शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताला ५० टक्क्याचा शॉक; ट्रम्प यांनी दुप्पट केले टॅरिफ; काय होणार परिणाम?
2
आजचे राशीभविष्य, ०७ ऑगस्ट २०२५: चिंतामुक्त व्हाल, हाती पैसा राहील; यशाचा शुभ दिवस
3
डोनाल्ड ट्रम्पच्या प्रयत्नांनाही पुतिन बधले नाहीत! चीनसोबत युद्धाची तयारी सुरू; पुढे काय करणार?
4
घरे, झाडे सर्व काही गाडले, हाती काही लागेना; मानवाच्या हव्यासाने आले संकट
5
डोनाल्ड ट्रम्प भारतात राहायला येणार? रहिवासी प्रमाणपत्रासाठी केला अर्ज! प्रशासनाची कोंडी
6
उत्तराखंडमधील ढगफुटीचे थैमान; महाराष्ट्रातील ५१ पर्यटक सुरक्षित
7
सावरकर सदन: वारसास्थळ दर्जाचा लवकरच निर्णय; महापालिकेची हायकोर्टात माहिती; अभिनव भारत काँग्रेसची याचिका
8
रेपो दर जैसे थे; कर्ज हप्ता राहणार स्थिर; ‘ट्रम्प टॅरिफ’च्या पार्श्वभूमीवर रिझर्व्ह बँकेचा निर्णय
9
दिव्याखाली अंधार! हा घ्या, अमेरिकेने रशियाकडून केलेल्या आयातीचा हिशेब
10
महिंद्रा अँड महिंद्रा समूहाचे कर्मचारी होणार मालामाल, मिळणार ५०० कोटींचे शेअर्स
11
शिंदे, ठाकरे दिल्लीत, चर्चा महाराष्ट्रात! एकनाथ शिंदेंची अमित शाह यांच्याशी बंदद्वार चर्चा; पंतप्रधानांना सहकुटुंब भेटले
12
यूपीआय फ्री की फी? शुल्काचे संकेत; काय म्हणाले RBI गवर्नर संजय मल्होत्रा?
13
...तर निवृत्तीनंतरचे आयुष्य येईल धोक्यात, हे करा उपाय
14
"हा अमेरिकेचा दुटप्पीपणाच, भारताने आता..."; शशी थरुर यांनी मोदी सरकारला काय दिला सल्ला?
15
"राष्ट्रहिताच्या रक्षणासाठी आम्ही..."; ५० टक्के टॅरिफनंतर भारताचे डोनाल्ड ट्रम्प यांना उत्तर
16
"अंधभक्तांना विनंती, राजकीय नियुक्तीचे समर्थन करु नका; कारण..."; रोहित पवारांनी काय दिला इशारा?
17
अहिल्यानगर: चौथीत शिकणाऱ्या मुलीवर शिक्षकाकडूनच अत्याचाराचा प्रयत्न, नेत्याने प्रकरण दाबले; पण...
18
'पंतप्रधानांना महादेवाची प्रतिमा भेट दिली, कारण...'; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मोदींच्या भेटीनंतर काय बोलले?
19
कोल्हापुरकरांसाठी आनंदाची बातमी! वनताराच्या सीईओंनी केली मोठी घोषणा; महास्वामीही म्हणाले, अंबानींच्या भूमिकेला....
20
बापाचा दारु प्यायल्यामुळे मृत्यू, बारचालकांचा बदला घेण्यासाठी मुलगा बनला चोर; सगळं प्रकरण ऐकून पोलिसही चक्रावले

सोयाबीन पिकावर लष्करी अळीचा हल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2020 05:00 IST

गेल्या सप्ताहात सतत दहा दिवस पाऊस कोसळला. सततच्या पावसामुळे खरिपातील सोयाबीनसह मूग, उडीद आणि कापूस पिकाला फटका बसला. सोयाबीनवर लष्करी अळीचे आक्रमण झाले. ही अळी पानांवर बसून छिद्र पाडत आहे. सततच्या पावसामुळे व ढगाळ वातावरणामुळे खरीप पिकांवर विपरीत परिणाम झाला आहे. सोयाबीनचे उभे पीक डोळ्यादेखत नष्ट होत असल्याने शेतकरी काळजीत पडले आहे.

