शहरं
Join us  
Trending Stories
1
"ऑपरेशन सिंदूर हे लहान मुलांच्या व्हिडीओ गेमसारखे" नाना पटोलेंचं वक्तव्य
2
भाजपाची खेळी स्वत:वरच उलटली; १० पैकी ९ नगरसेवकांनी बनवला स्वतंत्र गट, CM फडणवीसांना धक्का
3
पाकिस्तानच्या नागरिकांची अन्नासाठी वणवण अन् ११ कोटींचा शेफ बनवणार शाहबाज शरीफ यांचं जेवण!
4
धरणं सुकली, शेतकरी त्रासले; सिंधु पाणी करार स्थगित झाल्याने पाकिस्तानमध्ये हाहाकार! सध्या परिस्थिती काय?
5
Paytm च्या शेअरमध्ये १०% ची मोठी घसरण; सरकारच्या एका पोस्टनं स्टॉकमध्ये भूकंप
6
कामाख्या देवीचं दर्शन ठरलं अखेरचं! राजा रघुवंशीचा मंदिरातील 'तो' फोटो आला समोर
7
आधीच कर्जबाजारी त्यात आणखी भर! पाकिस्तान चीनकडून ४० विमाने खरेदी करणार; बजेटमधून मोठा खुलासा
8
ट्रम्प आणि मस्क यांच्यात 'पॅच-अप'? माफी मागताच एकाच रात्रीत संपत्तीत 'एवढी' वाढ!
9
पन्नाशी ओलांडली तरी इतक्या फिट कशा आहेत कविता मेढेकर? म्हणाल्या- "दोन मुलं झाली तरी..."
10
हनिमूनलाच केली नवऱ्याची हत्या; सोनम-राजा रघुवंशीसारखीच अंगावर काटा आणणारी घटना
11
IND vs ENG: कसोटी मालिकेआधी इग्लंडच्या उपकर्णधाराला विराट कोहलीची आठवण, म्हणाला...
12
राज-फडणवीस भेटले, विरोधकांचे टेन्शन वाढवले? महापालिका निवडणुकीच्या तोंडावर झालेल्या या भेटीसंदर्भात नाना पटोले काय बोलले?
13
'काँग्रेस का हात, पाकिस्तान के साथ' हे पुन्हा एकदा सिद्ध झालं; भाजपाचा नाना पटोलेंवर पलटवार
14
मोठी 'राज'कीय घडामोड! देवेंद्र फडणवीस - राज ठाकरे यांची ताज हॉटेलमध्ये बैठक? चर्चांना उधाण
15
देवेंद्र फडणवीस-राज ठाकरे भेटीनंतरही उद्धवसेनेचे नेते मनसेसोबत युतीवर सकारात्मक, म्हणाले... 
16
दोन मुलांची आई १७ वर्षांच्या तरुणाच्या प्रेमात पडली, वर्ष झालं पिच्छा सोडेना, अखेर तरुणाने 'असा' शिकवला धडा! 
17
खळबळजनक! ४ लाख फॉलोअर्स असलेल्या महिला इन्फ्लुएन्सरचा कारमध्ये सापडला मृतदेह
18
WTC Final : शमीला मागे टाकत स्टार्कनं सेट केला नवा वर्ल्ड रेकॉर्ड; त्यात टीम इंडियाचा मोठा हातभार
19
"पाकिस्तान्यांचा नानांना भलताच कळवळा?, तुमचा आणि तुमच्या मालकाचा डीएनए एकच...देशद्रोह"

एमआयडीसीचे प्लॉट वर्षानुवर्ष रिकामे; किती प्लॉट वितरीत झाले? यवतमाळ कार्यालयाकडे माहिती नाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 3, 2024 18:20 IST

Yavatmal : किती प्लॉटवर उद्योग? यवतमाळचे कार्यालय म्हणते, अमरावतीहून माहिती घ्या

रूपेश उत्तरवार लोकमत न्यूज नेटवर्क यवतमाळ : स्थानिक औद्योगिक वसाहतीमध्ये जुनी औद्योगिक वसाहत आहे. या ठिकाणचे अनेक उद्योग बंद आहेत. सी झोनमधील सर्व १५० प्लॉट उद्योगासाठी बुक झाल्याचे सांगितले जाते. या प्लॉटला तारेचे कुंपण टाकून जागा ताब्यात घेतल्याचे दिसते. प्रत्यक्षात यातील अनेक प्लॉटवर उद्योगच आले नाहीत. नेमके किती प्लॉट वितरीत झाले? आणि त्यातील किती प्लॉटवर उद्योग सुरु आहेत. याची माहिती औद्योगिक विकास महामंडळाच्या यवतमाळ येथील कार्यालयाकडेही उपलब्ध नाही. या माहितीसाठी हे कार्यालय अमरावती विभागीय कार्यालयाकडून माहिती घेण्यास सांगते.

यवतमाळ सारख्या मागास भागात उद्योग वाढून तरुणांना रोजगार उपलब्ध व्हावा या हेतूने ज्येष्ठ स्वातंत्र संग्राम सेनानी जवाहरलालजी दर्डा यांच्या पुढाकाराने १९८० मध्ये येथे औद्योगिक वसाहत सुरु झाली. त्यावेळी जुन्या औद्योगिक वसाहतीमध्ये १० युनिट होते. यानंतर भोयर एमआयडीसी झाली. त्यात ७० युनिट होते. यातील अर्धे अधिक युनिट आज बंद पडले आहेत, तर २०१७ मध्ये सी झोन तयार झाले. त्यासाठी ८५ हेक्टर जागा निश्चित झाली. त्यावरचे १५० प्लॉट बुक झाले. मात्र त्यातील केवळ ४० प्लॉटवर उद्योग आले. त्यातीलही अनेक उद्योग आता बंद पडले असून उद्योग मोजके सुरू झाले. काही खुले प्लॉट आजही जैसे थे पडून आहेत. औद्योगिक विकास महामंडळाच्या नियमा नूसार प्लॉट अलॉट झाल्या नंतर पाच वर्षात त्या ठिकाणी काम न झाल्यास ते प्लॉट परत घेतले जातात. यासंदर्भात उद्योजकांनी आणखी पाच वर्षांची सवड मागितल्याचे समजते, मात्र त्यावर धोरणात्मक निर्णय अद्यापही झालेला नाही. मात्र ज्यांना प्लॉट दिले. त्यांना उद्योग सुरु करण्याचे गांभीर्य नाही. आणि ज्यांना उद्योग सुरु करायचेत त्यांना प्लॉट मिळत नाही. अशी स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे औद्योगिक वसाहत सुरु करण्याच्या मुळे उद्देशालाच नख लागले आहे.

टेक्सटाइल पार्कला ९३.५२ हेक्टर जागायवतमाळ हा कापूस उत्पादक जिल्हा म्हणून ओळखला जातो. या ठिकाणी कापडावर आधारीत उद्योग, किवा प्रक्रिया उद्योग येतील म्हणून ९३ हेक्टरवर टेक्सटाइल पार्क खुले ठेवण्यात आले. प्रत्यक्षात उद्योग पाहिजे तसे आले नाहीत. यामुळे तत्कालीन उद्योगमंत्री उदय सामंत यांच्याकडे ही जागा फुड पार्क करिता रिझर्व्ह करण्याची विनंती झाली. त्यांनी एक वर्षात अर्ज करण्याची सवलत देत ही जागा फुड पार्कला दिली. मात्र, फुड पार्कसाठीही कोणी पुढाकार घेतला नाही.

टॅग्स :MIDCएमआयडीसीYavatmalयवतमाळAmravatiअमरावती