शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

लाखो रूपयांचा कापूस आगीत भस्मसात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 19, 2020 06:00 IST

या आगीत ३० ते ४० लाख रूपयांचा कापूस जळाल्याचा प्राथमिक अंदाज जिनिंगचे संचालक आरिफ कादर यांनी व्यक्त केला आहे. या जिनिंगमध्ये सीसीआयनेदेखील आपला कापूस मोठ्या प्रमाणावर ठेवला आहे. जिनिंगमध्ये मंगळवारी कापूस खरेदी-विक्रीचा व्यवहार सुरू असल्याने कापूस उत्पादक शेतकऱ्यांचीही मोठी गर्दी होती. दुपारी १.३० वाजताच्या सुमारास अहेफाज जिनिंगच्या मालकीच्या कापूस गंजीला अचानक आग लागली.

ठळक मुद्देवणीतील घटना : यंत्रातून निघालेल्या ठिणगीमुळे आग लागल्याची शंका

लोकमत न्यूज नेटवर्कवणी : येथील निळापूर-ब्राम्हणी मार्गावर असलेल्या अहेफाज जिनिंगमध्ये मंगळवारी दुपारी १.३० वाजताच्या सुमारास कापसाच्या गंजीला अचानक आग लागली. पाहता-पाहता या आगीने रौद्ररूप धारण केले. त्यात लाखो रूपयांचा कापूस जळून खाक झाला.विशेष म्हणजे गेल्या दोन महिन्यात अहेफाज जिनिंगमध्ये आगीची ही दुसरी घटना आहे. दरम्यान, याप्रकरणी जिनिंग संचालकाने सायंकाळी उशिरापर्यंत पोलिसांकडे तक्रार केली नव्हती. या आगीत ३० ते ४० लाख रूपयांचा कापूस जळाल्याचा प्राथमिक अंदाज जिनिंगचे संचालक आरिफ कादर यांनी व्यक्त केला आहे. या जिनिंगमध्ये सीसीआयनेदेखील आपला कापूस मोठ्या प्रमाणावर ठेवला आहे. जिनिंगमध्ये मंगळवारी कापूस खरेदी-विक्रीचा व्यवहार सुरू असल्याने कापूस उत्पादक शेतकऱ्यांचीही मोठी गर्दी होती. दुपारी १.३० वाजताच्या सुमारास अहेफाज जिनिंगच्या मालकीच्या कापूस गंजीला अचानक आग लागली. गंजीतील कापूस बेल्टद्वारे रेचाकडे नेण्यात येत असताना तेथे ठिणगी पडली. त्यातून ही आग लागल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. पाहता-पाहता आगीने रौद्ररूप धारण केले. त्यामुळे आकाशात धुरांचे लोट दिसू लागले. त्यामुळे वणी शहरातील नागरिकांनी घटनास्थळाकडे धाव घेतली. जिनिंग मालकाने तातडीने अग्नीशमन विभागाला आगीची माहिती देताच, पालिकेचे अग्नीशमन दल घटनास्थळी दाखल झाले. आगीची भीषणता पाहून आणखी एक बंब मागविण्यात आला. मात्र त्या वाहनाला चालकच नसल्याने अग्नीशमन दलाचा बंब घटनास्थळी पोहोचू शकला नाही.ज्या कापसाच्या गंजीला आग लागली, त्या गंजीजवळच सीसीआयने खरेदी केलेला पाच ते सहा हजार क्विंटल कापूस ताडपत्रीखाली झाकून होता, तर त्याच्या बाजुलाच ७० ते ८० कापसाच्या गठाणी पडून होत्या. आगीचे रौद्ररूप पाहून जिनिंगच्या परिसरात असलेली वाहने युद्धपातळीवर बाहेर काढण्यात आली. अगोदरच या जिनिंगच्या मार्गावर कापसाने भरलेल्या वाहनांची रांग लागून होती. त्यातच जिनिंग आवारातील वाहनेही तातडीने या मार्गावर आल्याने काही काळ वाहतूक ठप्प झाली होती. घटनेची माहिती मिळताच ठाणेदार वैभव जाधव यांच्या सूचनेवरून डी.बी.पथक प्रमुख पीएसआय गोपाल जाधव हे आपल्या सहकाऱ्यांसह घटनास्थळी दाखल झाले.

टॅग्स :fireआग