शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

नागरिकत्व सुधारणा कायद्याबाबत गैरसमज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 16, 2019 19:14 IST

नागरिकत्व कायद्यामुळे स्थानिक मुस्लीमांना कोणताही धोका नाही किंवा हा कायदा घटनाबाह्य नसल्याचा दावा केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केला.

ठळक मुद्देकाँग्रेसकडून दिली जातेय चिथावणी

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी संसदेत मांडलेल्या नागरिकत्व सुधारणा विधेयकाबाबत अनेक गैरसमज पसरविले जात आहे. काँग्रेसकडून चिथावणी देत आंदोलन घडवून आणले जात आहे. या विधेयकात कुणावरही अन्याय होणार नाही, केवळ बाहेरच्यांना नागरिकत्व देण्याची तरतूद केल्याचे केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी यवतमाळ येथील शासकीय विश्रामगृहात सोमवारी आयोजित पत्रपरिषदेत सांगितले.नागरिकत्व कायद्यामुळे स्थानिक मुस्लीमांना कोणताही धोका नाही किंवा हा कायदा घटनाबाह्य नसल्याचा दावा त्यांनी केला. मोदी सरकारने घेतलेले निर्णय देशहिताचेच आहे. जम्मू काश्मिरचा विशेष दर्जा कमी केला. तेथील ३७० कलम काढून जम्मू काश्मिर व लडाख या केंद्रशासित प्रदेशांची निर्मिती केली. तेथील तणाव कमी झाल्यानंतर त्यांना स्वतंत्र राज्याचा दर्जाचा दिला जावा, अशी मागणी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्याकडे केली असल्याचे ना. आठवले यांनी सांगितले.दलित व आदिवासींनी कुठलाही संभ्रम मनात ठेऊ नये, कुणाचेही आरक्षण काढले जाणार नाही, सबका साथ-सबका विकास याच धोरणावर केंद्रातील सरकार काम करीत आहे. आर्थिक मंदीही जागतिक स्तरावरच आहे. या मंदीच्या काळात बाहेर पडण्यासाठी भाजप सरकार प्रयत्न करीत असल्याचे त्यांनी सांगितले. महाराष्ट्रात भाजप-शिवसेनेचे सरकार बनायला हवे होते. मात्र महाविकास आघाडीचे सरकार बनले, ते ५० दिवस टिकते की नाही, अशी चिन्हे दिसत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. काँग्रेसचे राहूल गांधी यांनी सावरकर यांच्याबाबत अतिरेकी भूमिका मांडली. स्वातंत्र्यवीर सावरकर हे देशभक्त होते. त्यांनी देशासाठी कारावास भोगला. आता याच मुद्यावर काँग्रेस व शिवसेनेत जुंपली आहे. काँग्रेसने शिवसेनेचा पाठिंबा काढावा आणि भाजप-सेनेचे सरकार महाराष्ट्रात स्थापन व्हावे, अशी अपेक्षा रिपब्लिक पार्टीला असल्याचे ना.रामदास आठवले यांनी सांगितले.रिपब्लिकन पक्ष हाच बाबासाहेबांचा पक्ष आहे. आता हा पक्ष देशपातळीवर वाढत असल्याचेही ना. आठवले यांनी पत्रपरिषदेत सांगितले. यावेळी रिपाइंचे प्रदेशाध्यक्ष भूपेश थुलकर, जिल्हाध्यक्ष महेंद्र मानकर, आर.एस. वानखडे, गोविंद मेश्राम, प्रदीप दंदे, चंद्रकांत पाटील, बाळू घरडे, प्रभाकर जीवने, नवनीत महाजन, गौतम चव्हाण, सुधाकर तायडे, धर्मराज गायकवाड, सुखदेवराव जाधव आदी उपस्थित होते.

टॅग्स :Ramdas Athawaleरामदास आठवले