शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

एका कॉलने बेपत्ता मुलीला मिळाले आई-वडील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 26, 2017 01:46 IST

शेकडो मैल दूर असलेल्या गावातून एक २८ वर्षीय मुलगी महिनाभरापूर्वी बेपत्ता झाली. या आघाताने ती विमनस्क स्थितीत अकोलाबाजार परिसरात भटकत होती.

ठळक मुद्देछत्तीसगडची मुलगी : अकोलाबाजार शिवारात भटकंती, वडगाव जंगल पोलिसांची तत्परता

ऑनलाईन लोकमत यवतमाळ : शेकडो मैल दूर असलेल्या गावातून एक २८ वर्षीय मुलगी महिनाभरापूर्वी बेपत्ता झाली. या आघाताने ती विमनस्क स्थितीत अकोलाबाजार परिसरात भटकत होती. या मुलीबाबत एका जागृत नागरिकाने वडगाव जंगल पोलिसांना कॉल केला अन् त्या मुलीला तिचे आई-वडील मिळाले.गेल्या काही दिवसांपासून अकोलाबाजार शिवारात एक मुलगी बेवारस फिरताना दिसली. याबाबत प्रवीण मोगरे यांनी वडगाव जंगल पोलीस ठाण्याचे ठाणेदार दिलीप मसराम यांना फोनवरून माहिती दिली. मसराम यांनी मुलीला लगेच पोलीस ठाण्यात आणले. तिची मानसिक स्थिती शांत झाल्यानंतर तिला विश्वासात घेऊन चौकशी केली. त्यात सदर मुलीने तिचे नाव भगवती रामप्यारे साहू असल्याचे सांगितले. ती छत्तीसगड राज्यातील नवगांव, पोलीस ठाणे बलौदा, ज़िल्हा जांजगीर चंपा येथील असल्याचे तिने सांगितले. माहिती मिळताच ठाणेदार दिलीप मसराम यांनी बलौदा पोलीस ठाण्याशी संपर्क करून चौकशी केली. तेथे २० आॅक्टोबरला भगवती हरविल्याची तक्रार तिच्या आई-वडिलांनी दिल्याची नोंद होती.या माहितीवरून तिला शुक्रवारी आई-वडिलांसह छत्तीसगडमध्ये घरी परत पाठविण्यात आले. केवळ एका फोन कॉलमुळे भगवतीला तिचे घर परत मिळाले. यात ठाणेदार मसराम यांनी मोलाची भूमिका निभावली. त्यांच्या सजगतेमुळेच एका मुलीला अगेर आई-वडिलांचे छत्र परत मिळाले. पोलीस अधीक्षक एम. राज कुमार, अपर अधीक्षक अमरसिंह जाधव, एसडीपीओ पीयूष जगताप यांच्या मार्गदर्शनानुसार ठाणेदार दिलीप मसराम, उपनिरीक्षक विजयकुमार घुले, बालाजी ससाणे, होमदेव किनाके, प्रेमदास फुलके, देवराव मरसकोल्हे, मधुकर पवार, राजू तोडसाम, देवराव बन्सोड, नितीन आत्राम, आशिष उईके, नकुल रोडे, विश्वास थूल, संध्या वेलादे यांनी भगवतीला हक्काचे घर मिळवून दिले.