शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

भुलाई येथे २० गुंठ्यात लाखोंचे उत्पन्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 21, 2019 22:26 IST

भुलाई येथील एका शेतकऱ्याने केवळ २0 गुंठे क्षेत्रात एक लाख रुपयांचे अ‍ॅपल बोरांचे उत्पन्न घेतले. या हंगामी फळासोबतच त्यांनी सोयाबीनचे आंतरपीकसुद्धा घेतले. कमी जागेत चांगले उत्पन्न घेण्याच्या त्यांच्या प्रयोगाचे कौतुक होत आहे.

ठळक मुद्देअ‍ॅपल बोरं: हंगामी पीक, दारव्हा तालुक्यातील शेतकरी गोरले यांचा पहिलाच यशस्वी प्रयोग

मुकेश इंगोले ।लोकमत न्यूज नेटवर्कदारव्हा : भुलाई येथील एका शेतकऱ्याने केवळ २0 गुंठे क्षेत्रात एक लाख रुपयांचे अ‍ॅपल बोरांचे उत्पन्न घेतले. या हंगामी फळासोबतच त्यांनी सोयाबीनचे आंतरपीकसुद्धा घेतले. कमी जागेत चांगले उत्पन्न घेण्याच्या त्यांच्या प्रयोगाचे कौतुक होत आहे.अनंतकुमार रामराव गोरले, असे या युवा शेतकऱ्यांचे नाव आहे. त्यांच्याकडे केवळ तीन एकर शेती आहे. पारंपारिक पिकांपासून चांगले उत्पन्न मिळत नाही. कुटुंबाच्या वाढलेल्या गरजा भागविता येत नाही. त्यामुळे त्यांनी शेतात वेगवेगळे प्रयोग करण्यास सुरुवात केली. यातून त्यांना नातेवाईकाकडून अ‍ॅपल बोरांची माहिती मिळाली. नंतर ४० रुपये प्रति दराने २०० रोपे आणली. त्यांची २० गुंठे जागेत लागवड केली. रोपांचे संगोपन केल्यानंतर चार महिन्यांत झाड तयार होऊन त्याला बोरे लागली. आठ महिन्यांच्या कालावधीत एका झाडापासून त्यांना ३५ ते ४० किलो बोरांचे उत्पन्न मिळाले. एका किलोला किरकोळ विक्रीतून ३०, तर ठोक विक्रीतून २२ रुपये मिळाले. यातून खर्च वजा जाता त्यांना एक लाखाचे उत्पन्न झाले.हंगाम संपला की झाडांची कटाई करून त्याचा कुंपणाकरिता उपयोग होतो. यात झाडे विक्रीतून पैसे मिळतील. बोरांच्या झाडाला २५ ते ३० वर्षे फळे येतात. पुढील वर्षी लागवडीचा खर्च न येता उत्पन्न मिळते. त्यामुळे हे पीक शेतकऱ्यांना अत्यंत फायदेशीर असल्याचे अनंतकुमार यांनी दाखवून दिले. कमी जागा व कमी खर्चात चांगले उत्पन्न मिळू शकते, हे त्यांनी सिद्ध केले.युवा शेतकऱ्याची जिद्द वाखाणण्याजोगीगोरले यांच्याजवळ केवळ तीन एकर शेती आहे. तेवढ्याच जागेत खरीपात कापूस, सोयाबीन, तर रबी हंगामात हरभरा, गहू पेरला जातो. आता अ‍ॅपल बोरे, भाजीपाला असे वेगवेगळे प्रयोग करून बाराही महिने उत्पन्न घेण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. जिद्द आणी मेहनतीने यात चांगले यश मिळत आहे. शेतमाल तसेच फळांचे बाजारात चांगले भाव असले तरी शेतकºयांना आपला माल ठोक पद्धतीने व्यापाऱ्यांना बेभाव विकावा लागतो. त्यामुळे अनंतकुमार यांनी दारव्हा-कारंजा मार्गावर असणाºया आपल्या शेतातच दुकान टाकून स्वत: बोराची विक्री केली. त्यांना ३0 रुपये किलोचा भाव मिळाला.