावर 'ती' बनवत होती 'रील', थरकाप उडवणारा Video Viral
10
"मटण खाणारे पण वारीला आले" म्हणणाऱ्यांना DPने सुनावलं, म्हणाला- "हो मी मटण खातो पण..."
11
“काँग्रेसचा विचार संपवू शकत नाही, वहिनींना पक्षात घेऊन...”; विशाल पाटलांची भाजपावर टीका
12
भारताला दिलासा! मित्र देश पाकिस्तानलाच चीननं दिला मोठा झटका; शहबाज शरीफांचं टेन्शन वाढले
13
ठाकरे बंधूंच्या मोर्चात राष्ट्रवादी अजित पवार गट सहभागी होणार का? सुनील तटकरेंचे सूचक विधान
14
पत्नी म्हणाली "अंगाला हात लावू देणार नाही", चिडलेल्या पतीने व्हिडीओ सुरू केला, गळ्यावर पाय ठेवला अन्... 
15
मालव्य राजयोगाने जूनची सांगता: ८ राशींना मालामाल होण्याची संधी, यश-पैसा-लाभ; जुलै शुभच ठरेल!
16
केदारनाथ येथील हेलिकॉप्टर अपघातात पायलट मुलाचा मृत्यू, पुत्रवियोगाने दु:खी आईने १३ दिवसांनी सोडले प्राण  
17
Aadhaar Card वर तुम्ही मोबाइल नंबर ऑनलाइन बदलू शकता का? काय आहे सर्वात सोपी प्रोसेस, पाहा
18
पाकिस्तानात मोठा आत्मघातकी हल्ला; स्फोटात १३ जवान ठार तर २० हून अधिक गंभीर जखमी
19
₹५००० ची सामान्य एसआयपी की स्टेप अप SIP; कोणती पद्धत लवकर बनवू शकते श्रीमंत? पाहा नफ्याचं गणित
20
'लेडी सेहवाग'च्या 'कमबॅक'मध्ये सचिन तेंडुलकरचा हात! जाणून घ्या त्यामागची स्टोरी

‘मनरेगा’चे काम बंद तरीही ६७ मजूर उपस्थित

By admin | Updated: January 8, 2015 23:02 IST

बाभूळगाव तालुक्यात महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेची कामे धूमधडाक्यात सुरू आहे. हजारो मजुरांच्या हातांना काम दिले जात आहे. त्यात बाभूळगाव ग्रामपंचायतही मागे नाही.

बाभूळगाव : बाभूळगाव तालुक्यात महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेची कामे धूमधडाक्यात सुरू आहे. हजारो मजुरांच्या हातांना काम दिले जात आहे. त्यात बाभूळगाव ग्रामपंचायतही मागे नाही. येथे तर मनरेगाचे काम कुठेही सुरू नसताना तब्बल ६७ मजुरांना कामावर दाखवून मस्टर भरल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. यवतमाळ जिल्ह्यात बाभूळगाव तालुका मनरेगा कामांच्या बाबतीत अग्रेसर आहे. या तालुक्यात मनरेगा अंतर्गत शेकडो कामे झाल्याने हजारो मजुरांच्या हाताला रोजगार मिळाला असल्याचे शासकीय अहवालांवरून दिसून येते. मात्र याच लोकोपयोगी मनरेगा योजनेचे तीनतेरा वाजविण्यात बाभूळगाव ग्रामपंचायतीने कुठलीही कसर सोडली नाही. बाभूळगाव ग्रामपंचायती अंतर्गत पांदन रस्त्याचे काम १ जानेवारी २०१५ ते ७ जानेवारी २०१५ या कालावधीत केल्याचे दाखविण्यात आले. या सात दिवसात पांदन रस्त्याच्या कामावर तब्बल ६७ मजूर राबल्याचेही ग्रामपंचायतच्या मस्टरवरून दिसून येते. मात्र असे कुठलेही काम सद्यस्थितीत बाभूळगाव ग्रामपंचायत अंतर्गत सुरू नाही. त्यामुळे नेमक्या कोणत्या कामांवर नव्या वर्षात गावातील ६७ मजूर राबले, हे एक न उलगडणारे कोडे बनले आहे. या सुरू नसलेल्या कामांचा विषय पंचायत समिती सभापती शशीकला दिघाडे यांच्या कक्षात गुरुवारी चांगलाच गाजला. या कामावर बोगस मजूर दाखविले असल्याचे उपस्थित सर्वांच्याच लक्षात आले. सभापती दिघाडे यांनी मनरेगाच्या संबंधित कर्मचाऱ्याला याबाबत विचारणा करण्यासाठी कक्षात बोलाविले असता त्या कर्मचाऱ्याने चक्क कार्यालयातून पळ काढला. संतप्त झालेल्या सभापतींनी हा सर्व प्रकार पाहून बोगस मजूर दाखवून शासनाच्या तिजोरीवर दरोडा टाकणाऱ्यांची गय केली जाणार नाही. याबाबत वरिष्ठांकडे तक्रार करणार असल्याचे त्यांनी सांगितले. याबाबत ग्रामपंचायतचे सरपंच मारोतराव गाजलेकर यांना विचारणा केली असता सद्यस्थितीत गावात मनरेगाचे कोणतेही काम सुरू नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. त्यामुळे या प्रकरणात नेमके ग्रामपंचायतचे कोण अधिकारी, पदाधिकारी गुंतले आहेत हा प्रश्न सध्या अनुत्तरित आहे. बोगस मजुरांचा विषय कशा पद्धतीने हाताळला जातो व दोषींवर काय कारवाई होते, याकडे तालुक्याचे लक्ष लागले आहे. (प्रतिनिधी)