ठळक मुद्देउमरखेड तालुका : शेतकरी चिंताग्रस्त, उभ्या पिकांचे नुकसान, पाने कुरतडली

लोकमत न्यूज नेटवर्कउमरखेड : तालुक्यात गेल्या सप्ताहात सतत पाऊस झाला. या पावसामुळे सोयाबीनवर लष्करी अळीने हल्ला केला. यामुळे सोयाबीनचे नुकसान होत असल्याने तालुक्यातील शेतकरी चिंताक्रांत झाले आहे.गेल्या सप्ताहात सतत दहा दिवस पाऊस कोसळला. सततच्या पावसामुळे खरिपातील सोयाबीनसह मूग, उडीद आणि कापूस पिकाला फटका बसला. सोयाबीनवर लष्करी अळीचे आक्रमण झाले. ही अळी पानांवर बसून छिद्र पाडत आहे. सततच्या पावसामुळे व ढगाळ वातावरणामुळे खरीप पिकांवर विपरीत परिणाम झाला आहे. सोयाबीनचे उभे पीक डोळ्यादेखत नष्ट होत असल्याने शेतकरी काळजीत पडले आहे. तालुक्यात सोयाबीनसह कापूस, मूग, उडीद आणि हळदीचेही मोठ्या प्रमाणात पीक घेतले जाते. यावर्षी कापूस आणि सोयाबीनची जादा लागवड करण्यात आली. मात्र आता पिकावर अळीने हल्ला केल्याने शेतकरी पुन्हा एकदा संकटात सापडले आहे.सुरुवातीला पावसाने दडी मारल्याने अनेक शेतकऱ्यांना दुबार पेरणीला सामोरे जावे लागले. अनेकांच्या शेतात सोयाबीनचे बियाणे उगवले नाही. मात्र शेतकऱ्यांनी आर्थिक तजवीज करून दुबार पेरणी केली. आता पीक ऐन जोमात असताना अतिपावसाने दगा दिला. अनेक शेतांमध्ये सर्वत्र पाणी साचले. यामुळे कापूस व सोयाबीन उत्पादक संकटात सापडले आहे.तालुक्यात सर्वत्र दहा दिवस सतत पाऊस सुरू असल्याने लष्करी अळीचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव झाला आहे. या अळीमुळे सोयाबीन पिवळे पडत आहे. तालुक्यातील लोकप्रतिनिधी व प्रशासनाने शेताच्या बांधावर जावून पिकांची पाहणी करावी आणि नुकसानग्रस्त शेतकºयांना न्याय द्यावा, अशी मागणी होत आहे. शेतकºयांना लोकप्रतिनिधी व प्रशासनाकडून आर्थिक मदतीची अपेक्षा आहे.महागाव तालुक्यात शेंगा गळाल्यामहागाव : तालुक्यात घोनसरा परिसरात अनेक शेतांमधील सोयाबीन शेंगा गळत आहे. सततच्या पावसामुळे पीक अडचणीत आले आहे. जमिनीतील ऑक्सिजनचे प्रमाण कमी होत असल्याने कपाशीची मुळेही ढिली होत आहे. कपाशीवर पांढरी माशी व तुडतुडे आणि बुरशीचा प्रादुर्भाव वाढला आहे. जमीन चिबडल्याने सोयाबीन, कपाशी, मूग, उडीद यांच्यासह भाजीपाला आणि फळवर्गीय पिकांवर विविध किटकांचा प्रादुर्भाव होत आहे. यामुळे महागाव तालुक्यातील शेतकरी संकटात सापडले आहे.

टॅग्स :agricultureशेती