शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

मालकी नसताना रस्त्यांवर लाखो खर्च !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2017 01:16 IST

जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभाग क्र. २ ने चक्क आपली मालकी नसलेल्या रस्त्यांवर लाखो रुपयांचा खर्च केल्याचा खळबळजनक प्रकार उघडकीस आला.

जिल्हा परिषदेचा कारभार : अतिरिक्त सीईओंची दिशाभूल, ले-आऊट मालकांची सोयलोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभाग क्र. २ ने चक्क आपली मालकी नसलेल्या रस्त्यांवर लाखो रुपयांचा खर्च केल्याचा खळबळजनक प्रकार उघडकीस आला. आर्णी व पुसद तालुक्यात अशी कामे ले-आऊट मालकांसाठी केली गेल्याचे सांगितले जाते. उमरखेड येथील शाखा अभियंता सुनील शिरसाट यांच्या निलंबनाचे आदेश जारी झाले. एकाच रस्त्याचे दुसऱ्यांदा बांधकाम करण्याचा प्रयत्न करणे असा ठपका त्यांच्यावर ठेवला गेला. या अनुषंगाने जिल्हा परिषद बांधकाम विभाग क्र. २ च्या कारभाराचे खोदकाम केले असता या पेक्षाही गंभीर प्रकार उघडकीस आले. या विभागाने मालकी नसलेल्या रस्त्यांवर शासनाच्या लाखो रुपयांच्या निधीची उधळपट्टी केल्याचे पुढे आले. तत्कालीन तांत्रिक अभियंता व कार्यकारी अभियंत्याच्या संगनमताने सन २०१४-१५ मध्ये हा कारनामा घडला. त्यांनी प्रशासकीय मान्यतेसाठी तत्कालीन अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांची दिशाभूल केली. आधी प्रशासकीय मान्यता आणि नंतर उपविभागातून कामाचे अंदाजपत्रक बोलविले गेले. यासाठी बांधकाम समितीचा ठरावही दाखविला गेला. राजकीय नेत्यांच्या खास इशाऱ्यावरून ही कामे करण्यात आली. शासनाच्या या निधीतून खासगी ले-आऊटमधील रस्ते बांधून देण्यात आले. रस्ता मालकीचाच नसताना त्यावर झालेला हा खर्च म्हणजे शंभर टक्के अपहार आहे. याची प्रामाणिकपणे चौकशी झाल्यास तत्कालीन संबंधितांना हातकड्या लागण्यास वेळ लागणार नाही. खासगी रस्ता शासनाच्या ताब्यात द्यायचा असेल तर त्याचा प्रस्ताव उपअभियंता दाखल करतो. नंतर कार्यकारी अभियंता जिल्हा परिषद सर्वसाधारण सभेत तो ठेवला जातो. त्यानंतर तो रस्ता बांधकाम विभागाच्या बार चार्टवर येतो. मात्र यापैकी काहीही झालेले नसताना आर्णी व पुसद तालुक्यात प्रत्येकी १५ लाख रुपये किंमतीची रस्त्याची अनेक कामे करण्यात आली. अन्य तालुक्यांमध्येही असे प्रकार असल्याचे सांगितले जाते. या प्रकारामुळे तत्कालीन संबंधित अधिकारी, पदाधिकारी संशयाच्या भोवऱ्यात सापडले आहे. त्यांना ले-आऊट मालकांकडून तर ‘लाभ’ झाला नाही ना, अशी शंका व्यक्त होत आहे. राजकीय नेत्यांची मर्जी राखण्यासाठी शासकीय निधीच्या या खर्च प्रकरणात चौकशीचे आव्हान आहे. कामे केली जात असलेले हे रस्ते जिल्हा परिषदेच्या बार चार्टवर आहेत का हे तपासण्याची तसदी ना तत्कालीन अपर सीईओंनी घेतली ना वित्त विभागाने. त्यामुळेच बांधकाम अभियंत्यांची नेत्यांना खूष करण्याची ही योजना यशस्वी झाली. ‘पीआरसी’चा दौरा अन् घोटाळ्याची मालिका विधीमंडळाच्या पंचायत राज समितीचा (पीआरसी) जिल्हा दौरा नियोजित आहे. जागीच निलंबित करण्याचे अधिकार असलेल्या ‘पीआरसी’चा हा दौरा तोंडावर असतानाच यवतमाळ जिल्हा परिषदेतील एका पाठोपाठ घोटाळे उघड होत आहे. त्यामुळे या घोटाळ्यांमध्ये सहभागी अधिकाऱ्यांचे धाबे दणाणले आहे. ‘पीआरसी’च्या या दौऱ्याला आणखी अवधी आहे. तोपर्यंत असे आणखी काही घोटाळे उघड होण्याची शक्यता नाकारता येत नाही.