शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

म्हाडा योजनेचे घरही सोडले नाही, पालकमंत्र्यांवर अन्याय झाला कसा ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2022 05:00 IST

महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यानंतर शिवसेनेच्या वाट्याला मोजकीच मंत्रिपदे आली. मात्र, तरीही पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भूमरे यांना कॅबिनेट मंत्री करीत यवतमाळच्या पालकमंत्रिपदाचीही जबाबदारी सोपविली. त्यानंतरही भूमरे यांनी शिवसेनेविरुद्धच्या बंडात सहभाग घेतल्याने शिवसेनेने भूमरे यांना आणखी द्यायचे तरी काय होते, असा प्रश्न  शिवसैनिकांतून उपस्थित केला जात आहे. 

विशाल सोनटक्केलोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : महाविकास आघाडी सरकारमध्ये काॅंग्रेस-राष्ट्रवादीचीच कामे होतात, आम्हाला डावलले जाते, असे अनेक आरोप करीत यवतमाळचे पालकमंत्री संदीपान भुमरे यांच्यासह सेनेच्या आमदारांनी बंड पुकारत एकनाथ शिंदे यांच्यासोबत गुवाहाटी गाठले आहे. मात्र इकडे शुक्रवारी पालकमंत्र्यांना औरंगाबादेत लाॅटरी लागली. लोकप्रतिनिधींसाठीच्या दोन टक्के राखीव कोट्यातून भुमरे यांना म्हाडाचे घर मिळाले आहे. शनिवारी शिवसैनिकांत याचीच चर्चा होती. पक्षाने काय कमी केले, म्हणून पालकमंत्र्यांनी शिवसेना सोडली, असा सवाल केला जात आहे. वनमंत्री संजय राठोड यांच्या राजीनाम्यानंतर एप्रिल २०२१ मध्ये औरंगाबाद जिल्ह्यातील शिवसेनेचे नेते संदीपान भुमरे यांच्यावर यवतमाळच्या पालकमंत्री पदाची धुरा आली. मात्र केवळ सरकारी कार्यक्रमापुरतेच भुमरे यवतमाळ दौऱ्यावर येत राहिल्याने सुरुवातीपासून त्यांच्याविषयी शिवसैनिकांसह नागरिकांतूनही नाराजीचा सूर उमटत होता. या नाराजीनंतर जनसंपर्काच्या दृष्टीने पालकमंत्री संदीपान भुमरे यांनी यवतमाळात संपर्क कार्यालयही थाटले होते. मात्र ते बंदच राहायचे. त्यातच एकनाथ शिंदे यांनी बंड पुकारल्यानंतर पहिल्याच गाडीने भुमरे हे त्यांच्यासोबत गुवाहाटीकडे रवाना झाले होते. शिवसेनेने सर्वकाही देऊनही या ज्येष्ठ नेत्याने पक्ष सोडल्याने यवतमाळात कमालीचा संताप व्यक्त झाला. दरम्यान, संदीपान भुमरे गुवाहाटी मुक्कामी असतानाच शुक्रवारी औरंगाबादेत म्हाडाच्या प्रकल्पाची ऑनलाईन पद्धतीने लाॅटरी निघाली. एक हजार २०४ घरकुलांसाठी ११ हजार अर्ज प्राप्त झाले होते. त्यातून कॅबिनेट मंत्री व यवतमाळच्या पालकमंत्री पदाची धुरा खांद्यावर असलेल्या भुमरे यांना अल्प उत्पन्न गटातून घरकुल मिळाले आहे. दरम्यान, त्यांनी घरकुलासाठी अर्ज भरला होता की अन्य दुसऱ्या कुणी त्यांच्या नावे अर्ज केला, हे तपासण्यात येईल आणि पात्र असतील तर त्यांना घरकुल दिले जाईल, असे म्हाडाच्या सीईओंनी स्पष्ट केले आहे. मात्र या लाॅटरीनंतर शिवसैनिकांसह सर्वसामान्य नागरिकांनीही भुमरे यांच्यावर टीकेची झोड उठविली आहे. पालकमंत्र्यांनी म्हाडाचे घरही सोडले नाही, अशी टीका अनेकांनी केली  आहे.

शिवसैनिक म्हणतात; सेनेने काय कमी केले? - संदिपान भूमरे हे एकेकाळी औरंगाबाद जिल्ह्यातील पैठण येथील संत एकनाथ सहकारी साखर कारखान्यात स्लीप बाॅय म्हणून काम करीत होते. पुढे शिवसेनेत सक्रिय झाल्यानंतर, ते याच कारखान्याचे चेअरमन झाले. एवढेच नव्हे तर १९९५, १९९९, २००४, २०१४ आणि २०१९ असे तब्बल पाच वेळा शिवसेनेच्या तिकिटावर आमदार झाले. - महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यानंतर शिवसेनेच्या वाट्याला मोजकीच मंत्रिपदे आली. मात्र, तरीही पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भूमरे यांना कॅबिनेट मंत्री करीत यवतमाळच्या पालकमंत्रिपदाचीही जबाबदारी सोपविली. त्यानंतरही भूमरे यांनी शिवसेनेविरुद्धच्या बंडात सहभाग घेतल्याने शिवसेनेने भूमरे यांना आणखी द्यायचे तरी काय होते, असा प्रश्न  शिवसैनिकांतून उपस्थित केला जात आहे. 

महागावमध्ये शनिवारी दोन ठिकाणी निदर्शने - शिवसेनेत बंडाळी करून गुवाहाटीमध्ये ठाण मांडून बसलेल्या बंडखोर आमदारांच्या निषेधार्थ शनिवारी महागाव शहरातील नवीन बसस्थानक आणि जुने बसस्थानक अशा दोन ठिकाणी शिवसैनिकांनी जोरदार निदर्शने केली. यावेळी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या समर्थनार्थ घोषणाबाजी करण्यात आली. यावेळी तालुका प्रमुख प्रमोद भरवाडे यांनी तालुका उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी ठामपणे उभा असल्याचे सांगितले. - नवीन बसस्थानकासमोर झालेल्या आंदोलनात युवा सेनेचे जिल्हा प्रमुख विशाल पांडे यांच्यासह दत्तराम कदम, किशोर घाटोळे, लक्ष्मीबाई पारवेकर, राम तंबाखे, नगराध्यक्ष करुणा शिरबिरे, रामराव नरवाडे, सुजित ठाकूर, लखन राठोड, कैलास पाटे, अनिता डोंगरदिवे, जयश्री चव्हाण, सुनीता डाखोरे, आकाश राठोड, बालूसिंग जाधव आदी शिवसैनिक सहभागी झाले होते. तर माजी उपजिल्हा प्रमुख सुदाम खंदारे, चक्रधर गोटे, सतीश नरवाडे यांच्या नेतृत्वाखाली जुन्या बसस्थानकासमाेर झालेल्या आंदोलनात ग्यानबा नावाडे, अशोक तुमवार, संदीप राऊत, गोविंदा धनगर आदी सहभागी झाले होते.

 

टॅग्स :Shiv SenaशिवसेनाMahavikas Aghadiमहाविकास आघाडी